" हे जहाज काही तासातच संपूर्णपणे ऊध्वस्त होऊन समूद्राच्या तळाशी जाईल "
" काहीही मूर्खासारखं बडबडू नकोस जँक "
" हो, तो खंर बोलतोयं. माझाही ह्या गॉल्टच्या सूरक्षा पथकावर फार विश्वास नाही.
मी एक आर्कीटेक्ट आहे.
ह्या जहाजाची रचना अशा पद्धतीने करण्यातच नाही आली, की हे ऊलटं होऊनही शेवटपर्यतं पाण्यावर तरंगत राहील.
त्यामूळे आपल्याला आता लवकरात लवकर या हॉलमध्ये पाणी भरण्याच्या अगोदरच ईथून बाहेर पडायला हवं "
मी. रॉबेननी जँकच्या बोलण्याला दूजोरा देत सर्वाचीं समजूत काढली.
त्यांचं बोलणं सूरू असतानाच तो सूरक्षा अधीकारी गॉल्ट व ईजींनरूममधील स्टीफन एकमेकांशी वाद घालत प्रवाशांच्या गर्दीपासून दूर जात होते.
" ऑफीसर तूम्ही माझं ऐकत का नाही आहात ?
जेव्हां ही घटना घडली तेव्हां माझी वाईफही खालच्या डीजे बार मध्येच होती. त्यामूळे तीला वाचवण्यासाठी मला आता लवकरात लवकर तीथे जायला हवं "
" नाही तूम्हांला तीथे जाता येणार नाही. मी तर असं म्हणेन की तूम्ही आता फार काळजी न केलेलीच बरी...कारण आमचे बहूतेकसे कर्मचारी वरतीच आहेत. ते सर्व सांभालून घेतील "
" जर समजा ते सर्व सांभालू शकले नाही तर ?
आणी जर ते मेले असतील तर ?"
" मग तूमची वाईफही यातून वाचू शकणार नाही.
मी शांतपणे सांगतोय ऐका माझं....ईथून बाहेर जाण्याचा काहीच फायदा नाही.
तूम्ही तर या जहाजाचेच कर्मचारी आहात ना......मग.....तूम्हाला तर सर्व प्रोटोकॉल माहीत असायला हवेत "
" तूम्ही जर आता मला या हॉलमधून बाहेर जाऊ दिलं नाहीत तर मी आरडाओरडा करून सर्वानाच सांगेन की तूम्हीं त्यांना खोटं बोलून फसवत होतात.
जर असं झालं तर ही लोकं तूमच्यावर तर घसरतीलच पण जहाजात स्वतःच्या परीवाराला शोधण्यासाठी एक दूसऱ्याचे जीवही घ्यायला मागे पूढे पाहणार नाहीत "
" स्टीफन मी तूम्हांला शेवटचं सांगतोय. मी तूम्हाला या हॉलमधून बाहेर कूठेच जाऊ देणार नाही.
मला माफ करा पण तूम्हांला अडवण्याचा मला संपूर्ण अधीकार आहे "
यावेळी गॉल्ट रागाने लाल झाला होता. स्टीफनला शांत ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करून तो अखेर वैतागला.
" नाही, नाही ऑफीसर तूमच्याजवळ कोणताच मार्ग नाही. ईथे आजारी व जखमी प्रवासी आहेत. त्यामूळे तूम्हांला याच्यांसोबत थांबायलाच हवं.
पण मी आता माझ्या वाईफला शोधण्यासाठी वरती जात आहे.....सो तूम्ही चूकूनही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका "
एव्हांना जँकच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सर्वानी एकञच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
मी. रॉबेनसोबत एलीजाबेथ, जँक व त्याचे तीघंही मीञ त्या हॉलमधून बाहेर पडण्यासाठी कॉरीडोरच्या ऊलट्या झालेल्या पायऱ्यांवरून वरती जात एका मोठ्या दरवाज्याजवळ येऊन पोहोचले. तेवढ्यात एक स्ञी तीच्या लहान मूलाला कशीबशी समजावत त्यांच्याजवळ घेऊन आली.
" मला सांगा तूम्ही याला काय सांगीतलंत. हा माझं काही ऐकतच नाही.
आपण खरंच या जहाजाच्या तळामधून बाहेर पडू शकतो का ?.....नाही ना.
प्लीझ तूम्ही याला समजवाना. मला माहीत आहे की हे शक्य नाही पण.... "
" हो हे शक्य आहे "
" काय ?....म्हणजे तूम्ही खरोखरच आम्हाला या जहाजातून सूरक्षीत बाहेर काढू शकता "
" हो लूसी, या हॉलमध्ये थांबून आता काहीच फायदा नाही.
माझ्या अंदाजानूसार जवळजवळ एक-दोन तासातच हे संपूर्ण जहाज पाण्याने भरून समूद्राच्या तळाशी जाईल "
त्यांची आपआपसात चर्चा सूरू असतानाच स्टीफनही तीथे येऊन पोहोचला होता.
" ओ हाय मीस्टर रॉबेन
तूम्ही एक आर्कीटेक्ट आहात ना. मला माहीत आहे. मी तूमच्या शीप मेकीगं कंपनीविषयीही खूप ऐकलंय "
" हो मी फ्लोटवेसल कंपनीचा सीईओ आहे "
" मग तूम्हाला या जहाजाच्या रचनेवीषयी देखील संपूर्ण माहीती असेल ना. "
" थोडीफार "
रॉबेननी मूद्दामूनच स्टीफनच्या प्रश्नांच तोडकं ऊत्तर दिलं. कारण ते पहील्यांदा स्टीफनच्या बोलण्याचा ऊद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते.
" प्लीझ रॉबेन तूम्ही मला सांगू शकाल का ?
डिजे बारमधील डिस्को कूठे आहे मला तीथे लवकरात लवकर जावं लागेल "
" कदाचीत एक मजला खाली परंतू हे जहाज ऊलटं झाल्यामूळे ते आता वरती असेल.
पण तूम्हाला तीथे का जायच आहे.
तूम्ही आता काय डान्स करण्याच्या मूडमध्ये आहात का ?"
" नाही, जेव्हां ती लाट आली तेव्हां माझी वाईफही खाली डीजे बारमध्येच होती त्यामूळे तीला शोधण्यासाठी तरी मला आता लवकरात लवकर तीथे जायला हवं "
" ओ स्वारी मला हे खरंच माहीत नव्हतं.
तूम्ही फक्त हे सांगा की ईथून जहाजाच्या तळाकडे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कोणता आहे "
" स्टाफच्या सीढ्या, जशा कीचमध्येही आहेत तीथूनच आपण डीजे बारमध्येही पोहोचू शकतो.
ओ, बाय द वे मी.....मी तूम्हांला माझी ओळख करून द्यायलाच विसरलो......माझं नाव स्टीफन, मी या जहाजाच्या ईजींन कम्पार्टमेटंमधील बो कँबीनेटचा मूख्य ईजींनीअर आहे....मी "
" मग स्टीफन तूम्ही कँप्टन स्मीथना तर ओळखत असालच ना "
जँकने स्टीफनचं वाक्य पूर्ण न होऊ देताच त्यांना विचारलं.
" या जहाजात असा कोण आहे जो कँप्टन स्मीथना ओळखत नाही ?"
