अचानक लिफ्टचा दरवाजा जँकने ऊघडायच्या अगोदरच बाहेरच्या बाजूने ऊघडला गेला होता.
कदाचीत कोणीतरी आत येण्यासाठीच तो दरवाजा बाहेरून ऊघडला असावा.
त्या दोघांचीही आता चांगलीच ततंरली होती.
काळे बूट, स्पँनीश बॉटम असलेली काळी पँटं, गळ्याभोवती गूडांळलेली काळी टाय आणी अंगात सफेद शर्टावर चढवलेला काळ्या रंगाचाच ऊंची कोट. त्यावर डाव्या बाजूला एका जहाजाचे चिञ असलेला ऊठावदार लोगो.
वाढलेली परंतू फ्रेचं क्लिअर कट असलेली आकर्षक दाढी. आणी डोक्यावर सोनेरी आकृतीने सजवलेली काळ्या रंगाचीच दर्जेदार कँप
त्यांच्या एकंदरीत पोशाखावरून व हावभावावरून ते एखाद्या क्षेञातील खूपच अनूभवी ईसम भासावे अशा अवीर्भावात ते त्या दोघांसमोरही लिफ्टमध्ये ऊभे होते.
त्यांना पाहताक्षणी जँकची दातखीळी बसली होती. त्याच्या तोडांतून शब्दच फूटेनासे झाले होते. ज्युलीच्या चेहऱ्यावरही घाबरल्याचे भाव स्पष्ट झळकत होते.
त्या दोघांनाही लिफ्टमध्ये पाहून तो ईसम त्यांना पकडेल, आरडाओरडा करून वेबला व त्याच्या साथीदारांना एकञ गोळा करेल. अशी अपेक्षा असताना त्यांनी जँकला एक छोटंस गोड स्माईल दिलं आणी त्यांचा ऊजवा हात जँकसमोर धरला.
" हँलो आय अँम स्मीथ, स्मीथ रोलींग
आय एँम कँप्टन ऑफ दीस शीप "
त्यांच्या आवाजात जरब होता. कदाचीत जँकला भेटल्याचं समाधानही त्यांच्या डोळ्यात लखलखत होतं.
त्यांना पाहून जँक प्रथम गोधंळूनच गेला. पंरतू ज्युलीने खांद्यानेच हलकासा धक्का देत त्याची तंद्री ऊडवली. मग भानावर येत त्याने स्मीथशी हातमिळवणी केली.
जँक आणखिन पूढे काही बोलणार तेवढ्यात स्मीथनी त्याला पून्हां थांबवलं.
" आय नो एव्हरीथीग, तूम्हा दोघांनाही मला आता कोणतंच स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही.
मला माहीत आहे तूम्ही दोघं ईथे कसे पोहोचलात.
नाही पोहोचलात नाही, तूम्हांला तर ईथे या जहाजात नकळतच आणलं गेलंय, हो ना ? " एवढी मोठी गोष्ट कँप्टन स्मीथनी अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यामूळे जँकमधील आणी त्यांच्यामधली अैचारीकता आता काही अंशी कमी झाली होती.
" तूला हे माहीत आहे का ? की वेबने तूमच्या दोन्हीं मीञानाही ईथेच या जहााजात वरती तीसऱ्या मजल्यावर कैद करून ठेवलंय "
" काय ?" ज्युली
" हो वेबने त्या दोघांनाही या जहाजात आणलंय " स्मीथ
जँक व ज्युली मोठी जोखीम पत्करून त्या दोघांना शोधण्यासाठी त्यांच्या रूममधून ईथपर्यंत आले होते. आणी कँप्टन स्मीथकडून आता आयताच जँकला त्या दोघांचाही ठावठीकाणा मिळाला होता. त्यामूळे आता लवकरात लवकर स्मीथचे आभार माणून रॉन व रॉकीपर्यतं पोहोचण्याचा विचार जँक करत होता.
तेवढ्यात स्मीथनी पून्हा जँककडे नजरेचा एक कटाक्ष टाकला आणी बोलू लागले.
" विल्यम........विल्यमला ओळखतोस तू ?"
" नाही, कोण विल्यम ?" जँक
" विल्यम हिलरी, ईटरनँशनल स्मग्लर. ज्याने तूम्हाला ईथे या जहाजात आणून कैद करून ठेवलंय. तो अफीम, चरस, गांज्या व अशा अनेक अमली पदार्थाचां कूविख्यात व्यापारी आहे.
" पण हे सर्व तूम्हाला कंस माहीत " ज्युली ऊगाचचं काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली.
" मी गेल्या दहा वर्षापासून या डिस्कवरी जहाजावर कँप्टन पदाची सूञे सांभालतोय. हे जहाज अर्जेटीनातील सी.एम.ए.( क्रूझ ऑफ मरीन अर्जेटीना ) या जलपर्यटन सेवा पूरवणाऱ्या प्रायव्हेट कंपनीच्या मालकीचं आहे.
