मार्च महिन्यात काश्मिरला फिरायला जायचे निश्चित झाल्यावर जवळची ठिकाणे त्या बद्दलची माहिती वाचताना 2 3 ठिकाणी अचानक कळले की साधारण आम्ही ज्या आठवड्यात श्रीनगर मध्ये जाणार त्याच आठवड्यात वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते .
श्रीनगर मधल्या सिराज बागेत वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते व मार्चच्या पहिल्या आठवड्यात 15 दिवस ही बाग पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरते.
1 एप्रिल ला उदघाटन सोहळा होता व आम्ही 30 मार्चला श्रीनगरला पोचलो होतो. पोचल्या पोचल्या आमच्या ड्रायव्हरने सांगितले की आपण ट्युलिप गार्डनला जाऊ शकतो. वेळ होताच त्यामुळे बाकी काही न बघता पाहिले या बागेत गेलो.
आशियातील सर्वात मोठी ट्युलिपाची बाग म्हणून या बागेची ख्याती असून दरवर्षी 20 लाख ट्युलिपची रोपे व साधारण 46 विविध जाती या बागेत लावल्या जातात. बहार ए काश्मीर असे 15 दिवसांचे हे प्रदर्शन असते. दरवर्षी साधारण 1 ते 2 लाख पर्यटक या बागेला भेट देतात व त्यातून साधारण 50 ते 60 लाखाचे उत्पन्न मिळते.
बागेत पोचल्या पोचल्या शेजारच्या बागेतील या झाडाकडे माझे लक्ष गेले. माझ्या अंदाजाप्रमाणे हे चेरीचेच झाड निघाले. गेले अनेक वर्ष जपानला चेरी ब्लॉसमच्या दिवसात जाण्याचा योग नाही म्हणून हळहळत होतो. अनेक मित्रांचे जपानच्या चेरी ब्लॉसमच्या फोटो बघत होतो आणि अचानक निसर्गाने समोर चेरीचे फुललेले झाडच उभे केल्यावर तिकडे पळ काढला.
लेकीचे काश्मिरी कपड्यात फोटो सेशन चालू होते व मी चेरीच्या झाडाची वेगवेगळ्या कोनातून प्रकाशचित्रे घेण्यात मश्गुल होतो.
ट्युलिपची अनंत वेगवेगळी फुले बघण्यात बराच वेळ गेला. आम्ही खूपच लवकर गेल्याने अजूनही काही वाफ्यात फुले उमलायची होती.
जिकडे तिकडे आशा पद्धतीचे ताटवे आहेत. ही बाग साधारण 30 हेक्टर एवढी मोठी आहे.
ट्युलीप १
ट्युलीप २
इथेच अचानक इतरही अनेक फळझाडांना फुले आली होती.
काही ताटव्यांमध्ये चुकून दुसऱ्या रंगाचे फुलही दिसत होते.
या फुलांनी पूर्ण वृक्ष डवरला होता.
आपल्याकडे बोगनवेल जशी अनेक कुंपणावर दिसते तशी ही फुले श्रीनगर मधल्या अनेक घराच्या कुंपणावर दिसली. ट्युलिप गार्डन याला अपवाद नव्हती.
फोर्सिथिया Forsythia
जवळून बघितलं तेव्हा ती किती नाजूक आहेत हे जाणवले.
फोर्सिथिया Forsythia
याच बागेत ट्युलिप सोबत अनेक फुलझाडे होती त्यापैकी हे एक.
या फुलाचा फोटो घ्यायला साष्टांग नमस्कार घालावा लागला. वरीलपैकी अनेक फुले अत्यंत सूक्ष्म असून खरेतर त्याच्या आकाराचा अंदाज यावा या करता शेजारी काहीतरी ठेवायला हवे होते.
प्रवेशद्वारापासून आतमध्ये या फुलांचे ताटवे होते.
तळटीप:
Nikon D7100
Lens 17-50 Wide Angle
90 MM Micro Lens
Mobile Camera
हा भाग एक आहे व फोटो दिसत नसतील तर कळवा. घरी जाऊन दुरुस्त करतो. भाग दोन मध्ये फक्त ट्युलिप असतील.
मस्तच रे!
मस्तच रे!
मला आगीच्या कोल्ह्यातून फक्त लिंक दिसताहेत. त्यावर क्लीक केले की फोटो.
मस्त फोटोज , पूर्ण ताट्व्याचे
मस्त फोटोज , पूर्ण ताट्व्याचे फोटोज देता येत असतील तर बघ .
फोटो मस्त आहेत. फक्त लिंक
फोटो मस्त आहेत. फक्त लिंक दिसत आहेत, त्यावर क्लिक केले की फोटो दिसत आहेत.