" कँप्टननी तूमच्या जहाज चालवण्याच्या कैशल्याविषयी आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगीतल्या होत्या. तूम्ही जहाजाच्या डेकवरती स्टर्नजवळ आमची वाट पाहत ऊभे राहणार होतात., बरोबर "
" ओ म्हणजे तू जँक आहेस तर ?
मी तूला ओळखलंच नाही रे !
विल्यम तूझ्यासोबत खूपच वाईट वागला.मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. जर ही मोठी लाट आलीच नसती तर आपण केव्हांच या जहाजातून बाहेर पडून अर्जेनटीनाच्या कीनाऱ्यापर्यतं पोहोचलो असतो. पण दूदैवाने आपला संपूर्ण प्लानच फीस्कटला रे "
" स्टीफन माझे वडील कूठे आहेत ? तूम्ही त्यांना कूठे पाहीलं आहे का ?"
एलीजाबेथने काळजीच्या स्वरातच स्टीफनला विचारलं.
" नाही स्मीथचा तर कूठेच पत्ता नाही.
जेव्हां जहाजाच्या भक्कम काचा फूटून पाणी ईजींनकम्पार्टमेंट मध्ये शीरलं तेव्हा सर्वाची एकच धावपळ ऊडाली. जो तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फंक्शन हॉलच्या दिशेने धावू लागला.
पण तू काळजी करू नकोस तूझे वडील नक्कीच कूठेनाकूठे सूखरूप असतील "
स्टीफनचं बोलणं एेकून एलीजाबेथच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं होत. पण ज्युलीने तीची समजूत काढल्यावर ती अखेर शांत झाली.
" आपल्याला आता एकञच राहायला हवं.
आपण सर्वजण वरच्या दिशेने जाऊन अगोदर एलीनाला शोधून काढू.....मग डीजे बार मध्ये पोहोचल्यावर बाहेर पडायचा मार्ग शोधायलाही आपल्याला फार वेळ लागणार नाही "
" ठीक आहे जर कोणी मागे राहीलात तर मला दोष देऊ नका "
" हे मॉम आपण पण यांच्यासोबत जायचं ना "
लहानग्या कॉर्नरने लूसीचा हात पकडूनच तीला विचारलं.
" हो बेटा चल जाऊया "
स्टीफनने ऊलट्या झालेल्या पायऱ्यावर चढून त्या दोन्ही माय-लेकांना अगोदर वरती घेतलं.
" थांबा आम्ही दोघंही तूमच्यासोबत येतोय "
एलीजाबेथला हा आवाज ओळखीचा वाटला होता. म्हणून तीने मान वळवून आवाजाच्या दिशेने मागे पाहीलं. आणी ती अचानक घाबरून शांत बसली.
" विल्यम तू "
विल्यम सोबत कूगनही त्या हॉलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचला होता.
खरंतर त्यानेच सर्वाना कीडनँप करून त्या जहाजात आणलं होतं. जँकने खूनशी नजरेने विल्यमकडे एकवार रोखून पाहीलं. आणी अचानकच तो विल्यमच्या अंगावर धावून गेला. जँकने त्याचा गळा दाबून धरला होता. पण रॉनने व स्टीफनने लगेचच पूढे येत त्याला विल्यमपासून दूर केलं.
" तूझ्यामूळेच, तूझ्यामूळेच आम्ही या जहाजात अडकलो. मी तूला सोडणार नाही "
जँक पून्हा त्याच्या दिशेने धावत गेला. त्याला विल्यमचा जीव घ्यावासा वाटत होता. तो रागाने लाल झाला.
" जँक मूर्खपणा करू नकोस. सोड त्याला
विल्यमला मारून तूला काहीच मीळणार नाही. आपण हवं तर विल्यमवर कायदेशीर कारवाई करू "
रॉन मोठ्याने ओरडत त्याच्याजवळ गेला आणी जँकला विल्यमपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला.
" जँक थांब. रॉन बरोबर बोलतोय. सोड त्याला विल्यमला मारून तूझा काहीच फायदा होणार नाही. ऊलट तूच या सर्वात निष्पाप अडकशील.
रॉबेनचं म्हणनंही खंर होतं. विल्यमला जोरात सीढ्यांवर ढकलून जँक रागाने बाजूला झाला.
सर्वजणच विल्यमकडे खूनशी नजरेने पाहत होते.
" विल्यम तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू हे का केलंस.
केवळ एक खजाणा मिळवण्याच्या लालसापाई तू या थरावर जाशील असं मला कधी वाटलं नव्हतं "
" एवढंच नाही रॉबेन, माझ्या वडीळांनाही यानेच मारलं होतं. मी आता याला सोडणार नाही "
जँक चवताळला. पण स्वःला कसंबस शांत ठेवत तो पून्हा विल्यमपासून दूर झाला. स्टीफनने व रॉननी अजूनही जँकचे हात पकडून ठेवले होते. नाहीतर त्याने केव्हांच विल्यमचा जीव घेतला असता.
" मला माफ कर जँक.
मी तूम्हांला या जहाजावर आणलं ते माझं चूकलंच. मी असं करायला नको होतं.
पण जँक माझ्यावर विश्वास ठेव. मी तूझ्या वडीळांना मारलं नाही. हवं तर तू माझ्याविरूद्ध नवी केस ऊभी करून पून्हा चौकशी करू शकतोस "
" त्याने काय होणार आहे कोर्ट निकाल दीलेली केस पून्हा ओपनच होऊन देणार नाही. "
" तूझे वडील एका कार अँक्सीडंट मध्ये वारले होते " विल्यम
" पण तो कँर अँक्सीडंटही तूच घडवून आणला होतास ना " जँक
" नाही जँक, तूला माझ्याबद्धल खूप मोठा गैरसमज झाला आहे "
विल्यम स्वःची कातडी वाचवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होता. ऊलट्या झालेल्या पायऱ्यांवर ऊभे राहून सर्वजणच त्या दोघांमधील वादावादी ऐकत शांत बसले होते.
" चला आपल्याला आता निघायला हवं जर आपण या जहाजातून सूखरूप बाहेर पडलो तरच याच्यावर पूढे योग्य ती कारवाई करता येईल "
" हो जँक, रॉबेनच म्हणनं बरोबर आहे. आपल्याला आता निघायला हवं "
अखेर रॉनने जँकची कशीबशी समजूत काढून त्याला विल्यमपासून दूर नेलं.
सर्वजणच घडलेल्या प्रकार पाहून निःशब्द झाले होते.
" वरच्या बाजूने, आपल्याला आता फक्त वरच्या बाजूने जायचं आहे "
रॉबेननी पून्हा सर्वाना समजावून सागीतलं.
तेवढ्यात स्टीफनला हॉलच्या बाहेर जाताना पाहून तो सूरक्षा अधीकारी मोठ्याने ओरडला.
" स्टीफन आम्ही सर्व दरवाजे सील करणार आहोत. तूम्हांला पून्हा या हॉलमध्ये येता येणार नाही "
पण गॉल्टच्या ओरडण्याला न जूमानता सर्वजण केव्हांच वरच्या दरवाज्यामधून पलीकडील किचनमध्ये पोहोचले होते.
" त्याच आहेत ना स्टाफच्या सीढ्या बरोबर "
रॉबेननी किचनमधील सीढ्यांकडे बोट दाखवत स्टीफनला विचारले.
" हो त्याच आहेत "
रॉन सीढ्यांजवळ गेला पण त्यांच्या समोरच कीचनमधील मोठमोठ्या अवजड वस्तूचां ढीग पसरला होता. आणी त्या सीढ्यांच्या पलीकडून आगीचे मोठमोठे ओघ कीचमधील मोठ्या हॉलमध्ये येत होते.