हिलरीने अमाप पैशांच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कंपनीशी व्यापारी संबध प्रस्थापीत केले. बरीच बेकायदेशीर कामं करून या समाजामध्ये त्याने मानाचे स्थान मिळवले. त्यामूळेच तर त्याचा अमली पदर्थाचां काळा बाजारही वाढीस लागला. आणी एवढं करूनही तो लोकांच्या नजरेत माञ एक प्रामाणीक व यशस्वी ऊद्योगपती म्हणूनच मिरवतो.
पण यावेळी त्याची नजर प्राचीन, ईतीहासातून लूप्त झालेल्या कीगं बार्बोसाच्या ईनव्हीजीबल ट्रेजरवर आहे. संसोधन कर्त्याच्या मते त्या अदृष्य खजाण्यात एक लक्ष सोन्याची नाणी, दागदागीने, चांदीच्या मूद्रा, आणी आणखीन बऱ्याच मैल्यवान, कीमंती वस्तूचां समावेश असण्याची शक्यता आहे. म्हणूनच तर तो अवाढव्य खजाणा मिळवण्यासाठीच हिलरीने तूम्हांला या जहाजावर आणलंय. "
" पण मलाच का ?
हा खजाणा शोधण्यासाठी तो ईतर कोणाकडूनही मदत मीळवू शकला असता ना. "
जँकने अगदी योग्य वेळी त्याच्या मनातील शंका बोलून दाखवली होती.
पून्हा एक मोठा दिर्घ श्वास घेऊन कँप्टन स्मीथ पूढे बोलू लागले.
" कदाचीत जँक तूला हे माहीत नसेल,....................तूझ्या वडीळांचा खूनही विल्यमनेच केला होता.
" काय ?" जँक अगदी रागाने, चवताळून ओरडला. नकळत त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या वडीळांचा निरागस चेहरा येऊन गेला.
" हो,
तूझे वडील मी. जॉन फ्लेचर अर्जेटीनांतील एका सूप्रसीद्ध ट्रेजर हंटीग एजंसी मध्ये कार्यरत होते.
मला वाटतं तू कदाचीत तेव्हां खूपच लहान असशील. जॉनचा प्रामाणीकपणा आणी त्यांची कूशल बूद्धीमत्ता पाहून त्या एजंसीने ईनव्हीजीबल ट्रेजर हंटीगंच्या गूप्त खजाण्याचे काम जॉनकडे सोपवले होते.
तूझे वडील दिवस राञ त्या प्रोजेक्टवर काम करत असायचे. तेव्हां मी नूकताच सी.एम.ए. मध्ये नेव्ही ट्रेनीगसाठी रूजू झालो होतो. तूझ्या वडीळांची मेहनत आणी बूद्धीमत्ता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीली होती.
अखेर मी. जॉनची मेहनत पूर्णत्वास गेली. आणी थोड्याच कालावधीत मी. जॉननी त्या खजाण्यासंदर्भात काही महत्वाचे पूरावे मिळवले. त्या पूराव्यामार्फत ते कीगं बार्बोसाच्या ईनव्हीजीबल ट्रेजरपर्यतं पोहोचू शकले असते. "
" पोहोचू शकले असते म्हणजे ? जँकच्या वडीळांसोबत पूढे काय घडलं ? ते खजाण्यापर्यतं पोहोचलेतच नाहीत " ज्युली
" नाही, त्यावेळी या विल्यम हिलरीची नजर त्या गूप्त खजाण्यावर होती. विल्यमही त्याच ट्रेजर हंटीग एजन्सीमध्ये तूझ्या वडीळांसोबत कार्यरत होता. त्याने खजाणा लूटून झटपट श्रीमंत होण्याची कमकूवत स्वप्ने पाहीली होती.
आणी यशाच्या शीखर गाठत असतानाच जे नको घडायला हवं होतं तेच घडलं. एका राञी घडलेल्या कार एक्सीडटं मध्ये तूझ्या वडीळांनी त्यांचा जीव गमावला होता. "
कँप्टन स्मीथचे ते रखरखीत वाक्य क्षणार्धात जँकच्या हद्याचा ठोका चूकवून गेले होते. त्याचे डोळे पाणावले. त्याने शेवटंच त्याच्या वडलांना हॉस्पीटल मध्ये पाहीलं होतं. तो त्यावेळी खूप रडत होता. हॉस्पीटल मधील यूगासमान भासणारा प्रत्येक क्षण त्याला दूखःची आठवण करून देत होता.
