जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १५

Submitted by Mayur Mahendra ... on 5 April, 2017 - 13:18

पून्हां त्याच सूssss सूssss सारख्या जहाजातील ईजींनाच्या आवाजाने जँकला जागं केलं.
ऊघड्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशांनी त्याचे डोळे पाणावले होते.
आज खूप दिवसांनी जँकला त्याचं शरीर थोडं हलकं वाटत होतं. त्याचा थकवा तर कूठच्याकूठे दूर पळून गेला होता. शीवाय त्याची झोपही व्यवस्थीत पूर्ण झाली होती. जणू काही मागील दोन तीन दिवसात त्याच्यासोबत काहीच महत्वाचं घडलं नाही अशा अवीर्भावात तो बेडवर ऊठून बसला.
ज्युलीतर त्याच्या अगोदरच जागी होऊन खिडकीपाशी हवा खात बसली होती. रूणझूणत येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा स्पर्श होताच तीचे लाबंलचक काळेभोर केस गोऱ्यापान चेहऱ्यावर विखूरले जात होते. आणी मग त्यावर कानातील गोलाकार रीगंणाची झगमगत हालचाल होत होती.
खरंतर आज ती नेहमीपेक्षा खूपच सूदंर भासत होती. जणू काही तीच्या भीरभीरत्या डोळ्यांत अवघ्या सागराचं सैदंर्य लूकलूकत असावं.
जँक बराच वेळ बेडवर बसून तीच्या चेहऱ्यावरील निरागस हावभाव टिपण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. आणी एका क्षणी नकळत त्या दोघांची नजरानजर झाली. ज्युलीने लगेचच लाजून बाजूला पाहीलं.
नजरोसे नजरोका ईनकार हो गया म्हणतात ना, अगदी तसंच काहीतरी त्या एका क्षणात घडलं होतं.
मग फार वेळ न घालवता जँकही आवराआवर करत तीच्या बाजूला फ्रेश होऊन बसला.
आज का जाणे जँकला तीचं खट्याळ हसणं पहील्यांदाच एवढं आवडलं होतं. तो तीच्यात नकळतच आकस्मीतरीत्या गूंतत चालला होता.
त्या भल्या पहाटेच्या थंडगार वातावरणात खिडकीपाशी दोघांच्या गप्पा हळहळू रंगात येऊ लागल्या.

" कीती छान थंडगार वारा वाहतोय ना जँक "

" हो गं खूपच थंड "
ज्युलीच्या हाताचा पूसटसा स्पर्श त्याला जाणवला होता. तोही त्या वाऱ्याप्रमाणे थंडच होता.

" हा समूद्र कीती शांत आहे ना
बघ ना, ईथे लांटाशीवाय दूसरा कोणताच आवाज नाही.
मला अशा शांत जागेतच राहायला खूप आवडतं "

" हो...ईथे एवढी शांतता आहे की, ज्या व्यक्तीस सन्यास घ्यायचा असेल तीने आपलं घरदार सोडून सरळ या जहाजातच यावं.
नाही का ?
निदान त्याचे ठगडे बाधांयचे पैसे तरी वाचतील "
जँकचा ज्युलीला हसवण्याचा निष्फळ प्रयत्न पूर्णपणे फसला होता. हे माहीत असूनसूद्धा ती मूद्दामूनच चेहऱ्यावर निरागसपणाचे भाव आणत त्यावर खोडकरपणे हसत होती.
हे लक्षात येताच त्याने लागलीच विषयाला दूजोरा दिला.
" ज्युली तू याआधी कधी आली होतीस का गं.
एवढ्या मोठ्या क्रूझवर ? "

" नाही रे यावेळी पहिल्यांदाच, तेही किडनँप होऊन..........,
तू आला होतास का कधी जहाजावर ?"

" नाही मीही पहील्यादाच आलोय........ज्युली तूला असं नाही वाटत का ?
की आपल्या आवडीनीवडी, आपले विचार, आपली मतं कीती एकसारखी आहेत, कीती जूळतात, आपल्यामध्ये कीती साम्य आहे ना "
तो शांतपणे म्हणाला होता. परंतू या वेळी माञ त्याला स्वतःच्याच बोलण्यावर खूप हसू येत होतं.
अखेर ते दोघंही एकमेकांकडे पाहून पून्हां जोरजोरात हसू लागले.

एकीकडे त्यांच्या गप्पा रंगात येत असतानाच फक्शंन हॉलमधील मूख्य सेटवर क्रीसमस पार्टीची जंगी तयारी सूरू झाली होती. त्याच संध्याकाळी विल्यमचा बर्थडेही सेलीब्रेट होणार होता. त्याने जहाजातील मूख्य फक्शंन हॉलमध्ये क्रीसमस पार्टीचं मोठं आयोजण केलं होतं. त्यामूळे दूपारपासूनच प्रत्येकजण अगदी ऊत्साहात आपआपली नेमून दिलेली काम करण्याच्या तयारीला लागले होते.
तेवढ्यात एक स्ञी लगबगीने आजूबाजूला बघत हॉलमध्ये आली. तीचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. आणी मागे जाता जाता ती नकळतच कँप्टन स्मीथशी धडकली. कदाचीत ती काहीतरी शोधण्याच्या गडबडीत असावी.
" आय एँम स्वारी सर "

" नॉट अँट ऑल "

" स्क्यूझ मी
मला असं का वाटतंय की मी तूम्हाला कूठे तरी पाहीलंय......जर मी चूकत नसेन तर तूम्ही या जहाजाचे कँप्टन...कँप्टन स्मीथ बरोबर "

" हो अगदी बरोबर "

" स्टीफनने मला तूमच्यावीषयी बरंच काही सांगीतलं होतं. तो आणी तूम्ही एकञच काम करता ना "

" हो स्टीफन तर माझा खूपच जवळचा मीञ आहे मीस......"
तीचं नाव जाणून घेण्यासाठी स्मीथ क्षणभर थांबले.