" शीट यार आपण ईथे अडकलो आहोत तरी मी तूम्हाला सांगत होती. आता हॉलमधील मोठे दरवाजेही त्या गॉल्टने बंद केले आहेत.
आपण त्याचं ऐकायला हवं होतं "
ज्यूली रागानेच सर्वाना ओरडून सांगत होती.
" हे गाईज, ईथे काय आहे "
जँकने बाजूच्या दरवाजाकडे जात स्टीफनला विचारलं.
" ही कीचनमधील सर्वीस लीफ्ट आहे "
" ओ नो
जहाज ऊलंट झाल्यामूळे आता ही लिफ्टही बंद पडली असेल.
दूसरा कोणताच मार्ग नाही. आपल्याला आता या लिफ्टमधूनच वरच्या दिशेने जावं लागेल "
मग सर्वजण बाहेर पडण्यासाठी त्या लिफ्टजवळ गेले. पण त्या लिफ्टचे दोन्ही दरवाजे बंद झाले होते.
" आपल्याला बाहेरून जोर लावूनच हे बंद दरवाजे ऊघडावे लागतील तरच आपण पलीकडे जाऊ शकतो "
रॉनने पूढे येऊन ते दरवादे खोलण्याचा नीष्फळ प्रयत्न केला. पण केवळ हाताने ढकलून ते मशीनद्वारे बंद झालेले जाड दरवाजे खोलणे शक्य नव्हतं.
" नाही असं काम होणार नाही. हे बंद दरवाजे असे सहजासहजी ऊघडणार नाहीत. यांना खोलण्यासाठी आपल्याजवळ लोखंडाची कोणतीही अशी वस्तू हवी ज्याद्वारे आपण या डावीकडील व ऊजवीकडील दोन्ही दरवाजामधील फटीमध्ये ती वस्तू अडकवून ही लिफ्ट खोलू शकतो "
जँकने खाली पडलेला लोखंडाचा एक चपटा पाईप ऊचलला आणी त्या दोन्ही दरवाज्यांच्या गँपमध्ये अडकवला. मग सर्वानी एकञच जोर लावून कसेबसे ते दोन्ही दरवाजे ऊघडले.
रॉकी पूढे पाऊल टाकणार तेवढ्यात रॉबेननी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं.
" संभालून, घाई करू नकोस, खाली बघ "
खाली पाहताच रॉकी दचकला.
क्षणभरात त्याच्या अंगावर काटा येऊन गेला. त्याने पूढे ऊगारलेल्या पायाखाली काहीच नव्हतं.
रॉनने एकवार वरच्या दिशेने नजर फिरवली.
जहाज ऊलटं झाल्यामूळे लिफ्टचा ईलेव्हेटर बॉक्स ( लीफ्टमधील मांणसाची खालीवर ने आण करणारं कँबीन ) वरतीच अडकून राहीला होता.
त्याने समोर पाहीले तीथेही तसाच लिफ्टचा दूसराही एक दरवाजा होता पण तोही बंदच होता.
म्हणजे ती लीफ्ट एकाच वेळी दोन्ही बाजूकडील माणंसाना खालीवर घेऊन जाण्याचे काम करत होती.
" जर आपण पलीकडे गेलो तर तीथे काय आहे.
वरती जाण्याचा मार्ग "
" हो तीथे वरती जाण्यासाठी सीढ्या आहेत "
" मग आता आपल्याला पलीकडील रूममध्ये जाण्यासाठी तो समोरील लिफ्टचा बंद दरवाजा ऊघडावा लागेल.
आणी त्यासाठी आपल्याला ईथून त्या दरवाज्यापर्यतं पोहोचणारी कोणतीही लांबंलचक वस्तू मध्ये टाकावी लागेल. जेणेकरून आपण त्या वत्तूमार्फत पलीकडील रूममध्येही पोहोचू शकतो. आणी........"
जँकचं बोलणं सूरू असतानाच विल्यम व रॉकीनी किचनमधील एक मोठा स्टीलचा टेबल लिफ्टजवळ खेचत आणला होता.
" याने काम होईल "
" हो नक्कीच "
मग सर्वानी एकञच जोर लावून त्या टेबलाची एक बाजू समोरील दरवाज्यापर्यतं पूढे सरकवली. आणी त्या दरवाजाच्या खालच्या फटीत तो टेबल अडकवला.
त्यामूळे त्यांना आता त्या टेबलावरून समोरच्या बंद दरवाज्यापर्यतं पोहोचणं अगदीच शक्य झालं होतं.
नाही म्हटलं तरी तो टेबलही फार काही मोठा नव्हता. फक्त सात फूट लांबी व दोन फूट रूंदी असलेल्या त्या टेबलावरून पूढे जाणं खूपच अवघड व धोक्याचं काम होतं. जर त्या लाबंलचक टेबलावरून पूढे जाताना कोणी तोल जाऊन खाली पडला असता तर त्याचा मृत्यू निच्छीत होता.
" आम्ही या टेबलाला समोरील दरवाजावर दाबून धरतो. तूम्ही सर्वजण लवकरात लवकर या टेबलावरून पूढे जा "
रॉबेननी व कूगनने त्या टेबलावर जोर देऊन त्या टेबलाला कसंबसं पकडून ठेवले होतं.
मग जँक त्यावरून सावकाशपणे पूढे जाऊन समोरच्या दरवाज्यापर्यतं पोहोचला.
पण तो दरवाजा त्या टेबलावरील छोट्याशा जागेवर ऊभं राहून ऊघडणं निव्वल अशक्य होतं.
" मला ईथे दरवाजावर पकड मिळत नाही आहे. हा दरवाजा या छोट्याशा टेबलावर ऊभं राहून मला खोलता येणार नाही "
जँकने दूसरा एखादा मार्ग शोधण्याच्या हेतूने आजूबाजूला नजर फिरवली. सूदैवाने वरच्या मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा ऊघडा होता.
" जर आपण तीथून वरती गेलो तर "
जँकने स्टीफनला विचारले.
" ईटरटेन्टमेंट सेक्शन आहे तीथे "
" मग आपण तीथेच जाऊया कारण आता
ईथून बाहेर पडण्याचा दूसरा कोणताच मार्ग नाही.
चला या लवकर माझी मदत करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे "
जँकनंतर विल्यम त्या टेबलावरून पूढे आला होता.
" विल्यम ऐक, तूझ्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गूंतवून ठेव मग मी तूझ्या हातावर पाय देऊनच वरच्या ऊघड्या दरवाज्यापर्यतं झेप घेईन "
जँकने पूढे आलेल्या विल्यमला सांगीतले.
त्या दोघांची चर्चा सूरू असतानाच अचानक कीचनमध्ये एक विस्फोट होऊन सगळीकडे आग पसरली.
" आता तूम्ही सर्वजण लवकरात लवकर या टेबलावरून पूढे या नाहीतर कीचनमधल्या आगीत तूम्हीही जळून राख व्हाल "
जँक मोठ्याने ओरडला व विल्यमच्या हातातील पकडीमध्ये पाय ठेवून त्याने वरच्या रूममध्ये झेप घेतली.
" ठीक आहे लूसी, कॉर्नरला पाठव अगोदर "
लहानगा कॉर्नर खाली पडण्याच्या भीतीमूळे त्या छोट्याशा टेबलावरून पूढे जाण्यासाठी घाबरत होता. पण त्याने अखेर कशीबशी हिम्मत करून टेबलावर पाय ठेवला.
