निसर्ग

बुलबुल येती आमच्या घरा...

Submitted by अ'निरु'द्ध on 17 May, 2017 - 06:11

बुलबुल येती आमच्या घरा...
(The Bulbul Babies At Our Balcony)

(Red Vented Bulbul)

मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती - भाग दोन (अंतिम)

Submitted by स्वच्छंदी on 16 May, 2017 - 15:24

(पहील्या भागातून...)

फायनली आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठीकाणी पोचलो होतो. गेल्या ट्रेकच्या वेळेला जिथे राहीलो होतो तिथेच शाळेत पाठीवरच्या बॅगा उतरवल्या आणि स्वस्थ बसून राहीलो. आजच्या दिवशी बोरवाडी ते घोळ व्हाया मानगड, कुंभे घाट असा जबराच पल्ला झाला होता.

जरावेळानी उठून फ्रेश झालो जवळचे आणलेले खाल्ले आणि लगेच झोपेच्या स्वाधीन झालो.
_______________________________________

दिवस दुसरा:

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १७

Submitted by Mayur Mahendra ... on 5 May, 2017 - 01:15

त्या जहाजातील जीवघेण्या संघर्षातून त्यांनी यशस्वीरीत्या स्वतःची सूटका करून घेतली होती.

" आपल्याला पाण्यात ऊड्या माराव्या लागतील. आणी ह्या बूडणाऱ्या जहाजापासून लवकरात लवकर दूर जावं लागेल.
नाहीतर आपण पून्हा या जहाजाच्या घेऱ्यात अडकून स्वतःचा जीव गमावून बसू "
कँप्टन स्मीथनी सर्वाना ओरडून सांगीतले.
मग प्रत्येकाने प्रोपेलर ट्यूबमधील तूटलेल्या फँनला बाजूला करत थंडगार पाण्यात ऊड्या घेतल्या.
त्या हाडं गोठवणाऱ्या पाण्यातून पोहत पूढे जाताना सर्वाचीच बिकट अवस्था झाली होती. पण अखेर प्रत्येकाचाच नाईलाज होता.

शब्दखुणा: 

श्रीनगर ट्युलिप गार्डन भाग 1

Submitted by कांदापोहे on 3 May, 2017 - 01:28

मार्च महिन्यात काश्मिरला फिरायला जायचे निश्चित झाल्यावर जवळची ठिकाणे त्या बद्दलची माहिती वाचताना 2 3 ठिकाणी अचानक कळले की साधारण आम्ही ज्या आठवड्यात श्रीनगर मध्ये जाणार त्याच आठवड्यात वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते .

श्रीनगर मधल्या सिराज बागेत वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते व मार्चच्या पहिल्या आठवड्यात 15 दिवस ही बाग पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरते.

1 एप्रिल ला उदघाटन सोहळा होता व आम्ही 30 मार्चला श्रीनगरला पोचलो होतो. पोचल्या पोचल्या आमच्या ड्रायव्हरने सांगितले की आपण ट्युलिप गार्डनला जाऊ शकतो. वेळ होताच त्यामुळे बाकी काही न बघता पाहिले या बागेत गेलो.

सांज शृंगार

Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2017 - 02:14

रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर

काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर

पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर

कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......

जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by सेन्साय on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

Submitted by मार्गी on 19 April, 2017 - 10:51

नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

दि. ३ जुलै २०१६
प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी!

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १६

Submitted by Mayur Mahendra ... on 16 April, 2017 - 05:41

" हे जहाज काही तासातच संपूर्णपणे ऊध्वस्त होऊन समूद्राच्या तळाशी जाईल "

" काहीही मूर्खासारखं बडबडू नकोस जँक "

" हो, तो खंर बोलतोयं. माझाही ह्या गॉल्टच्या सूरक्षा पथकावर फार विश्वास नाही.
मी एक आर्कीटेक्ट आहे.
ह्या जहाजाची रचना अशा पद्धतीने करण्यातच नाही आली, की हे ऊलटं होऊनही शेवटपर्यतं पाण्यावर तरंगत राहील.
त्यामूळे आपल्याला आता लवकरात लवकर या हॉलमध्ये पाणी भरण्याच्या अगोदरच ईथून बाहेर पडायला हवं "
मी. रॉबेननी जँकच्या बोलण्याला दूजोरा देत सर्वाचीं समजूत काढली.

शब्दखुणा: 

किस्से आणि निरीक्षणं (भाग ९)....”तन्मय”- एक रहस्यमय प्रवास.

Submitted by बग्स बनी on 13 April, 2017 - 19:22

आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता.

खग ही जाने खग की भाषा -भाग ८ सातताल नैनीताल उत्तराखंड

Submitted by कांदापोहे on 7 April, 2017 - 02:44

भारतात पक्षीनिरीक्षकांची पंढरी म्हणता येईल अशी ३-४ महत्वाची ठिकाणे आहेत. सह्याद्री किंवा पश्चिम घाट (Western Ghat), कच्छचे रण, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड. यापैकी या आधी पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांविषयी मी लिहीलेले आहेच. आत्ता पर्यंत महाराष्ट्र कर्नाटका व गोवा या भागात फिरुन झाले आहे. तमिळनाडु, केरळा, पश्चिम बंगाल, गुजराथ व अरुणाचल अजुनही झालेले नाही.

Pages

Subscribe to RSS - निसर्ग