" ऐलीना,.........मी एलीना फर्नाडीस, स्टीफनची एकमेव गर्लफ्रेडं "

" ओ आय सी
तूम्हाला भेटून खूपच आनंद झाला मीस एलीना.
स्टीफन तूमची नेहमीच तारीफ करत असतो. पण तूम्ही प्रत्यक्षात एवढ्या सुदंर दिसत असाल असं मला कधी वाटलं नव्हतं "

" थँक्यू सो मच, दँट ईज यूवर प्लेजर "
ती गालातच हसली.
" कँप्टन मला स्टीफनला भेटायचं आहे, मी केव्हांपासून जहाजाचं ईजींन कम्पार्टमेंट शोधतेय. तूम्ही जर मला सांगीतलं तर खूपच बरं होईल "

" पण तीथे प्रवाशांना जाण्यास मनाई आहे, मीस एलीना "

" हो, तूमचं म्हणनं अगदी बरोबर आहे. पण मी असल्या कोणत्याच नियमअटी वैगरे काही मानत नाही "
ती पून्हां गालातच खोडकरपणे हसत म्हणाली.

" खरंतर खूपच चांगला विचार आहे तूमचा.
तूम्हीं ईथे पहील्यांदाच आला आहात का ?
स्टीफन सोबत कधी मी तूम्हांला या जहाजात पाहीलं नाही "

" हो मी यावेळी पहील्यांदाच ईथे आली आहे "

" मग तर तूम्हीं या जहाजाची टूर मीस केलीत. आणी जहाजात आल्यानंतर ईथूनच पूढे जावं लागतं.
तूम्ही ईथे नवीन आहात ना ?
असो त्या दरवाजानंतर स्टाफ कॉरीडॉर आहे. तीथून डावीकडे मग एगदम शेवटी तूम्हांला ईजींन रूम सापडेल "

" थँक्यू, सो मच अगेन "
अखेर स्मीथचे आभार मानूत एलीना घाईघाईने ईजींनरूमच्या दिशेने निघून गेली.
त्याच हॉलमधील गोलाकार कॉरीडोरमध्ये ऊभा असलेला एक ईसम मोठ्या आवाजात फोनवर बोलत होता.
वाढून सफेद झालेली आकर्षक दाढी, डोळ्यांवर चढवलेला काळ्या रंगाचा महागडा गॉगल, आणी त्याने घातलेला ऊंची कोट त्याच्या श्रीमंतीची लागलीच ओळख करून देत होता.

" तू मला फोन करशील.
प्लीझ "

" करेन की पण विल्यम जर तू मला रीक्वेस्ट केलीस तरच "
ती थोडं लाडात येऊनच बोलली. विल्यमच्या वाईफचा आवाज होता तो.

" हा हा मी तर तूला रीक्वेस्ट करतच आहे की
आज राञी तू मला फोन कर
निदान आपल्यामधील जून्या संबधासाठी तरी "
एवढं बोलून विल्यमने फोन कट केला. त्या दोघांमध्ये सतत होणाऱ्या भांडणांमूळे दूरावा निर्माण झाला होता. त्यामूळे यावेळीही विल्यमनेच पूढाकार घेऊन तीचा राग घालवण्यासाठी तीला फोन केला होता.
एव्हानां ईजींन कम्पार्टमेटमध्ये प्रवेश करून एलीना स्टीफनच्या कँबीनपर्यतं पोहोचली होती.
तीला पाहताच स्टीफन रागावला. आणी तीचा हात पकडून तीला घाईघाईत कँबीन बाहेर घेऊन आला.

" एलीना तूला तूझ्या रूममध्येच राहायला हवं होतं
तू ईथे कशाला आलीस "

" तीथला टीव्ही नाही चालत आहे रे. त्या छोट्याशा रूममध्ये माझा दम घूटतो. मी तीथे पार वेडी होऊन जाईन "

" तू जरा ईकडे बाजूला येशील का माझ्यासोबत "
स्टीफन तीला ईजींन रूमच्या मागे घेऊन गेला.

" ऐक एलीना तू पून्हा ईकडे कधी येऊ नकोस तूला जर ईथे कोणी पाहीलं तर कदाचीत माझी नोकरीही जाऊ शकते.

" मी तीथे एकटीच खूप कंटाळली आहे रे "

" मी समजू शकतो गं. मला माहीत आहे त्या रूममध्ये तूझ्या एकटीची काय अवस्था होत असेल. पण तरीही तू ईथे यायला नको होतंस.
बंर ते जाऊदे तूला आता भूख लागली आहे का ?"

" हो खूप जोरात "

" मग एलीना ऐक, ईकडे बघ मला प्रॉमीस कर तू पून्हा ईथे कधी येणार नाहीस "

" ओके बाबा मी ईथे तूला भेटायला पून्हा कधीच येणार नाही मग तर झालं "
अखेर स्टीफनने तीचा निरोप घेऊन बाजूलाच ऊभ्या असलेल्या एका वेटरकडे तीच्यासाठी खाण्याची ऑर्डर दिली. मग तो थोड्यावेळाने पून्हा आपल्या कामात व्यस्त झाला.
दूसऱ्या फ्लोअरवरील 207 नंबरच्या रूममधून योग्य संधी मिळताच जँक व ज्युली बाहेर पडले होते. त्यांना आता लवकरात लवकर ऐलीजाबेथला सोबत घेऊन रॉनला व रॉकीला भेटायचं होतं.
नियोजन केल्यानूसार क्रीसमस पार्टीच्या आगमनासाठी संपूर्ण जहाज चमचमत्या रोशनाईने सजला होता. फक्शंन हॉलच्या मध्यभागी एका मोठ्या क्रीसमस ट्रीची रचना करण्यात आली होती.
अखेर स्टेजवरील माईकचा ताबा घेत वेबने कार्यक्रमास आरंभ केला.

" समूद्र नेहमीच आपला जीवनदाता राहीला आहे. माणसाने याच खाऱ्या पाण्यातून जल्म घेतला.
मिञानो आपण एका नव्या यूगाची सूरूवात करण्यासाठी देखील या सागरालाच निमञणं दिलं.
असं म्हणतात की ओसायन हा समूद्राचा देव होता. समूद्राच्या गाभ्यात असलेलं त्याचं अस्तीत्व अवघ्या सागर सृष्टीचा पोशींदा होतं.
मग याच ऊत्साहात येशूच्या आघोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यापेक्षा सूंदर काय असेल.
येणाऱ्या अनेक वर्षामध्ये तूमचं जीवन पाण्यासारखं वाहत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण या बहारदार कार्यक्रमाचा आंरभ करूया.
तर लेडीज अँन्ड जेटलमन तूमच्यासमोर पेश आहे आपल्या मनमोहक आदांनी घायाल करणारी सूरांची मलीका.........."