" कम ऑन कॉर्नर घाबरू नकोस "
" तूला काही होणार नाही खाली बघू नकोस "
लूसी त्याला धीर देत होती.
तेवढ्यात अचानकच वरती अडकलेल्या ईलेव्हेटर मध्ये हालचाल झाली. त्याबरोबर मीशेल घाबरून धावतच त्या टेबलावरून विल्यमजवळ पोहोचला आणी मग विल्यमच्या हातावरती पाय ठेऊन त्याने कशीबशी वरती झेप घेतली.
मग त्यापाठोपाठ थोड्यावेळाने ज्युली, एलीजाबेथ, लूसी, स्टीफन, रॉन व रॉकीही विल्यमच्या हातातील पकडीमध्ये पाय ठेऊन वरती पोहोचले. जँक प्रत्येकाला हात देऊन वरती घेण्याचं काम करत होता.
आणी अचानकच ईलेव्हेटरच्या वरती दडून राहीलेली आग फडफडून बाहेर येऊ लागली.
रॉबेनही त्या टेबलावरून पूढे जात विल्यमच्या हातावर पाय देऊन वरती पोहोचले होते.
आता फक्त विल्यम आणी कूगनच वरच्या ईटरटेन्टमेंट सेक्शनमध्ये जायचे बाकी होते.
" सर तूम्ही पहील्यांदा वरती जा.
मी तूम्हांला वरती जाण्यासाठी माझ्या हाताची पकड करून ठेवतो "
कूगन घाईघाईने ते टेबल पकडायचं सोडून त्या टेबलावरूनच पूढे आला होता.
मग विल्यमने कूगनच्या हातावर पाय देवून वरती झेप घेतली. आणी अचानकच खूप वेळापासून थबकणारा ईलेव्हेटर वेगाने खाली आला. व कूगन ऊभ्या असलेल्या टेबलाला खाली घेऊन गेला. कूगनही त्या टेबलाबरोबर खालच्या आागीत जाऊन मरणार होता पण अगदी शेवटच्या क्षणी त्याने विल्यमच्या पायाला घट्ट पकडून ठेवले होते. जँक विल्यमचा हात पकडून त्याला वरती खेचण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. पण त्या दोघांचही वजन घेऊन वरती खेचणं जँकला अशक्य होत होतं.
" सोड त्याला विल्यम नाहीतर तूम्ही दोघंही मराल "
जँक मोठ्याने ओरडला.
" नका सर मला सोडू नका. मी तूमच्याबरोबर अगदी शेवटपर्यतं असेन. मला मरायचं नाही. प्लीझ मला वरती घ्या "
कूगन जीवाच्या आकांताने ओरडू लागला. पण विल्यमने त्याला अजीबात दाद दिली नाही. ऊलट कूगनसोबत खाली जाण्याच्या भीतीने विल्यम त्याच्या हातावर जोरजोरात लाथा मारू लागला.
" मला माफ कर कूगन माझा नाईलाज आहे.... "
विल्यम ओरडत असतानाच नकळतच त्याच्या पायावरची पकड सूटून कूगन खालच्या आगीत जाऊन पडला होता. त्याची एक अवीरत कीकांळी आख्या जहाजात घूमली होती. व त्याबरोबरच कीचनमधील गँस टर्बाईनमध्ये मोठा विस्फोट होऊन आगीचा एक घवधवीत ओघ ईलेव्हेटरला घेऊन पून्हा वरती आला होता.
त्या काही क्षणातच जँकने विल्यमला वरच्या ईटरटेन्टमेट सेक्शनमध्ये घेतले होते. स्टीफनने लिफ्टचा दरवाजा बंद करून घेतल्यामूळे कीचनमधील आग त्यांच्या रूमपर्यतं पोहोचू शकली नव्हती. केवळ स्टीफनमूळेच आगीत जळण्यापासून सर्वजण वाचले होते.
त्या किचनमधील भयानक विस्फोटामूळे फंक्शन हॉलमध्येही जबरदस्त ऊलथापालट झाली होती.
" ए हा धमाका कीचनमध्ये झाला का ?"
गॉल्टने हॉलमधील एका ईजींनीअरला विचारले.
" हो सर गँसच्या बँलमध्ये काही गडबड झाली असेल "
" तूला काय वाटतं हे बंद दरवाजे हॉलमध्ये आगीला आत योण्यापासून रोकू शकतील "
" हो सर
आपण आता हातावर हात ठेऊन शांत बसण्याशीवाय दूसरं काहीच करू शकत नाही "
" असो त्याच्या आत्म्याला शांती मिळो "
गॉल्टने वरती कीचनमध्ये गेलेल्या स्टीफन व ईतरांसाठी प्रार्थना केली. त्याच्या मते ते सर्वजणच आगीत जळून राख झाले होते.
थोड्य वेळाने सर्वच वातावरण शांत झाल्यावर स्टीफनने लीफ्टचा दरवाजा ऊघडला. त्याने पाहीलं बाहेरच्या ईलेव्हेटरमधील आग पूर्णपणे शमली होती.
" चला लवकर ईथून
मला पूढे जाण्याचा मार्ग मीळाला आहे "
मी. रॉबेननी सर्वाना त्यांच्या मागे येण्याचा ईशारा केला.
डीजे बारमध्ये अडकून राहीलेली एलीना आणी ती स्ञी अजूनही तीच्या बॉयफ्रेडंचा अडकलेला पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती.
त्या दोघींनीही एकञच जोर लावून एका लोखंडी रॉडच्या टेक्याने त्या फोकस लाईटच्या खांबाला वरती ऊचलून धरलं आणी त्या यूवकाने त्याचा जखमी पाय कसाबसा बाहेर काढला.
त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्याचा पाय बाहेर निघताच त्या प्रेमी जोडप्याने एकमेकांच्या ओठांच आकर्षक चूबनं घेतलं.
" एलीना, एलीना कूठे आहेस तू बेबी. मी तूला घेऊन जाण्यासाठी ईथे आलो आहे "
स्टीफन अंधारातून तीला शोधत हळूहळू पूढे येत होता. स्टीफन दिसताच ती धावतच त्याला जाऊन बिलगली.
" मला माहीत होतं स्टीफन तू नक्कीच मला शोधत ईथपर्यतं येशील "
" सर्व ठीक होईल बेबी., तू काळजी करू नकोस आपण या जहाजातून सूखरूप बाहेर पडू "
स्टीफन तीला केवळ धीर देण्यासाठीच असं बोलत होता. खरंतर कोणालाच पूढे काय होईल याची कीचींतही कल्पना नव्हती.
लूसीने त्या जखमी यूवकाच्या पायाला त्याचं रूमाल बांधलं. मग त्या स्ञीला धीर देण्यासाठी रॉबेनही तीच्याजवळ गेले
" हे घे पाणी पी तूला थोडं बंर वाटेल ईथे फक्त एकच गोष्ट आहे....आणी ती म्हणजे पाणी "
जँक डीजे बार मधील एका मोठ्या दरवाज्यासमोर ऊभा राहून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता.
" याच्या मागे काय आहे. तू ईथे काय करतोयेस "
लहानग्या कॉर्नरने खोड्या करण्याच्या ऊद्धेशाने जँकला विचारलं.
