निसर्ग

चमत्कार-दृष्टिकोन

Submitted by र।हुल on 5 October, 2017 - 19:57

पहिल्यांदा मी चमत्काराची व्याख्या करतो.
'चमत्कार म्हणजे अशा गोष्टी ज्या बघणार्याच्या जाणिवेला, बुद्धीला; ज्ञात माहितीस्त्रोत वापरून, ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परीमाणं लावून बघितली असता अनाकलनीय असतात.'
[व्याख्या ढोबळमानाने केली आहे. चुकल्यास कर्रेक्ट करा. Happy ]

सेलेरी, ढबू मिरची आणि गुलाब!

Submitted by एम.जे. on 28 September, 2017 - 13:06

तुम्ही म्हणाल, ‘हे काय भलतंच?’ त्याचं असं झालं, परवा सेलेरी घेतली सुपासाठी. कापून त्याचा बुडखा पाण्यात ठेवला तर मूळं फुटून घरच्याघरी सेलेरी उगवते, पुन्हा बाजारात जायला नको. पण इथे स्वयंपाकाच्या घाईत तो बुडखा ठेवायला भांडंच मिळे ना. मग काय, दिवाणखान्याच्या बाजूनी ओट्यावर काचेचा सट होता. बरेचदा बागेतल्या फुलांचा गुच्छ करून मी त्यात ठेवत असते. नेमका तो रिकामा होता. दिला चटकन सेलेरीचा बुडखा त्यात ठेवून.

गडदुर्गा - तुंगाई, किल्ले कठीणगड उर्फ तुंग (८)

Submitted by मध्यलोक on 28 September, 2017 - 08:08

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

चवळी

Submitted by एम.जे. on 28 September, 2017 - 00:39

काही दिवसांपूर्वी चवळी काढली आणि लक्षात आलं, चवळीला भुंगा लागलाय. कडधान्यं मी शक्यतो फ्रिजरमध्ये टाकते म्हणजे किडे-भुंग्यांचा त्रास होत नाही. नेमकी ही नवी आणलेली चवळी गडबडीत बाहेर राहून गेली. संपवायच्या दृष्टीने मग मी ती सगळीच भिजवली. ‘रोजच्या व्यस्त वेळापत्रकात विसरघोळ घातला की हे असं पुढे काम वाढतं’… डोक्यातल्या विचार भुंग्यासोबत भिजलेली चवळी पटापट निवडायला घेतली. नेहमीसारखा खराब भाग बाजूला काढून उरलेलं दल घेण्याची काटकसर बाजूला ठेवत मी भुंगा लागलेल्या सगळ्या आख्या चवळ्याच बाजूला काढल्या आणि पुढच्या स्वयंपाकाला लागले.

शब्दखुणा: 

गडदुर्गा - श्री जोगेश्वरी देवी, भैरवगड, हेळवाक (७)

Submitted by मध्यलोक on 27 September, 2017 - 09:08

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

योग- ध्यानासाठी सायकलिंग

Submitted by मार्गी on 27 September, 2017 - 06:55

नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.

चल पुन्हा तळ्याच्या काठी....

Submitted by अनन्त्_यात्री on 27 September, 2017 - 02:15

जांभळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले

थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फुंकर येता
पाण्यावर झुंबर फुटले

घनदाट शांतता तिथली
तोलून थिरकत्या पंखी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले

नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले

चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.

निसर्ग

Submitted by मी मीरा on 26 September, 2017 - 05:49

निसर्ग राजा
निळे निळे आकाश जणू निळ्या गालिच्याची झालर
निळ्या समुद्राच्या पाण्याला त्यानेच दिला हा कलर

हिरवी हिरवी रान, रंगगीबेरंगी पाने फुले वेली
निसर्गाने हि रंगाची किमया कशी काय केली

निसर्गाची जादू वेड लावी जीवाला
भूल पाडते तणावाची नर देहाला

निसर्गाने शिकवले नेहमी सुखी व आनंदी राहा
मानावा चाहूल त्याचा गुणांची एकदा घेऊन पहा

गरजा मानवाच्या नेहमीच वाढत चालल्या आहे
त्याची परतफेड एकटा निसर्ग करू पाहे

कधी समजेल मनुष्याला निसर्ग आपला सहारा
जणू संकटकाळी बचाव साठी देत असतो पहारा

विषय: 

गडदुर्गा - पाटणादेवी, कन्हेरगड (५)

Submitted by मध्यलोक on 25 September, 2017 - 10:12

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी

https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)

https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

गडदुर्गा - हस्तमाता, नारायणगड (४)

Submitted by मध्यलोक on 25 September, 2017 - 09:40

https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी

https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)

https://www.maayboli.com/node/63998 ------> गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)

====================================================================================================

Pages

Subscribe to RSS - निसर्ग