हो मोबाईलवरुन फोटो द्यायचा व
हो मोबाईलवरुन फोटो द्यायचा व लेख लिहायचा प्रयत्न होता. तो फसलाय वाटतं.
केले दुरुस्त. आता बघा
केप्या मस्त रे !
केप्या मस्त रे !
केप्या, मला सगळे फोटो दिसत
केप्या, मला सगळे फोटो दिसत नाहीयेत. प्लीज एकदा चेक करतोस का काय गंडलंय ते?
पिवळी फुलं फोर्सिथियाची आहेत
कुंपणावरची पिवळी फुलं फोर्सिथियाची आहेत - बाकी बरेच फोटो मला दिसत नाहीयेत.
मस्त रे केप्या, छान आहेत फोटो
मस्त रे केप्या, छान आहेत फोटो ...........
बरेच फोटो मला दिसत नाहीयेत.>>
बरेच फोटो मला दिसत नाहीयेत.>> मला पण
जी दिसत आहेत ती सुंदर आहेत
काही थोडेच फोटो दिसतायेत, ते
काही थोडेच फोटो दिसतायेत, ते सुपर्ब आहेत.
४-५ फोटो दिसलेत. खूप सुंदर
४-५ फोटो दिसलेत. खूप सुंदर क्लिक्स आहेत.
धन्यवाद!! तपासतो परत एकदा.
धन्यवाद!! तपासतो परत एकदा.
स्वाती नाव लिहितो
केपी, सुंदर!! फोटो अगदी!
केपी, सुंदर!! फोटो अगदी!
पण काही फोटो दिसत नाहीत असे का?
सुंदर.
सुंदर.
मला मधले मधले फोटो नाही दिसले.
आम्ही मे मधे गेलो होतो तेव्हा फुले फुलून गेली होती.
तिथल्या प्रत्येक कंपाउंडवर मोठे मोठे गुलाबही होते. मला जास्त फिरता नव्हते आले तरी अविस्मरणीय आहे ती काश्मिर ट्रीप.
फोटो दिसत नाहीत असे का
फोटो दिसत नाहीत असे का
परत तपासतो काहीतरी झोल आहे
परत तपासतो काहीतरी झोल आहे
चालेल . न जाता पाहायला मिळतात
चालेल . न जाता पाहायला मिळतात हेही नसे थोडके. ही बाग पंधरा वर्षांतलीच ना? दर तीन वर्षांनी नवीन कांदे ( गड्डे) आणतात हालंडहून असे वाचले.
मधले मधले फोटो नाही दिसत
मधले मधले फोटो नाही दिसत
वॉव.. तुम्ही अॅक्चुली
वॉव.. तुम्ही अॅक्चुली काश्मीर ची ट्रिप आखली ट्युलिप्स् करता .. ग्रेट फोटोज.. अधले मधले काही फोटो दिसत नाहीत..
खूप वर्षांपूर्वी काश्मीर ला गेलो होतो पण आता तिकडल्या सेफ्टी कंडीशन्स बद्दल शंका असल्याने तिकडे जायचा प्लॅनच बनत नाही..
तुम्ही अॅक्चुली काश्मीर ची
तुम्ही अॅक्चुली काश्मीर ची ट्रिप आखली ट्युलिप्स् करता >> नाही ट्रीप आखली व नंतर कळले की ट्युलीप सिझन आहे व बघायला मिळतील.
असो. तर मंडळी आता दिसत आहेत का सर्व फोटो?
व्वा! सुंदर फोटो.
व्वा! सुंदर फोटो.
इथे बसून ट्युलिप दर्शन घडवल्यावद्दल धन्यवाद!
आ.को. मध्ये सगळे फोटो दिसले.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
जबरदस्त सुप्पर
जबरदस्त सुप्पर
अतिशय सुरेख फोटो आहेत. नशीब
अतिशय सुरेख फोटो आहेत. नशीब जोरावर म्हणायचे तुमचे की तिथे गेलात आणि ट्युलिप्स दिसले.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
वाह !!! अफाट सुंदर काश्मीरी
वाह !!! अफाट सुंदर काश्मीरी बहार... अन् क्षितीजास भिडलेल्या ट्युलिप्सच्या रंगमुग्ध सैन्य रांगा ...
धन्यवाद.
धन्यवाद.
बहर बहारदार.
बहर बहारदार.
खुप सुंदर फोटोज!!!
खुप सुंदर फोटोज!!!
धन्यवाद!! आता वेळ मिळाला की
धन्यवाद!! आता वेळ मिळाला की आणखी फोटो टाकतो.