" विचार करतोय आणी तू "
" मी पण विचार करतोय "
कॉर्नरने तो दरवाजा ऊघडण्यासाठी हात पूढे केला त्याबरोबर जँकने लगेचच त्याचा हात पकडून त्याला मागे घेतलं.
" थांब घाई करू नकोस.
हे बघ "
जँकने दरवाजावर पाणी शीपडलं.
आणी अचानकच त्या शांत वाटणाऱ्या दरवाजामधून गरम वाफा बाहेर येऊ लागल्या.
" मी म्हटलं होतं ना ईथल्या कोणत्याच वस्तूला हात लावू नकोस.
आता तूझा हात भाजला असता तर "
" मला वाटतं आग विजली असेल नाहीतर या वाफा आल्याच नसत्या "
विल्यमने बाजूला पडलेला एक लाल रंगाचा गँस सीलेडंर वरती ऊचलला.
" ओके ऊघड आता "
जँकने हातात एक कापड घेऊन तो गरम दरवाजा ऊघडताच विल्यमने बाहेरच्या दिशेने सीलेडंर मधील गँस फायर केली.
" तूझा अदांज बरोबर होता जँक
आग पूर्णपणे विजली आहे "
त्या मोठ्या दरवाजामधून बाहेर येऊन पाहताच सर्वजण चकीत झाले होते. समोर ऊध्वस्त झालेला एक मोठा जनरल हॉल होता. जहाज ऊलटं झाल्यामूळे हॉलचा वरील भाग खाली होता आणी खालचा भाग वरती झाला होता.
त्यांना आता वरच्या दिशेने जाण्यासाठी पहील्यांदा समोरच्या कॉरीडोरमध्ये जाणं गरजेचं होते.
पण पाणी भरल्यामूळे खाली ऊतरून ते तीथपर्यतं पोहोचू देखील शकत नव्हते.
त्या दोन कॉरीडोरमधील अतंरामध्ये हॉलमधील लिफ्टचा एक मोठा खांब तूटून पडला होता.
" आपण या खांबावरून पलीकडे गेलो तर "
" मग कसला वीचार करतोयेस जँक "
" हा खांब एका टेक्यावर अडकून राहीला आहे जर ह्यावर गरजेपेक्षा जास्त जोर पडला तर हा खांब सरळ खाली पाण्यात जाईल "
" पण जँक पलीकडे जाण्यासाठी आपल्याजवळ दूसरा कोणताच मार्ग नाही. या आडव्या खांबावरूनच आपल्याला समोर जावं लागेल "
ते एकमेकांसोबत बोलत असतानाच रॉकी त्या खांबावरून समोरच्या कॉरीडोर पर्यतं पोहोचलाही होता.
" तूम्ही सर्वजण या ईकडे
मला नाही वाटत की हा खांब सहजासहजी खाली जाईल कारण कॉरीडोरच्या जाड सळ्यामध्ये तो अडकला आहे "
रॉकीने सर्वाना ओरडून सांगीतलं.
मग हळूहळ प्रत्येकजणच हिम्मत करून पूढे जाऊ लागले. ज्युली, एलीजाबेथ, रॉन लूसी, कॉर्नर, रॉकी, रॉबेन व विल्यम एकामागोमाग समोरच्या कॉरीडोरपर्यतं पोहोचले होते.
फक्त जँक, एलीना, स्टीफन आणी ते प्रेमी जोडपं अजूनही कॉरीडोरपर्यतं यायचे बाकी होते.
त्या जोडप्याने एकञच खांबावरून पूढे जायचा हेका घेतला. ते दोघंही कोणाचंच एेकायला तयार नव्हते. आणी अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. खांबावरून पूढे जाताना निष्काळजीपणामूळे त्या यूवकाच्या खीशातील वाईनची बॉटल खाली पाण्यात पडली. आणी त्याबरोबर अचानकच बंकरचा तळ फूटून एक मोठा ऑईलने भरलेला टर्बाईन खाली आला.. त्याने आडव्या खांबासहीत त्या दोघांनाही खाली पाण्यात नेलं होतं. आणी त्यातच भर म्हणून की काय आगीने अर्धवट जळलेला कापडाचा एक तूकडा कूठूनतरी त्या पाण्यात येऊन पडला होता. त्यामूळे अचानकच ऑईलने भरलेल्या टर्बाईन मध्ये विस्फोट होऊन एक मोठा आगीचा ओघ ऊसळत वरती आला.
सूदैवाने एलीना, जँक व स्टीफन मागे झाले होते. नाहीतर आगीच्या कचाट्यात अडकून ते तीघंही जळून राख झाले असते.
त्या दोन कॉरीडोरमधील आडवा खांब खाली पाण्यात पडल्यामूळे त्या तीघांनाही समोर जाण्यासाठी कोणताच मार्ग ऊरला नव्हता.
" आपल्याला आता एक मजला खाली जावं लागेल. तीथेच आपण समोरच्या कॉरीडोरमध्ये जाण्याचा मार्ग शोधू "
" आपण तीथूनच तर आलो आहोत तीथे दूसरा कोणताच मार्ग नाही "
" जँक आपण खालचे सर्व कॉरीडोर बघीतले नव्हते "
एलीनाने जँकला पून्हा एकदा समजाऊन सांगीतलं.
" तूमच्या जे मनात येईल ते करा मी आता पलीकडे जात आहे "
" एक मीनीट जँक
जर तूझ्याजवळ दूसरा कोणता पर्याय असेल तर बघ
प्लीझ घाई करू नकोस "
" नाही दूसरा कोणताच मार्ग नाही "
" मग तू काय करणार आहेस ?"
स्टीफनच्या प्रश्नाचं ऊत्तर न देताच जँक ताबडतोब मागच्या ईटरटेनमेंट हॉलमध्ये गेला व एक मोठी रस्सी घेऊन बाहेर आला. मग त्याने ती रस्सी स्वतःच्या हाताला व्यवस्थीत गूंडाळली व अचानकच आगीने व्यापलेल्या पाण्यात झेप घेतली.
" हा वेडा झालाय की काय ?
त्याला खाली पाण्यात ऊडी मारायची काय गरज होती " एलीना
" जँक अजूनही कसा पाण्याबाहेर येत नाही.
मी जाऊन बघू का ?"
जँकला पाण्यात जाऊन बराच वेळ झाला होता. तरी तो पाण्यातून बाहेर आला नाही. म्हणून रॉन अस्वस्थ झाला.
" नको तो येईल बाहेर, मला खाञी आहे "
ज्युलीने रॉनला पाण्यात ऊडी मारण्यापासून अडवलं. आणी जँक अचानकच त्या पाण्यातून मूसंडी घेत बाहेर आला.
" मि म्हटलं होतं ना तो येईल बाहेर " जँकने पाण्याबाहेर आल्या आल्या एक दीर्घ श्वास घेऊन समोरच्या कॉरीडोरवर चढण्यास सूरवात केली होती व काही क्षणातच तो त्या सर्वापर्यतं पोहोचलाही होता
" हा माणूस आहे की शैतान "
रॉबेन जँकची हीम्मत पाहून खूपच खूश झाले होते.
" घ्या आलो मी आता सांगा काय करायचं आहे.
ही घे ह्या रस्सीला पकडून त्या वेल्टला बांध "
जँकने पाण्यात भीजलेली ती ओली रस्सी रॉनच्या हातात दिली व त्या दोघांना मोठ्याने ओरडला.
