श्रीनगर ट्युलिप गार्डन भाग 1

Submitted by कांदापोहे on 3 May, 2017 - 01:28

मार्च महिन्यात काश्मिरला फिरायला जायचे निश्चित झाल्यावर जवळची ठिकाणे त्या बद्दलची माहिती वाचताना 2 3 ठिकाणी अचानक कळले की साधारण आम्ही ज्या आठवड्यात श्रीनगर मध्ये जाणार त्याच आठवड्यात वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते .

श्रीनगर मधल्या सिराज बागेत वर्षातून एकदा ट्युलिप फेस्टिव्हल असते व मार्चच्या पहिल्या आठवड्यात 15 दिवस ही बाग पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण ठरते.

1 एप्रिल ला उदघाटन सोहळा होता व आम्ही 30 मार्चला श्रीनगरला पोचलो होतो. पोचल्या पोचल्या आमच्या ड्रायव्हरने सांगितले की आपण ट्युलिप गार्डनला जाऊ शकतो. वेळ होताच त्यामुळे बाकी काही न बघता पाहिले या बागेत गेलो.

आशियातील सर्वात मोठी ट्युलिपाची बाग म्हणून या बागेची ख्याती असून दरवर्षी 20 लाख ट्युलिपची रोपे व साधारण 46 विविध जाती या बागेत लावल्या जातात. बहार ए काश्मीर असे 15 दिवसांचे हे प्रदर्शन असते. दरवर्षी साधारण 1 ते 2 लाख पर्यटक या बागेला भेट देतात व त्यातून साधारण 50 ते 60 लाखाचे उत्पन्न मिळते.

बागेत पोचल्या पोचल्या शेजारच्या बागेतील या झाडाकडे माझे लक्ष गेले. माझ्या अंदाजाप्रमाणे हे चेरीचेच झाड निघाले. गेले अनेक वर्ष जपानला चेरी ब्लॉसमच्या दिवसात जाण्याचा योग नाही म्हणून हळहळत होतो. अनेक मित्रांचे जपानच्या चेरी ब्लॉसमच्या फोटो बघत होतो आणि अचानक निसर्गाने समोर चेरीचे फुललेले झाडच उभे केल्यावर तिकडे पळ काढला.

लेकीचे काश्मिरी कपड्यात फोटो सेशन चालू होते व मी चेरीच्या झाडाची वेगवेगळ्या कोनातून प्रकाशचित्रे घेण्यात मश्गुल होतो. Happy

ट्युलिपची अनंत वेगवेगळी फुले बघण्यात बराच वेळ गेला. आम्ही खूपच लवकर गेल्याने अजूनही काही वाफ्यात फुले उमलायची होती.

जिकडे तिकडे आशा पद्धतीचे ताटवे आहेत. ही बाग साधारण 30 हेक्टर एवढी मोठी आहे.

ट्युलीप १

ट्युलीप २

इथेच अचानक इतरही अनेक फळझाडांना फुले आली होती.

काही ताटव्यांमध्ये चुकून दुसऱ्या रंगाचे फुलही दिसत होते.

या फुलांनी पूर्ण वृक्ष डवरला होता.

आपल्याकडे बोगनवेल जशी अनेक कुंपणावर दिसते तशी ही फुले श्रीनगर मधल्या अनेक घराच्या कुंपणावर दिसली. ट्युलिप गार्डन याला अपवाद नव्हती.

फोर्सिथिया Forsythia

जवळून बघितलं तेव्हा ती किती नाजूक आहेत हे जाणवले.

फोर्सिथिया Forsythia

याच बागेत ट्युलिप सोबत अनेक फुलझाडे होती त्यापैकी हे एक.

या फुलाचा फोटो घ्यायला साष्टांग नमस्कार घालावा लागला. Happy वरीलपैकी अनेक फुले अत्यंत सूक्ष्म असून खरेतर त्याच्या आकाराचा अंदाज यावा या करता शेजारी काहीतरी ठेवायला हवे होते.

प्रवेशद्वारापासून आतमध्ये या फुलांचे ताटवे होते.

तळटीप:
Nikon D7100
Lens 17-50 Wide Angle
90 MM Micro Lens
Mobile Camera

हा भाग एक आहे व फोटो दिसत नसतील तर कळवा. घरी जाऊन दुरुस्त करतो. भाग दोन मध्ये फक्त ट्युलिप असतील. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे!

मला आगीच्या कोल्ह्यातून फक्त लिंक दिसताहेत. त्यावर क्लीक केले की फोटो.

सुंदर.
मला मधले मधले फोटो नाही दिसले.

आम्ही मे मधे गेलो होतो तेव्हा फुले फुलून गेली होती.
तिथल्या प्रत्येक कंपाउंडवर मोठे मोठे गुलाबही होते. मला जास्त फिरता नव्हते आले तरी अविस्मरणीय आहे ती काश्मिर ट्रीप.

चालेल . न जाता पाहायला मिळतात हेही नसे थोडके. ही बाग पंधरा वर्षांतलीच ना? दर तीन वर्षांनी नवीन कांदे ( गड्डे) आणतात हालंडहून असे वाचले.

वॉव.. तुम्ही अ‍ॅक्चुली काश्मीर ची ट्रिप आखली ट्युलिप्स् करता .. ग्रेट फोटोज.. अधले मधले काही फोटो दिसत नाहीत..

खूप वर्षांपूर्वी काश्मीर ला गेलो होतो पण आता तिकडल्या सेफ्टी कंडीशन्स बद्दल शंका असल्याने तिकडे जायचा प्लॅनच बनत नाही..

तुम्ही अ‍ॅक्चुली काश्मीर ची ट्रिप आखली ट्युलिप्स् करता >> नाही ट्रीप आखली व नंतर कळले की ट्युलीप सिझन आहे व बघायला मिळतील. Happy

असो. तर मंडळी आता दिसत आहेत का सर्व फोटो? Happy

व्वा! सुंदर फोटो. Happy
इथे बसून ट्युलिप दर्शन घडवल्यावद्दल धन्यवाद! Happy
आ.को. मध्ये सगळे फोटो दिसले. Happy

वाह !!! अफाट सुंदर काश्मीरी बहार... अन् क्षितीजास भिडलेल्या ट्युलिप्सच्या रंगमुग्ध सैन्य रांगा ...