जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १५
पून्हां त्याच सूssss सूssss सारख्या जहाजातील ईजींनाच्या आवाजाने जँकला जागं केलं.
ऊघड्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशांनी त्याचे डोळे पाणावले होते.
आज खूप दिवसांनी जँकला त्याचं शरीर थोडं हलकं वाटत होतं. त्याचा थकवा तर कूठच्याकूठे दूर पळून गेला होता. शीवाय त्याची झोपही व्यवस्थीत पूर्ण झाली होती. जणू काही मागील दोन तीन दिवसात त्याच्यासोबत काहीच महत्वाचं घडलं नाही अशा अवीर्भावात तो बेडवर ऊठून बसला.