" ग्लोरीटा "

तीचं नाव एकूनच जमलेल्या प्रेक्षकांमध्ये ऊत्साह संचारला.
ती स्टेजमागून नाचतगातच समोर आली. आणी अचानक तीच्या ईट्रींबरोबरच म्युझीकही सूरू झालं.
" ऊ.........ऊ..........मूव्ह ईन, मूव्ह ईन,मूव्ह ईन, ए
ऊ.......मूव्ह ईन, मूव्ह ईन, मूव्ह ईन, ए
जस्ट लाईक, जस्ट दँट
ऊ......मूव्ह ईन, मूव्ह ईन, मूव्ह ईन, ए
प्रत्येक जण तीच्या दिलखेचक अदांवर मधहोश झाला होता. बघता बघता तीच्या गाण्यांच्या तालावर अवघी तरूणाई थीरकू लागली.
खाली फक्शंन हॉलमध्ये नाचगाणं सूरू असताना कँप्टन स्मीथ जँकजवळ पोहोचले होते. त्यांनी ज्युलीशी एलीजाबेथची ओळख करून दिली.
तीने फीकट गूलाबी रंगाचा नक्षीदार ड्रेस घातला होता. तीचे तपकीरी रंगाने रंगवलेले केस तीच्या गोऱ्या गोमट्या चेहऱ्यावर अगदीच खूलून दिसत होते.

" मी काय सांगीतलंय ते तूमच्या व्यवस्थीत लक्षात आहे ना "

" हो कँप्टन आम्ही एलीजाबेथला घेऊन आता लवकरच रॉकीच्या रूमपर्यतं पोहोचतो. तूम्ही काही काळजी करू नका "

" बरं मलाही आता निघायला हवं "
त्यांनी ऐलीजाबेथकडे काही वेळ डोळे भरून पाहीले व एकाएकी पूढे निघून गेले.

हॉलमधील गोलाकार कॉरीडॉरमध्ये एका अलीशान टेबलावर विल्यमसोबत जहाजातील अनेक मोठमोठ्या मंडळीनी पत्यांचा डाव मांडला होता.
विल्यमने पाच पीवळे कॉईन टेबलावर टाकले.

" एवढी मोठी चाल,
खूप माल आहे वाटतं आज तूझ्याजवळ "
कोपऱ्यातील खूर्चीवर बसलेल्या पैशेवाल्या दारूड्याने घाबरूनच हातातील पत्ते खाली टाकत विल्यमला टोमणा मारला. त्याबरोबर बाकीच्या तीघांनीही खेळातून माघार घेतली.

" ए हनी "
त्या दारूड्याने पून्हां बाजूने जात असलेल्या वेटरला आवाज दिला.

" यस सर "

" मीस्टर विल्यमना आजून एक ड्रीकं देशील का ?
विस्की ऑन द रॉक्स "

" अपकोर्स सर, व्हाय नॉट "

आता गेममध्ये फक्त विल्यम आणी मी.रॉबेनच शेवटपर्यतं ठिकून राहीले होते. ते दोघंही अगदी एकापेक्षा एक वरचढ चाल करण्यामध्ये तरबेज होते.

" तूला माहीत आहे विल्यम माझे वडील एका वर्षात जेवढे पैसे कमवत नसत. त्यापेक्षा कीतीतरी जास्त पैसे या गेम मध्ये आहेत.
हीघे तूझ्यासाठी पंधरा ची चाल "
मी. रॉबेननी एक गूलाबी व एक पीवळ्या रंगाचं कॉईन पूढे सरकवलं.

" जेव्हां मी कंगाल होतो तेव्हां मी खूप सूखी होतो.
तूझ्यासाठी ही वीस ची चाल "
विल्यमही पैसे ऊडवण्यामध्ये काही कमी नव्हता.

" तूझी वीस ची चाळ तर मग माझी चाळीस ची "

" मी असं एकलंय की रॉबेन तूमचा बिजनेस सध्या लॉसमध्ये चाललाय.
खरं आहे का हे ? "
मी. रॉबेनना विल्यमचा टोमणा अगदी व्यवस्थीत समजला होता. मग त्यावर त्यांनीही योग्य तेच प्रतीऊत्तर दिलं.

" मला हरवण्यासाठी तूम्हांला अगोदर जीकांयला तर हवं "

तेवढ्यात विल्यमचा मूख्य साथीदार कूगन रॉबेनच्या खूर्चीमागूनच टेबजालाजवळ आला त्याने मी. रॉबेनच्या नकळतच त्याच्या हातातील पत्ते पाहीले होते. आणी मग तो हळू आवाजातच विल्यमच्या कानाजवळ येऊन पूटपूटू लागला.
" सर त्याच्याकडे फक्त दोन पंजे आहेत. जर तूमच्याकडे त्याच्यापेक्षा मोठे पत्ते असतील तर तूम्हांला मोठी चाल करण्यास काही हरकत नाही "
विल्यमच्या कानात कूजबूजून झाल्यावर कूगन ताठ ऊभा राहीला. व मूद्दामूनच मोठ्या आवाजात विल्यमला खाली येण्याचा आग्रह करू लागला.
" प्लीज सर, पार्टीची पूर्ण तयारी झाली आहे खाली सर्वजणच तूमची वाट पाहत असतील.

" ओके मी लवकरच गेम संपवून खाली हॉलमध्ये येतो तू पूढे हो "

मग फार विचार न करता विल्यमने त्याच्या पूढ्यातील सर्वच गूलाबी, पिवळ्या, व निळ्या रंगाचे कॉईन पूढे सरकवले.