" त्या दृष्ट हिलरीनेच एक कूटील बेत रचून तूझ्या वडलांचा अँक्सीडटं घडवून आणला होता. त्याने जेलमध्ये जाण्यासाठी कोणताच पूरावा मागे सोडला नाही. त्यामूळे जॉनच्या मृत्यूची केस देखील फार वेळ तग धरून राहू शकली नाही. परंतू त्या कार अँक्सीडटं मध्ये ईनव्हीजीबल ट्रेजरमधील सर्वच पूरावे जळून नष्ट झाले होते. जे फक्त जॉनलाच माहीत होते.
त्यामूळे हिलरीच्या क्रूर यशालाही काहीच महत्व ऊरले नाही. "
ते दोघंही स्मीथचे बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होते.
" शेवटी पंधरा वर्षाच्या कठोर मेहनतीने हिलरीने हरवलेली सर्वच कागदपञे, पूरावे, नकाशे व काही महत्वपूर्ण बाबी पून्हा गोळा केल्या.
परंतू कसलातरी अतीमहत्वाचा पूरावा माञ तो अजूनही मिळवू शकलेला नाही.....असा पूरावा जो फक्त तूझ्या वडीळांनाच माहीत होता. आणी मरण्याआधी तूझ्या वडीळांनी तो तूलाही सांगीतला होता.
कदाचीत यासाठीच हिलरीने तूला कैद करून या जहाजात आणलं असावं. आणी तूझे तिघंही मीञ तूझ्यासोबतच आहेत हे कळल्यावर कोणताच पूरावा मागे राहू नये म्हणून हिलरीने त्यांनाही या जहाजात आणलं "
कँप्टन स्मीथनी सांगीतलेली सर्वच हकीकत अगदी अद्भूत होती. रहस्यमय होती. त्या दोघांसाठीही स्मीथबरोबरचा अनूभव अगदी नवीनच होता.
" शेवटी खजाण्यासंदर्भात सर्व पूरावे मिळवूनही माझ्याजवळ असा कोणता महत्वाचा पूरावा असावा की ज्यासाठी हिलरीला मला ईथपर्यतं आणावं लागलं. "
जँक स्वतःशीच पूटपूटत होता.
ज्युलीही जँकची मनस्थीती पाहून शांत ऊभी होती. कदाचीत जँकला थोडा वेळ शांतच ऊभं राहू द्यावं असा तीचा हेतू असावा.
" पण तूम्हांला हे सर्व माहीत असूनही तूम्ही हिलरीची मदत का करताय ?"
शेवटी न राहवून ज्युलीने अगदी महत्वाचा प्रश्न कँप्टन स्मीथना विचारला होता.
ज्युलीचा प्रश्न ऐकून कँप्टन स्मीथचा चेहरा अचानक पडला. त्यांच्या नजरेत भरून आलेली चितां स्पष्ट झळकत होती.
कदाचीत ज्युलीच्या नजरेला नजर देत ते बोलू शकले नसते म्हणूनच ते थोडा वेळ शांत राहीले.
जँकही सावधपणे स्मीथच्या चेहऱ्यावरचे हावभाव टीपण्याचा प्रयत्न करत होता.
डोळ्यात दाटून आलेले अश्रु लपवत स्मीथ बोलू लागले.
" त्या हिलरीने फक्त तूम्हांलाच नाही तर माझ्या मूलीलाही या जहाजात कैद करून ठेवलंय. आणी तो मलाही आता ब्लँकमेल करतोय. तो खजाणा शोधण्यासाठी वादळी वाऱ्याचा आवेग असलेल्या तूफानी समूद्रात जहाज नेण्याची जबरदस्ती तो माझ्यावर करतोय.
कंस शक्य आहे हे ?
जर मी सूदूर दक्षीणेच्या दिशेने जहाज नेले तर जहाजतील अन्य प्रवाशांच्या जिवालाही धोका ऊत्पन्न होऊ शकतो. "
जँकनेही आपली स्वतःची, रक्ताचं नातं असलेली, जवळची माणंस गमावल्याचं दूखः अनूभवलं होते.
शेवटी आपल्या भावनांवर नियंञण ठेवत काहीच अडचण नाही असा आव आणत कँप्टन स्मीथनी सूटकेचा सूस्कार सोडला.
" आपल्याला आता लवकरात लवकर या लिफ्टमधून बाहेर पडायला हवं. नाहीतर ईथे पून्हां माझ्यासारखाच कोणीतरी यायचा. " स्मीथ
हो चला लवकर आपल्याला आता रॉनला व रॉकीलाही भेटायचं आहे.
क्रमशः
पुढील भाग लवकरच..............
वाचतेय
वाचतेय
मस्त...!! अगदी 'समुंदर के
मस्त...!! अगदी 'समुंदर के लूटेरे' सारखी वाटत आहे...!!!
धन्यवाद तूमचे प्रतीसाद येत
धन्यवाद तूमचे प्रतीसाद येत राहूद्या