" हे एलीना, स्टीफन
तूम्ही दोघंही आता रस्सीला पकडून कॉरीडोरपर्यतं या "
स्टीफन लगेचच आतून एक वाकडी झालेली लोखंडी सळी बाहेर घेऊन आला
" हे ऐलीना तूला काहीच होणार नाही कम ऑन
घाबरू नकोस मी आहे तूझ्यासोबत "
" त्याचीच तर भीती आहे मला "
" तू खाऊन खाऊन एवढी जाडी झाली आहेस की आज माझ्या पाठीवर नाही बसणार "
" हो, आज नक्कीच बसेन "
" ठीक आहे बेबी माझ्या कंबरेला आता घट्ट पकड आपण समोर जात आहोत "
स्टीफनने ती वाकडी झालेली लोखंडी सळी रस्सीवरून टाकली मग त्या सळीला दोन्ही बाजूने पकडत काही क्षणातच ऐलीनाला पाठीवर घेऊन तो समोरच्या कॉरीडोर पर्यतं पोहोचला.
मग रॉबेनने व रॉकीने त्या दोघांना एकञच वरती घेतलं होतं.
" तर आता काय म्हणनं आहे तूझं स्टीफन "
" खरं सांगू, तू खूपच चांगल काम करत आहेस
आणी करतही राहा "
" मग आता आपण जाऊया पूढे "
" हो मग वाट कशाची बघत आहेस "
" ईथून वरती जाण्याचा सर्वात ऊत्तम मार्ग आहे "
रॉनने समोरील दरवाजाकडे ईशारा करत सर्वाना सांगीतलं.
त्यांचं बोलणं सूरू असतानाच पून्हा ऊलट्या झालेल्या जहाजात एक मोठा विस्फोट झाला.
पण यावेळी माञ अचानकच खालच्या फंक्शन हॉलमधील भक्कम काचांना तडा जाऊन हॉलमध्ये पाणी शीरू लागलं होतं. आणी एकच गोधंळ ऊडाला. जो तो घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ईकडेतीकडे वेड्यासारखा धावू लागला. पण गॉल्टने फक्शंन हॉलचे मोठे दरवाजे बंद केल्यामूळे कोणालाच बाहेरही पडता येत नव्हतं.
गॉल्टने डोळे बंद करून मरणाला आमञणं दिलं.
काही क्षणातच तो संपूर्ण हॉल पाण्याखाली जाऊन ऊध्वस्त झाला. त्या प्रवाशांची अवीरत कीकांळी सर्वानाच एेकू येत होती.
" तरी मी गॉल्टला समजावलं होतं. पण तो माझं ऐकलाच नाही.
असो जे झालं ते झालं आपल्यालाही आता ईथे फार वेळ वाया घालवून चालणार नाही.
चला लवकर "
रॉनने भीतींना लावलेल्या एका लाल रंगाच्या एमर्जन्सी बॉक्सची काच फोडली आणी त्यातून सात-आठ बँटऱ्या बाहेर काढल्या.
" कम ऑन लेट्स गो सर्वानी वरती जाण्याचा मार्ग शोधा "
ते सर्वजण पूढे निघाले होते.
" ईथे एक वॉटर प्रूफ दरवाजा आहे जँक "
" माझ्या मागे या सर्वजण "
रॉबेन सर्वानाच त्यांच्या सोबत घेऊन पूढे निघाले.
पण तो हॉल एव्हाना पूर्णपणे पाण्याने भरला होता. व पाणी झपाट्याने त्यांच्या कॉरीडोरमध्ये येण्यास सूरवात झाली होती.
" आता आपल्याला ताबडतोब दूसरा मार्ग शोधायला हवा. पाणी वेगाने भरत आहे.
" एक मीनीट कदाचीत हा मार्ग आहे "
रॉबेननी एक जाळी ऊघडली व ते आत शीरले. तो एक शाफ्ट ( दोन खांबामधील चींचोळी जागा ) होता.
" मी वरच्या दिशेने जातोय तूम्ही माझ्या मागून या "
" ईथे एक शाफ्ट वरती जात आहे दहा दहाच्या अंतरावर "
तो शाफ्ट खूपच अरूदं होता फक्त
दोन × दोन फूट म्हणजे एका वेळी एकच माणूस त्या शाफ्टमधून कसाबसा वरती जाऊ शकत होता.
सर्वजण एकामागोमाग ती जाळी बाजूला करून त्या शफ्टमध्ये शीरले.
" या शाफ्टच्या दूसऱ्या तोडांमधून बाहेर पडल्यावर आपण वरती पोहोचू "
" तू ठीक आहेस ना एलीना "
" हो मी ठीक आहे "
" तू फक्त पूढे जात राहा "
स्टीफन व एलीना अजूनही खालीच होते. हॉलमधील पाणी आता त्यांच्या कॉरीडोर मध्ये वेगाने भरत होतं.
" एलीना तू जा अगोदर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे "
स्टीफन तीला जीव तोडून समजावत होता. पण ती त्या शाफ्टमध्ये जाण्यासाठी घाबरत होती.
" मी नाही जाणार "
" एलीना आतमध्ये जा लवकर पाणी वाढत आहे "
स्टीफन पून्हा मोठ्याने ओरडला.
" नाही, मी तूला सोडून जाणार नाही " ऐलीना काही केल्या त्याचं म्हणनं ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी नाईलाजाने स्टीफनने तीला पकडून शाफ्टमध्ये टाकलं.
" तूला जावचं लागेल एलीना "
" मला भीती वाटतेय "
" हात पकड माझा
शाब्बाश आता पूढे जात राहा "
रॉबेन त्या शाफ्टमध्ये सर्वाच्या वरती होते. त्या शाफ्टच्या दूसऱ्या तोडांलाही वरून एक लोखंडी जाळी होती. रॉबेननी जोर लावून ती जाळी ढकलण्याचा प्रयत्न केला परंतू ती बाहेरच्या बाजूने स्क्रू लावून फीट करण्यात आली होती त्यामूळे ते त्या शाफ्टमधून बाहेर पडू शकत नव्हते.
स्टीफन अजूनही त्या शाफ्टबाहेरच ऊभा होता. आणी वरती रॉबेन खांद्याने जोरजोरात धक्के देऊन बाहेर जाण्यासाठी ती जाळी तोडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. परंतू ती जाळी काही केल्या ऊघडेच ना.
सर्वजण त्या शाफ्टध्येच विनाकारण अडकून राहीले होते. जर ती जाळी ऊघडून त्यांना बाहेर जाता आलं नसतं तर पाण्यात गूदमरून सर्वजण मेले असते.
आणी त्यातच भर म्हणून की काय घाईघाईत वरती जाताना त्या शाफ्टमधील एका वेल्टमध्ये विल्यमचा पाय अडकला व तो मध्येच अडकून राहीला.
" माझा पाय ईथे फसला आहे.
एलीना मला खालून जोरात धक्का देऊन वरती ढकल त्याशीवाय मी पूढे जाऊ शकत नाही "
विल्यम मोठ्याने ओरडला.
" एलना खाली संपूर्ण रूममध्ये पाणी भरलंय. मला आता या शाफ्टबाहेर जाता येणार नाही. तू लवकर पूढे जात राहा आता आपण सर्वजण या शाफ्टमध्येच अडकलो आहोत "
रॉबेन पून्हा पून्हा खांद्याचे धक्के देत ती जाळी तोडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
" कॉर्नर तू वरती येऊ शकतोस "
रॉबेननी त्या जाळीचे स्क्रू खोलण्यासाठी कॉर्नरला वरती बोलवत होते. कारण त्याचे छोटेसे हात त्या स्क्रू पर्यतं पोहोचू शकले असते.