" माझ्याकडून हे सर्व "

खरंतर मी. रॉबेनना विल्यमची ही चाल खूपच माहागात पडली होती.
अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी हातातील पत्ते शो केले.
कूगनने सांगीतल्याप्रमाणे त्यांच्याजवळ खरोखरच दोन पंजे व एक एक्का होता.
मग विल्यमनेही त्याचे पत्ते ऊघडले.
त्याच्याकडे पंजा सत्ता व आठ्याचा कलर होता. पण विल्यम खोटं बोलूनच जिकंला होता. अखेर जिकंलेले सर्वच पैसे त्याने खर्च करायंचे ठरवले होते.
" ओके गाईज जिकण्यांच्या खूशीमध्ये तूम्हां सर्वानांच माझ्यातर्फे एक एक वाईन "

" कोणती ऑर्डर करू सर ?"
" हां आम्ही घेणार व्ही रोमँनो कॉनटीन १९१८ "

" व्हेरी व्हेल सर "

" अरे ही वाईन तर कमीतकमी चाळीस हजाराची असेल "
त्या समोर बससलेल्या पैशेवाल्या दारूड्याला खरंतर कोणतीही वाईन चालली असती. पण तो ऊगाचच सर्वासंमोर विल्यमने ऑर्डर केलेल्या वाईनचे रेट सांगून दाखवत होता.

" एन्जॉय गाईज, मीञानो मजा करा
काय माहीत ही राञ पून्हा केव्हां येईल " विल्यमने वाईनचा ग्लास तोडांला लवला.

" म्हणजे "

" म्हणजे तू जे ऐकलंस ते खोटं होतं "

" काय खोटं होतं "

" रॉबेन तूला चांगलंच माहीत आहे मी कशाबद्धल बोलतोय.
कदाचीत तूझ्या मनात माझ्याबद्धल रागही असेल पण अर्जेटीनांत जँक्सन फ्लेचरच्या झालेल्या मृत्यूला मी कदापी जबाबदार नव्हतो.
त्याच्या कूटूबांने कोर्टात माझ्यावीरूद्ध आरोप केले होते.
पण मी खरंतर त्याला मदत करू ईच्छीत होतो.

" मला नाही वाटत असं "
रॉबेनला विल्यमची सवय चांगलीच माहीत होती. तो खोटं बोलण्यात अगदी तरबेज होता.

" आता जर तू संपूर्ण कथा लोकांकडूनच ऐकली असशील. तर मग मला पून्हा काही सांगायची गरज नाही.
असो तूम्ही बसा गप्पा मारत मी थोडी हवा खाऊन येतो. त्यांनंतर आपण सर्व पून्हां वाईन पीऊ हवं तर वाईन चा पूर्ण समूद्रच पीऊ "
अखोर चेहऱ्यावर दूखः झाल्याचे आव आणत विल्यम खूर्चीवरून ऊठला. व थोडी प्रायव्हेसी मिळवण्यासाठी सीगारेट पेटवून जहाजाच्या डेकवर गेला.
एव्हाना खाली फंक्शन हॉल मध्ये ग्लोरीटाचं गाणं संपलं होतं. व तीच्या जागी एक फेमस नृतीका डान्स करण्यासाठी आली होती. तीचा अरेबीक डान्स सर्व पूरषांना नाचण्यासाठी ऊत्तेजीत करत होता.
दूसऱ्या मजल्यावर सेट झालेली एलीना तीच्या छोट्याशा रूममध्ये एकटीच कंटाळली होती. कॉरीडोर मधून पूढे जात ती वाईन पिण्यासाठी डीजे बारमधील कांऊटर पाशी पोहोचली.
तीने रोमँनो अँपल ऑर्डर केली होती.
डीजेवर रंगीबेरंगी फोकसच्या तालात अनेक जण आपआपल्या दिलखोचक अदांवर बेफीकीर नाचत होते.
पण रोमँन्टीक डान्स करणांऱ्या एका प्रेमी जोडप्यांने माञ बारमधील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
अचानकच जहाजातील खालच्या भागातून आपलं आवडतं गाणं गूणगूणतच स्टीफनने ईजींन रूममध्ये प्रवेश केला.
" चूप स्टीफन चूप शांत बस आवाज कमी कर. ऐकलसं तू जहाजातील मूख्य ईजींमध्ये काहीतरी गडबड आहे "
कँप्टन स्मीथ कधी नव्हे ते अचानक अस्वस्थ झाले होते. कदाचीत त्यांना कसल्यातरी भंयकर आवाजाची चाहूल लागली असावी.

" तर मग मीञानो......सूरू करूया ?"
ग्लोरीटाने हॉलमध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांवरून तीची भीरभीरती नजर फीरवली आणी रीव्हर्स कांऊटीग सूरू केली.

टेन.....नाईन.....एट......सेव्हन......सीक्स....फाईव.....फोर.....थ्री.....टू.....वन
विल्यमने केक कापला आणी
एकच जल्लोश झाला. प्रत्येकानी आपआपली वाईनची ग्लासं वरती ऊचांवली. मेरी क्रीसमस व हँपी क्रीसमस च्या जयघोषाने क्षणार्धात अवघं जहाजच दूमदूमून गेलं. त्यातच भर म्हणून की काय हॉलमधील कॉरीडॉरमधून अचानकच रंगींबेरंगी फूग्यांची बरसात होऊ लागली. जो तो हसत खीदळत प्रत्येकाला क्रीसमसच्या खूप खूप शूभेच्छा देत होता. सर्वाचे डोळे आत्यंतीक खूशीने भरून आले होते.
कीचनमध्येही क्रीसमसचं सेलीब्रेशन अगदी दणक्यात होत होतं.
डीजे बारमध्ये तर बेफीकीर तरूणाईने नूसता धूडगूसच घातला होता. एलीनाने एका घोटातच वाईनची आख्खा ग्लास रीकामा केला आणी डीजेच्या तालावर नाचण्याचा रोख धरला.
त्या प्रेमी जोडप्यानी तर एकमेकांच्या ओठांच आकर्षक चूबंन घेऊन सेलीब्रेशन केलं होतं.
हॉलमध्ये बर्थडे वीश करण्यासाठी अनेक जणांनी विल्यमचा पीच्छा पूरवला. सगळीकडेच आत्यंतीक सूखाचे वातावरण निर्माण झालं होतं. खरंतर त्या भव्य जहाजात आंनदाला पारावा ऊरला नव्हता.
विल्यमचा बर्थडे असूनही त्याच्या वााईफने एक साधा मँसेजही त्याला केला नव्हता. म्हणून फोन करण्यासाठी त्याने तीचा नबंर डायल केला तर तीने मूद्दामूनच फोन स्वीच ऑफ करून ठेवला.
" आता माञ हद्दच पार झाली हीची "
तीचा फोटो पाहून विल्यम आणखीनच चवताळला. त्याने रागाच्या भरात हातातील मोबाईलच पाण्यात फेकून दिला.
कॉरीडॉरमधून पूढे जाता जाता स्मीथ घाईघाईतच मूख्य ईजींन रूममध्ये शीरले होते. ते ट्रान्सफरन्स मीररजवळ गेले आणी त्यांनी हातातील लांबलचक दूर्बीनीने बाहेर पाहीलं.
" ओ माय गॉड "
नकळतच त्यांच्या आवाजात कमालीचा बदल झाला होता. त्यांनी बाजूच्या रडारावर एक पूसटशी नजर टाकली.
रडारातील बिघाडामूळे त्यावर फक्त ईलेक्ट्रॉनीक लहरीच दिसत होत्या.
आणी मग अचानकच जहाजाच्या डेकवरील टेहळणी पथकाकडून धोक्याची घंटा वाजवण्यात आली.
त्याबरोबर काही क्षणातच स्मीथनी आक्रमक पावीञा घेतला. त्यांनी भीरभीरत्या नजरेनं बाहेर पाहीलं. कधी नव्हे ती भीती त्यांच्या डोळ्यात दाटून आली होती.

