मे महिना संपून जून सुरु झाला की गर्मीचा कहर वाढलेला असतो. पांढऱ्या, करड्या ढगांचे पुंजके दिसायला लागतात. वेधशाळेच्या नेमेची चुकणाऱ्या अंदाजांच्या (इथे कुणी वेधशाळेतले कर्मचारी असल्यास क्षमस्व :-)) बातम्या यायला लागतात. प्रत्येकालाच पावसाचे वेध लागलेले असतात. आणि मग एकदाचा तो येतो...
येईल आता मृदगंध..
तापलेली ही धरती ।
नजर लावे वरती ।।
बरसेल तो धुंद ।
येईल आता मृदगंध ।।१
आठवणी ह्या चित्ती ।
वारा वाहे भोवती ।।
होईल कसा मंद ।
येईल आता मृदगंध ।।२
व्याकुळलेली ती पोरटी ।
वाट पाहे गोरटी ।।
जुळतील पुन्हा बंध ।
येईल आता मृदगंध ।।३
प्रित ही चोरटी ।
ओढ लागे घरटी ।।
मिळतील जाता अंग ।
येईल आता मृदगंध ।।४
―₹!हुल
आज पुन्हा रात्रपाळीला त्या भक्कास midc तील कंपनीत राखणाला जावं लागणार म्हणून संध्याकाळ पासूनच माझी चिडचिड होत होती. त्यात आजची अमावस्येची रात्र पुन्हा पोटात भितीचा गोळा आणत होती. या असल्या सिक्यूरिटी गार्ड्स च्या नोकरीला मी जाम वैतागलो होतो पण करणार तरी काय?..दररोजचे खर्च तर भागलेच पाहिजेत ना. माझी होणारी चिडचिड पाहून पल्लवी अस्वस्थ होताना दिसली. तिला तसं बघून खरं म्हणजे मीच मनोमन खजील झालो परंतु झाल्या गोष्टीला आम्ही दोघंही सारखेच जबाबदार होतो.
"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।
कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।
े
वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"
दरवेळेस पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?.कदाचित..
Read
सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 112,374,333 आहे.तरीही महाराष्ट्राची परीस्थीती म्हणजे नाम बडे दर्शन खोटे असे.
औद्योगिक क्षेत्रात नाव खुप मोठे परंतु शेतकरी ला मान सम्मान नाहि.
त्या मानवाला आज हक्क आणि आपली बाजु मांडण्यासाठि रस्त्यावर उतराव लागत आहे. हे खुप लाजिरवाणि गोष्ट आहे.
आपन टीव्हि पाहुन या गोष्टी वर comment करत बसलो आहे.
सरकार ने हे केल पाहीजे.....ते केल पाहीजे....
असे intervew पाहुन मला या लोकांची दया व हस्य येत असुन यांना काय बोलाव तेच समजत नाहि..
फत्थरांच्या इमल्यांचे जंगल सभोवती वाढते आहे
या भकास वातावरणात मला तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
तुझे झाडांवरील प्रेम, त्यांच्या वाढीसाठीचा कळवळा
आता मात्र नुसती झाडेतोड , ही धरा सहते आहे
हिरव्यागार त्या पाचूवनात पाऊस येई मृदगंध दरवळे
उजाड या शहरात पाऊस पूर बनून कोसळतो आहे
उकाडा वाढतोय , पूर्वीची ती मंद हवा आता उदास भासते आहे
विकासाच्या या हव्यासात मला तरी तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
(प्रेरणा: http://www.maayboli.com/node/62719 )
सकाळी सकाळीच घामानं अर्ध्या ओल्या झालेला बनियन! उकाड्यान हैराण झालेला त्या बॅनियनच्या आतला मी. इच्छा नसतानाही सकाळ चा पेपर आणि सकाळ चा चहा एकत्र रिचवायलाच हवा हा केवळ एक वर्षानूवर्ष पाळलेला रिवाज म्हणून गरम गरम चहाचे झुरके घेत पेपर उघडला. वर्ष-भर अभद्र बातम्या पुरवून वाचकांची सकाळ भकास करणार्या समग्र प्रिंट मीडिया मधील अख्या वर्षातल्या तीनशे पासष्ठ हेड लाईन्स धुंडाडाळून काढल्या तर मनाला भावणार्या अश्या चांगल्या हेड लाईन्स फक्त हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच सापडतील. त्या सर्व बकाल मथळयां मधे पहिल्या क्रमांकावरील सर्वात सुखद जर कुठला असेल तर तो म्हणजे 'मान्सून केरळ मध्ये दाखल'!
दर महिन्याला नेचरकॅम्प आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळी ठिकाणी पालथी घालून होतात. पण महाराष्ट्राच्या बाहेर वर्षातून एकदा तरी जाणं जमून यावं अशी माझी इच्छा असते. देशाच्या बाहेर फिरणं अजून तरी परवडेबल नाही. असो. यावेळी मी कूर्ग कोडागु हे कर्नाटकातील ठिकाण निवडले. तिथे काढलेली काही छायाचित्रे खाली देत आहे.
मडिकेरी -
हे शहर कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. इथल्या हवेत अगदी दुपारी २ वाजताही बराच गारवा होता.
आजचा पाऊस
फारा वर्षांनी
पुन्हा तुझा माझा
कोसळत राहिला
बाहेरही अन आतही
काचांवर अन खाचांतून
डोळ्यांच्या अविरत ...
सारे थेंब ओथंबलेले
सावरलेले आजवर
निसटले न जुमानता
माझ्याच नजरकैदेतून
ऐकूआली टपटप
तुलाही दूरवर
माझ्याही नकळत
ओघळलेल्या सरींची
सावरले परत क्षण सारे
आवरत पसारा थेंबांचा
त्यातील काही थेंबांवर मात्र
हक्क तुझाही होता
शमा