" एलीना आता शाफ्टमध्ये पाणी भरण्यास सूरवात झाली आहे. लवकर लवकर पूढे जात राहा. थोड्याच वेळात पाणी माझ्या कम्बरेपर्यतं पोहोचेल.
एलीना प्लीझ लवकर मी पाण्यात बूडतोय विल्यमला धक्का देऊन त्याचा अडकलेला पाय वरती ढकल "
" मी हे नाही करू शकत स्टीफन, माझा श्वास आत कोढूं लागलाय "
" एलीना विल्यमला वरती ढकल प्लीझ माझं ऐक
मी तूला प्रॉमीस करतो. तू नक्कीच या शाफ्टमधून बाहेर पडशील
खोलवर श्वास घे
कम ऑन एलीना विल्यमला वरती ढकल माझ्या तोडांत पाणी शीरतयं "
स्टीफन तीला कसाबसा ओरडत होता.
मग एलीनाने तीची संपूर्ण शक्ती एकवटून विल्यमला वरती धक्का देण्याचा प्रयत्न केला आणी सूदैवाने विल्यमचा अडकलेला पाय बाहेर निघाला.
" तूझा हात स्क्रू पर्यतं पोहोचतोय का ?
स्क्रू डावीकडे फिरव "
" खूप टाईट आहे "
कॉर्नर घाईघाईने स्क्रू खोलत होता.
" वरती काय होत आहे लवकर बाहेर पडा मी शाफ्टमध्ये शीरलेल्या पाण्यात अडकलोय "
" थांब कॉर्नर असं काम होणार नाही.
तो स्क्रू खोलण्यासाठी कोणतीही अशी वस्तू पाहीजे जी स्क्रू डायव्हरचं काम करेल.
सीक्का, अंगठी काहीही "
ज्युलीने ताबडतोब तीच्या गळ्यातील क्रास ( ख्रिश्चन धर्माचं चिन्हं ) काढून वरती कॉर्नरच्या हातात दिला.
एव्हांना स्टीफन शाफ्टमध्ये शीरलेल्या पाण्यात पूर्णपणे बूडला होता.
" खोल लवकर कॉर्नर तो स्क्रू डावीकडे फीरव "
" हा एक स्क्रू नीघाला "
" शाब्बाश कॉर्नर आता दूसराही स्क्रू फीरव "
स्टीफनची स्पदंने थांबू लागली होती. तो काही क्षणातच पाण्यात गूदमरून मरणार होता.
" यस दूसरा स्क्रूही नीघाला "
" वेल कॉर्नर "
मग रॉबेननी लगेचच धक्का देऊन ती जाळी ऊघडली आणी सर्वजणच एकामागोमाग त्या शाफ्टच्या दूसऱ्या तोडांतून बाहेर आले.
" सर्व नीघाले ना
स्टीफन, स्टीफन कूठे आहे एलीना ?"
एलीना शांतच होती.
" एलीना सांग लवकर स्टीफन कूठे आहे ?"
जँक पून्हा मोठ्याने ओरडत तीला विचारू लागला.
" तो शाफ्टमधील पाण्यात........"
एलीना हूदंके देत मोठमोठ्याने रडू लागली तीच्या डोळ्यासमोरच तीचा स्टीफन जलमग्न झाला होता.
" काय ?"
सर्वजणच अचानक शांत झाले होते.
ज्युलीनी व लूसीनी तीला धीर देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तरीही तीचं रडंण थांबत नव्हतं.
" ऐक एलीना आता रडून काहीही फायदा होणार नाही. आपला जीव वाचवण्यासाठी स्टीफनने स्वतःचे प्राण गमावले.
त्याचं बलीदान मी वाया जाऊ देणार नाही. आपल्याला या जहाजातून बाहेर पडावंच लागेल.
ईथे आता फार वेळ थांबून चालणार नाही. काही वेळातच शाफ्ट पाण्याने भरेल. व पाणी बाहेर येण्यास सूरवात होईल "बोलला जँक
" हा दरवाज्या दूसऱ्या बाजूने बंद आहे "
रॉन समोरच्या दरवाजाकडे बोट दाखवून बोलला.
" फक्त वरती जाण्याचा हाच एक मार्ग आहे " रॉकी
" कदाचीत या दूसऱ्या शाफ्टमधूनही आपण वरती जाऊ शकतो " रॉबेन
" नाही अजून एक शाफ्ट, पून्हा नाही "
एलीना रडत रडत बोलत होती.
" विल्यम वरती काय आहे "
जँकने त्याला विचारलं.
" कदाचीत हा हँच ऊघडून आपण वरती जाऊ शकतो " विल्यम
" हो मग लवकरात लवकर ऊघडा त्याला "
रॉन मला खेच कोणी माझी मदत करेल का विल्यम तो हँच खोलण्याचा अतोनात प्रयत्न करत होता.
" रॉबेन काही अंदाज आपण कूठे आहोत " जँक
" अजून दोन मजले बाकी आहेत "
एलीना अजूनही खारखी रडत होती आणी अचानकच ते ज्या शाफ्टमधून बाहेर आले होते तो शाफ्ट पाण्याने पूर्णपणे भरला. व त्यामधून पाणी बाहेर येण्यास सूरवात झाली.
" चला लवकर पाणी खूप वेगाने भरत आहे "
जँकने व रॉनने विल्यमची मदत करून कसाबसा तो हँच ऊघडला मग सर्वजणच त्या हँचमधून वरच्या रूममध्ये पोहोचले.
" ही कोणती जागा आहे रॉबेन "
" हे बँरेस्ट ( बॉयलर रूम ) आहे जहाजाला बँलेन्स ठेवण्यासाठी यामध्ये पाणी भरतात.
माझ्या अंदाजानूसार या जहाजाला जवळजवळ आठ बँरेस्ट असतील आणी एकदा का हे सर्व बँरेस्ट पाण्याने भरले की मग जहाज पाण्यात जाईल "
" ती समोरची वँन बाजूच्या टँक मध्ये जाते. बरोबर
तीथूनच आपण कदाचीत बाहेर पडू शकतो "
रॉबेननी वँनकडे ईशारा करत सर्वाना सांगीतलं
" पण दूसरा कोणताच मार्ग नाही का रॉबेन " ज्युली
" थांब हे प्रेशर वँन आहे जोपर्यतं यावर जबरदस्त प्रेशर पडणार नाही तोपर्यतं हे वँन ऊघडणार नाही " रॉबेन
" रॉबेन आता हे नका बोलू की आपण ईथे अडकलो आहोत " रॉकी
" नाही, नाही हे ऊघडेल " जँक
" पण कंस काय जँक, या वँनला प्रेशर कूठून मिळणार " एलीजाबेथ
" या टँकमध्ये पूर्ण पाणी भरल्यावरच पाण्याच्या प्रेशरमूळे हा वँन ऊघडेल " जँक
" हो अगदी बरोबर " रॉबेन
" नाही, जँक तू वेडा झाला आहेस का ? तू काय बोलत आहेस तूझं तूला तरी कलंतय " एलीजाबेथ
" जरा एक मीनीट म्हणजे तूला म्हणायंच आहे की या टँकमध्ये पाणी भरून आपण स्वतःला बूडवणार आहोत " लूसी
" नाही, नीही कोणीच बूडणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा.......हे वँन जेव्हां पाण्याच्या प्रेशरमूळे ऊघडेल तेव्हा पाणी आपल्याला एका टँक मधून दूसऱ्या टँकमध्ये घेऊन जाईल.