" ताबडतोब जहाज ऊजवीकडे घ्या
ऊजवीकडचं ईजींन फूल रीवर्स मध्ये घ्या "
स्मीथ मोठ्याने ओरडतच मूख्य ईजींनजवळ गेले.
त्याचां घाबरण्याचा अर्थ अजूनही कोणालाच समजला नव्हता. ते ईतक्या घाईत होते की डेट्युपी चीफ ईजीनींअरला ढकलून त्यांनी स्वःच मूख्य ईजीनचा ताबा घेतला.
बहूतेक खराब हवामानामूळे जहाजाच्या होकायञांतही बिघाड झाली होती. त्यामूळे आता बो ईजीनच्या कट्रोलं पँनलचाच फक्त जहाजाची दिशा ठरवण्यासाठी वापर होत होता.
तेवढ्यात विल्यम सीगरेट पेटवून रागाच्या भरात पून्हां डेकवर आला. बाहेरील मोकळ्या आभाळात सगळीकडेच दाट धूक्यांच सावट पसरलं होतं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत विल्यमने वाईनचा ग्लास तोडांला लावला. आणी अचानकच समूद्रातील निथळ पाण्यात एकाएकी विलक्षण हालचाल होण्यास सूरवात झाली. त्या पाण्यातील ओघाकडे पाहता पाहता विल्यमने समोरून येणाऱ्या रहस्यमयी आवाजाच्या दिशेने नजर टाकली. त्या आवाजाचा रोख क्षणाक्षणाला वाढत होता.
आणी दाट धूक्यामध्ये लपलेल्या एका साठ-सत्तर फूटी विशाल लाटेमागून आकाशातील चंद्र अचानकच दिसेनासा झाला.

विल्यमने एखादं वाईट स्वप्न तर पाहीलं नव्हतं ना.

क्षणार्धात त्याच्या अंगावर सळसळून काटा आला. हदयाचा ठोका चूकणे म्हणजे काय याचा आता तो प्रत्यक्ष अनूभव घेत होता.
त्यांने नीट पाहीलं ती प्रचंड लाट विजेच्या चपळाईने जहाजाच्याच दिशेने सरकत होती. अखेर कसाबसा जीव मूठीत घेऊन मागच्यामागे पळाला.

अजूनही बो ईजीनच्या पँनलवर जहाजाची पोसीशन दिसत होती.

" कम ऑन डिस्कवरी कम ऑन
मूव्ह, मूव्ह, मूव्ह अगेन "
कँप्टन व त्यांचे कैशल्यवान सहकारी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून त्या जहाजाची दिशा वळवण्याचा आतोनात प्रयत्न करत होते.
ती प्रचंड लाट जीवघेण्या आवेशात जहाजाच्या दिशेने सरकली. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणी मग सर्वच संपणार होत.
कँप्टन स्मीथ एमजन्सी अँड्याप्टरजवळ ऊभ्या असलेल्या चीफ ईजीनीयर पून्हां मोठ्याने ओरडले.

" हँमड डावीकडे,
डाव्या बाजूला क्लशचं बटन दाब "
हँमडने क्षणार्धत क्लशच बटन दाबलंही परंतू तोपर्यतं खूपच ऊशीर झाला होता.
फक्शंन हॉलमधील नाचगाण्याच्या गडबडीत अजूनही कोणालाच परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. बेफीकीर तरूणाई ग्लोरीटाच्या दिलखेचक लहरीवर थीरकत होती.
कोणी वाईन पीण्यामध्ये मग्न होता तर कूणी सीगारेटचे झूरके मारून डान्स करण्यात तल्लीन झाला होता. प्रत्येकजण आपआपल्या हातातील टेडी बीयर, फूगे व अशा अनेक कीतीतरी वस्तू वरती ऊंचावून जल्लोष करत होता.
तेवढ्यात स्टेजवरील बँक ऑफीसमधून अचानक आलार्म झाला.
" सर्व ऑफीसरनी ताबडतोब आपल्या ईमर्जन्सी स्टेशनवर रिपोर्ट करा
प्रवाशांनी सावधान होत जबरदस्त झटक्यासाठी तयार राहा "
आणी सर्वांची एकच धांदल ऊडाली प्रत्येकजण आरडाओरडा करत वेड्यासारखा धावू लागला.
त्या क्षणी रॉबेनही फक्शंन हॉलमध्ये ऊपस्थीत होता. त्याच्या समोरच एका आईची तीच्या चीमूकल्या मूलापासून ताटातूट होत होती. ती मोठ्याने ओरडली.

" तू थांब तीथेच, मी आले तूझ्याजवळ "

तेवढ्यात पून्हा आलार्म वाजवण्यात आला.
" मी पून्हा रीपीट करतोय
सर्व ऑफीसरनी ताबडतोब ईमर्जन्सी स्टेशन वर रिपोर्ट करा.
प्रवाशानी सावधान व्हा.
सर्व प्रवाशांनी जबरदस्त झटक्यासाठी तयार रहा "

ऐव्हाना विल्यमही धावतच फक्शंन हॉलपर्यतं पोहोचला होता. सर्वाचीच धांदल ऊडालेली पाहून तोही पून्हां ईकडेतीकडे धावू लागला. त्या भयान आरडाओरडीत जो तो आपआपला जीव वाचवण्याचे अतोनत प्रयत्न करत होता.
काही क्षणातच ती विशाळ लाट प्रचंड आवाज करत जहाजाच्या अगदीच जवळ येऊन पोहोचली.
ईजींन कम्पार्टमेटमधील सर्वच कर्मचारी आता हतबल झाले होते. त्यांनी शेवटी हार मानली. प्रत्येकालाच मृत्यूची हाक स्पष्ट ऐकू येत होती. ते सर्वच कर्मचारी अखेर लाटेच्या जीवघेण्या ओघाकडे बघत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागे धावले.
एव्हाना त्या प्रचंड लाटेने विशाल जहाजाचा ताबा घेतला होता. क्षणार्धात पाण्याचे मोठमोठे ओघ जहाजाच्या भक्कम काचा फोडून आत शीरले.
काही वेळातच पाण्याच्या बेसूमार अंतरीक शीरकावाने संपूर्ण ईजींन कम्पार्टमेटंच ऊध्वस्त झाला. मूख्य फ्यूझ मधील असंख्य तारांचे एकमेकांवर घर्षण होऊन मोठमोठ्या वीजेच्या चिगार्या ऊडू लागल्या.
फक्शंन हॉलमधील अवस्था तर आता त्यापेक्षाही दयनीय झाली होती. अचानक आलेल्या लाटेच्या प्रचंड ओघाने त्या भव्य जहाजाला आडवं केलं होतं. स्टर्नकडील बाजूने ते संपूर्ण जहाज ऊलटं होत होतं. आणी त्याबरोबरच जहाजातील असंख्य प्रवाशी हॉलमधील भीतींवर जोरजोरात आदळून त्यांचा जीव गमावत होते. प्रत्येकजण मीळेल त्या वस्तूचा आधार घेत स्वतःला खाली घसरत जाण्यापासून वाचवत होता. तर काही टेबल खूर्चाच्या आवेशाबरोबरच नकळत ओढले जात होते.
ऐव्हाना स्वीमीग पूलमधील कँमीकल विरहीत पाणीही सगळीकडे पसरून बाहेर पडण्यास सूरूवात झाली होती.
डीजे बार मधील एक मोठा फोकस लाईटीचा खांब अचानक खाली पडून ऊध्वस्त झाला होता. सगळीकडेच पाण्याने आपला जोर दाखवण्यास सूरूवात केली होती. प्रत्येकजण मिळेल त्या वस्तूचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. अनेकजण ऊघड्या कॉरीडॉरमधून खाली पडून मरत होते. कोणी आतीव वेदनेने कीचांळत होता. तर कोणी जीवाच्या आंकाताने डोळे मीठून या जगाचा निरोप घेत होता.
कीचनमधील भांड्याच्या कलकलाटाने तर ऊच्चाकंच गाठला. कधी नव्हे ती जीवीतहानी एका क्षणार्धात घडून आली होती.
फंक्शन हॉलमधील पाचही जनरल लीफ्टनी पीलर सहीत खाली पडतांना अनेकांचे जीव घेतले होते.
बघता बघता त्या संपूर्ण जहाजानेच कलाटणी घेतली. जहाजाचा डेकवरील भाग पाण्याखाली गेला होता. फक्त बॉयलर रूम्स व प्रोपेलर कँबीनेटचाच काही हीस्सा बूडण्यापासून वाचला होता. ते जहाज केवळ एका बूडबूड्याप्रमाणे पाण्यावर तरंगत होते. अजूनही प्रत्येक ठिकाणी अनेक मोठमोठी विस्फोटं होत होती.
सर्व शांत झालेले वाटत असताना अचानकच कीचमधील गँस टर्बाईनमध्ये स्फोट होऊन एक मोठा आगीचा ओघ सळसळत बाहेर आला त्या भडक्याने क्षणार्धात अनेकांना भस्म करून टाकले होते.
ती भयाण राञ क्षणाक्षणाला आणखीणच जीवघेणी ठरत होती. पाण्याखाली संपूर्ण ईजींन कम्पार्टमेट ऊध्वस्त झाला होता. त्यात पाण्याच्या अभीरत शीरकावाने मेलेल्या कर्मचाऱ्याचे शव अधांतरी तरंगत होते.
सूदैवाने प्रोपेलरच्या दोन महाकाय पंखानी अजूनही जीव सोडला नव्हता. त्यामूळेच की काय ते जहाज आतापर्यतं बूडण्यापासून वाचले होते.
अखेर हळूहळू जहाजाच्या हालचालीची गती काही अंशी कमी झाली. व फंक्शन हॉलमधील मूख्य सेटवर सर्वजण आपआपला जीव वाचवण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने एकञ गोळा झाले. तीथली अवस्थाही काही फार वेगळी नव्हती
या सर्वच गडबडीत जँकने कॉरीडोर मधील एका भक्कम पीलरला शेवटपर्यतं कसंबसं पकडून ठेवलं होतं. एलीजाबेथच्या पायालाही गंभीर जखम झाली होती. तीला धड ऊठताही येत नव्हतं.
थोड्यावेळाने जँकने त्या दोघींना सावरत ऊभं राहण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
आणी तेवढ्यात ज्युलीला अचानकच समोरून पाण्याचा एक मोठा ओघ त्यांच्या दीशेने सळसळत येताना दिसला. ते तीघंही जीव मूठीत घेऊन वेड्यासारखे धावू लागले. व कसेबसे रॉनच्या रूमपर्यतं पोहोचले. काही क्षणातच पाण्याचा ओघ त्यांच्या खूपच जवळ येऊन पोहोचला होता. जँकने कॉरीडॉरचा मूख्य हँच अगदी शेवटच्या क्षणी बंद केला. जर तो हँच बंद करण्यात त्याला थोडाजरी ऊशीर झाला असता तर ते तीघंही पाण्याच्या प्रवाहात अडकून क्षणार्धात जलमग्न झाले असते.
त्यांनी पाहीले रॉकीच्या रूमचा दरवाजा आतूनच बंद होता.

" ते दोघं अजूनही त्यांच्या रूममध्येच आहेत. आपल्याला त्यांना आता लवकरात लवकर वाचवायला हवं "

जँकने आक्रमक पावीञा घेत रॉनला मोठ्याने आवाज दिला पण आतून कोणतेच प्रतीऊत्तर येत नव्हते.

जेव्हां जहाजाला ती प्रचंड लाट धडकली होती. तेव्हां विन्डोच्या काचा फूटून रॉकीच्या रूममध्ये झपाट्याने पाणी शीरले होते. आणी अचानकच रॉनच्या हातून त्यांच्या रूमची चावी पाण्यात पडून कूठेतरी दिसेनाशी झाली होती.

जँकने रॉनला पून्हां मोठ्याने हाक दिली.
" रॉन लवकरात लवकर चावीने दरवाजा खोल
नाहीतर सर्वच पाण्याच्या ओघाबरोबर वाहून जातील "

त्यांची संपूर्ण रूम आता पूर्णपणे पाण्याने भरत आली होती. फक्त श्वास घेण्यासाठी कींचीतशी जागाच काय ती वरच्या भागात शील्लक होती.
अखेर रॉनने फार वेळ न घालवता चावी शोधण्यासाठी पाण्यात वेगाने झेप घेतली. त्याला काहीच स्पस्ट दिसत नव्हतं. तो हतबल झाला होता. त्याच्या तोडांत वेगाने पाणी शीरू लागलं. तो काही क्षणातच बूडून मरणार होता.
जँक पून्हां एकदा मोठ्याने ओरडला.
एव्हांना त्यांचा संपूर्ण रूम पाण्याने व्यापला होता. आणी दरवाजाच्या खालच्या फटीतून पाणी बाहेर येण्यास सूरूवात झाली होती. जँकही बाहेरून मोठमोठे हूंदके देत दरवाजा तोडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला दरवाजाच्या खालच्या भागात असलेल्या मीनी डोरची आठवण झाली. त्यांना जेवणाची ताटं त्या डोरमधून आत देण्यात येत असत. जँकने लगेचच तो मिनीडोर ऊघडला मग त्यामधून पाणी बाहेर येण्यास सूरूवात झाली. पण रूममध्ये झपाट्याने शीरणाऱ्या पाण्याच्या तूलनेत त्या मिनी डोरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.
अखेर रॉकीने शेवटचा प्रयत्न म्हणून पून्हा एकदा तळाच्या दिशेने झेप घेतली आणी दैवाने साथ द्यावी तशी रूममधील एका कोपऱ्यात कपाट्याच्या हँन्डलला अडकलेली चावी त्याच्या नजरेत आली. ती चावी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात असतानाच रॉकीने चावीच्या दिशेने हात केला निव्वळ योगायोगाने त्याच्या कंरंगळीत ती अडकली गेली.
खूप वेळ पाण्यात बूडून राहील्यामूळे त्याच्या शरीरातील स्नांयूचा आकार वाढत जात होता. त्याची शूद्ध हरपत होती.
पण कदाचीत त्याच्या अांतरीक ईच्छाशक्तीने अजूनही हार मानली नसावी. नकळतच त्याचे हात लॉकच्या दिशेने जात होते. त्याने चावी लावली पण ती फिरवण्याचे प्राणही त्याच्या कमजोर बाहूत ऊरले नव्हते. तेवढ्यात रूममधील मोडलेल्या पंख्याचा त्याच्या हाताला हलकासा स्पर्श झाला आणी त्याची कीचीतंशी हालचाल झाली. ती एक हालचालच त्याचा जीव वाचवण्यासाठी निमीत्त ठरली होती. कारण त्या छोट्याशा हालचालीमूळेच त्याचा हात नकळतच फीरला गेला व त्याबरोबरच त्याच्या हातातील चावीही डावीकडे फीरवली गेली. अचानक जलद वेगाने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत ते दोघंही एकञच बाहेर आले होते.
त्याच संधीचा फायदा घेत बाहेर ऊभ्या असलेल्या तीघांनीही ताबडतोब क्षणाचाही विलंबं न करता आपली संपूर्ण शक्ती एकवटून ते दार कंसबसं बंद केलं.
जँकने रॉनची नाडी तपासून पाहीली. सूदैवाने दोघांच्याही श्वसनक्रीया अद्ययावत सूरू होत्या.
सात आठ जोराचे हूदंके देताच रॉकीच्या शरीरात शीरलेले पाणी तोडांमार्फत बाहेर पडले. प्राणवायूच्या कमतरतेमूळे त्याची शूद्ध हरपली होती. रॉनही खोकतच कसाबसा जीवंत होता. त्याची स्पदंने वाढू लागली व तो एकाएकी भानावर आला.
त्यांना आता विश्रांतीची अतोनात गरज होती.
केवल नशीबानेच त्यां दोघांचा जीव वाचवला होता. मग ती पोरं ऊध्वस्त झालेल्या कॉरीडोरमधून हळूहळू मार्ग काढत फंक्शन हॉलमधील जमावापर्यतं पोहोचली.
एव्हांना विल्यमने पायावरचा मोठा टेबल सरकवून त्याचा जखमी पाय बाहेर काढला होता. त्याच्या समोरच एक जण आगीने जळत आतीव वेदनेने कींचाळत होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांने जीव सोडला.
त्याच्या बाजूलाच एक स्ञी मरून पडली होती.
डीजे बारमध्ये तर खूपच दयनीय अवस्था झाली होती. गाण्याच्या तालावर थीरकणाऱ्या त्या यूवकाचे पाय फोकस लाईटच्या मोठ्या खाबांखाली जखडले गेले होते. त्याची प्रेयसी त्याला बाहेर खेचून काढ्याचे अतोनात प्रयत्न करत होती. आणी आक्रोशाने मदतीसाठी किंचाळतही होती. पण कोणीच दाद देईना.
त्या स्ञीच्या आवाजने ऐलीना अचानकच भानावर आली तीच्या भीजलेल्या पापणीची हलकीशी ऊघडझाप होत होती. ती अजूनही जीवंत होती यावर तीचा विश्वासच बसत नव्हता. अखेर स्वतःला कसंबसं सावरत एलीनाने त्या दोघांच्या मदतीसाठी धाव घेतली.
त्या दोघींनीही एकञच त्या यूवकाच्या पायावर पडलेला मोठा खांब ऊचलण्याचा निष्फळ प्रयत्न केला. डीजेबारमधील बहूतेक जण तर शॉक लागूनच मरण पावले होते.
एव्हांना जहाजाच्या चीफ सीक्यूरीटी ऑफीसरने फंक्शन हॉलचा ताबा घेतला होता. मग जहाजातील प्रवाशांना धीर देण्याच्या ऊद्धेशाने त्याने पूढाकार घेत सर्वानां शांत केले व बोलायला सूरूवात केली.

" आमचा अजूनही यावर विश्वास बसत नाही.
आपल्याला हे ठामपणे सांगता येणार नाही की हे नक्की काय होतं.
पण अगदी शेवटच्या क्षणी जहाजाच्या टेहळणी पथकाकडू मिळालेला संदेश खूप महत्वाचा होता. जी प्रचंढ लाट आपल्या जहाजाला धडकली त्या लाटेला आपण शास्ञीय भाषेत त्सूनामी म्हणू शकतो.
हो त्सूनामीच
त्यांची भवीष्यवाणी होत नाही व त्या जीवघेण्या असतात.

आणी आता चांगली बातमी
ज्या वेळेला ही प्रचंढ लाट जहाजाला धडकली होती. तेव्हां ताबडतोब एमर्जन्सी जी. पी. एस. लोकेटर्स सोडले गेले होते.
तूम्ही काळजी करू नका जहाजातील सर्वच प्रवाशांना काही तासातचं वाचवलं जाईल.

" तूम्हाला काय म्हणायचं आहे आपण बूडणार आहोत. अशावेळी आम्ही हातावर हात ठेवून शांत बसायचं का ?"
जमावामधील एक स्ञी मोठ्याने ओरडली. तीचा पती आगीत जळून मरण पावला होता.

" आपण सर्व कसे वाचणार आहोत यातून,
तूम्ही काही सांगू शकाल "
पून्हां आणखीन एक प्रवासी ओरडला.
आणी मग सर्वानीच त्या सूरक्षा अधीकाऱ्याला थाऱ्यावर धरण्यास सूरूवात केली. बघता बघता हॉलमध्ये पून्हां आरडाओरडा सूरू झाला.

" प्लीझं, प्लीझ सर्वानी शांतता राखा.
स्वतःवर मेहेरबाणी करून माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा.
या रूमने एका विशाल बूलबूल्याप्रमाणे जहाजाला ऊचलून धरलं आहे.
जेव्हा हे भारी दरवाजे बंद होतील तेव्हां आपण सर्वच आग, गँस व पाण्याच्या लीक पासून सूरक्षीत राहू.
अगदी कोणत्याही परीस्थीतीत आपल्याला वाचवलं जाईल "
त्या सूरक्षा अधीकाऱ्याचे बोलणे सूरू असतानाच ज्युलीने जँककडे पाहीलं तो ऊभा राहून मोडलेल्या टेबलाखाली काहीतरी शोधत होता.
" जँक तू एकटाच काय करत आहेस ?
मला सांगशील का जरा "

" या हॉलमधून बाहेर पडण्याची तयारी "

" काय ?"

" हो,
आपल्याला आता लवकरात लवकर या हॉलमधून बाहेर पडायला हवं. जर अाणखीन थोडावेळ आपण या हॉलमध्ये वाट पाहत राहीलो तर आपला मृत्यू अटळ आहे. मग माञ आपल्याला मरणापासून कोणीच वाचवू शकत नाही, अगदी आपण स्वतःही "

" वेडा झालायेस का तू जँक काहीही काय बडबडतोयेस.
खरंतर ईथे हॉलमध्येच सर्वजण अगदी सूरक्षीत आहेत आणी तू म्हणतोयेस आपण ईथून बाहेर पडायचं.
तो सूरक्षा अधीकारी काय सांगत होता ते तू ऐकलंस ना.
त्यांनी जी. पी. एस. लोकेटर्स सोडले आहोत. त्यामूळे आपल्याला काही तासातच वाचवलं जाईल.........तू ईथून कूठेही जाणार नाहीस....कळलं "

" त्याच्या गोड बोलण्यावर तूम्ही सर्व विश्वास ठेवू नका. तो एक नबंरचा खोटारडा आहे. केवळ प्रवाशांना धीर देण्यासाठी व शांत ठेवण्यासाठीच तो असं बोलत आहे.
तूम्हांला जर खरंच माहीत नसेल तर मी पून्हां एकदा सांगतो "

" आता काय आणी ?"

" हे जहाज काही तासातच संपूर्णपणे ऊध्वस्त होऊन समूद्राच्या तळाशी जाणार आहे "

क्रमशः
पुढील भाग लवकरच.................

भाग ११साठी
http//www.maayboli.com/node/61962
भाग १२ साठी
http//www.maayboli.com/node/62010
भाग १३ साठी
http//www.maayboli.com/node/62075
भाग १४ साठी
http//www.maayboli.com/node/62152

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग खुपच थरारक होता...!! असे वाटतय की, आता 'टायटानिक' सुरु झालाय आणि लवकरच 'समंदर के लुटेरे' सुरु होइल...!! 'द जर्नी फ्रॉम टायटानिक टु पायरेट्स ऑफ क्यारेबियन व्हाया किंग काँग'......!!! असेच काहीसे होईल पुढे...!!!

टायटॅनिक आणि पोसायडन दोन्ही सिनेमांमध्ये असाच काहीसा घडलेला दाखवलाय. गोष्टीत त्सुनामी ने ट्वीस्ट आलाय. रहस्य कथा असल्यामुळे साहजिकच पुढचे कयास बांधले जातायत गोष्ट वाचून पण बांधलेले अंदाज चुकीचे ठरलेत. अशीच नवीन वळणे येऊ द्या.पुढील भागाच्या प्रतीक्षेत.