जोपर्यतं आपल्याला तीथे गेल्यावर कोणताही ऊघडा दरवाजा मीळत नाही तोपर्यतं आपल्याला तीथेच थांबावं लागेल " जँक
" काय भरवसा जर दूसऱ्या टँकमध्ये गेल्यावर आपल्याला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग मिळाला नाही तर
आणी तीथे जायच्या अगोदरच या टँकमधील पाण्यामध्ये आपला श्वास गूदमरला तर " ज्युली
" आता हाच एक मार्ग आहे आपण दूसरं काहीच करू शकत नाही " जँक
" खाली रॉबेननी दाखवलेला जो एसी शाफ्ट आहे त्याचं काय आपण तीथे बघीतलं पण नाही कदाचीत आपण त्या शाफ्टमधूनही बाहेर पडू शकतो
हां आपल्याला त्या शाफ्टमधून पूढे जाण्याचा प्रयत्न तरी करायला हवा " रॉन
" नाही मी पून्हा त्या शाफ्टमधून नाही जाणार "
ऐलीना रडतच म्हणाली. तेवढ्यात कॉर्नर मोठ्याने ओरडला.
" मॉम खाली पाणी भरू लागलंय "
" माझं म्हनणं ऐका रॉबेन, मी काय बोलतोय आपण दूसरा एखादा मार्ग शोधू " रॉन
जँक ने पून्हा ऊघड्या हँच मधून खाली पाहीलं पाणी भरून वरती त्याच्या रूममध्ये येणार तेवढ्यात जँकने तो हँच ताबडतोब बंद केला.
" रॉबेन तूमंच बोलणं खरं होवो भरा पाणी आपल्य टँकमध्ये "
" नाही जँक, नो व्हे आपण स्वतःलाच बूडवणार आहोत "
" सॉरी, पण ऐलीना दूसरा कोणताच मार्ग नाही.
मागे व्हा सर्वानी मी आता या आपल्या टँकमध्ये पाणी भरणार आहे "
जँक ने समोरच्या नालाकृती पाईपचा गोलाकार कॉक फीरवला आणी अचानकच त्या पाईपमधून वेगाने पाणी बाहेर येण्यास सूरवात झाली.
तीथे बाजूलाच बँलास्ट टँकची कँप्यासीटी दाखवणारा मीटर होता त्या मिटरवरील प्रेशर ईडीकेटर काही क्षणातच पार वरती पोहोचला.
पाण्याच्या थंडगार फवाऱ्याने सगळेच तीबं भीजले होते. मग हळहळू त्या टँकमध्ये पाणी भरण्यास सूरवात झाली.
" प्रत्येजण कोपऱ्यातील मोठ्या खांबाला पकडून राहा "
थोड्याच वेळात ही संपूर्ण टँक पाण्याने भरून जाईल "
जँक मोठ्याने ओरडला
" आता प्रत्येकाने वरच्या दिशेने पोहायला सूरवात करा नाहीतर पाण्याच्या प्रवाहाच्या कचाट्यात अडकून वाहत जाल "
सर्वानी एकमेकांनाचे हात घट्ट पकडून ठेवले होते. आणी काही वेळातच टँकमधील पाणी कंबरेर्यतं भरंल.
" त्या पाईपमधून येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरपासून दूर व्हा "
रॉबेन पून्हा मोठ्याने ओरडले.
पाण्याच्या प्रेशरमूळे सर्वजण वरच्या दिशेने ढकलले जात होते. आणी बघता बघता ती संपूर्ण टँक पाण्याने व्यापून गेली.तळाकडे जाण्यापासून रोकण्यासाठी सर्वानी एकमेकांना कसंबस पकडून ठेवलं होतं.
पाण्याचं जबरदस्त प्रेशर असूनही ते वँट अजूनही ऊघडलं नव्हतं. जँक त्या वँटवर हातपाय मारून खोलण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. सर्वाच्या तोडांत पाणी जात होतं. जर तो वँट पाण्याच्या प्रेशरमूळे लवकरात लवकर ऊघडला गेला नसता तर सर्वजणीच पाण्यात गूदमरून स्वतःचा जीव गमावून बसले असते.
अखेर रॉनने व जँकने एकञच मिळून त्या वँटवर जोरजोरात लाथा मारण्यास सूरवात केली.
आणी अचानकच तो वँट ऊघडला गेला त्याबरोबर काही क्षणातच सर्वजण पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूसऱ्या टँकंमध्ये पोहोचले होते. त्यामूळे आता दूसऱ्या टँकमध्येही पाणी भरण्यास सूरवात झाली.
जँक बाहेर आल्या आल्या त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पोहत पूढे गेला होता.
सर्वजण त्या टँकमध्ये आल्या आल्या पून्हा एकञ जमले होते.
" जँक, जँक कूठे आहे "
जँक न दिसताच ज्युली कासावीस झाली होती प्रत्येकानी आजूबाजूला पाहीलं. तेवढ्यात जँक पाण्यातून वरती आला.
" तीथे एक ऊघडा दरवाजा आहे "
" कीती दूर "
" फार लांबं नाही
सर्वानी एक दिर्घ श्वास घ्या.
आता आपल्याला एका दमात पोहतच त्या दरवाजापर्यतं जावं लागेल "
" तीथे गेल्यावर बाहेर पडण्यासाठी दूसरा कोणता मार्ग आहे का ?" रॉकी
" नक्कीच असेल
चला लवकर "
सर्वानीच पून्हा भरलेल्या पाण्यात मूसंडी मारली. आणी पाण्यातील एका लोखंडी सीढीचा आधार घेऊन पोहतच ते वरच्या दिशेने जाऊ लागले.
रॉकीने लहानग्या कॉर्नरला पाठीवर घेतलं होतं. पण पोहताना ऐलीनाचा डावा पाय नकळतच एका वायरीत अडकला गेला. त्यामूळे पाय सोडवण्याच्या नादात ती खूप वेळ मागेच थांबून राहीली. एलीना न दिसताच रॉन तीला पाण्याबाहेर घेऊन येण्यासाठी पून्हा मागे गेला.
सर्वजण कसेबसे पोहत एका गेटमधून पाण्याबाहेर आले होते.
" रॉकी ऐलीना आणी रॉन कूठे आहेत " जँक
" ते तर माझ्या मागेच होते
थांबा मी, पून्हा मागे जाऊन त्यांना घेऊन येतो "
जँक समोर बँटरीचे प्रकाशझोत मारून वरती जाण्याचा मार्ग शोधत होता. तेवढ्यात अचानकच त्याला समोरून काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक माणूस येताना दिसू लागला. त्याने घातलेल्या कोटवर जहाजाचं चिञ असलेला एक ऊठावदार लोगो होता.
हो ते कँप्टन स्मीथच होते. आणी त्याच्या मागून वेबही हळूहळू येत होता.
स्मीथना अचानक समोर पाहताच एलीजाबेथ धावत त्याना जाऊन बिलगली.
" बेटा तूला काय झालं तर नाही ना " स्मीथ
" नाही डँडी तूम्ही कसे आहात " एलीजाबेथ
" मी ठीक आहे
पण तू आता काळजी करू नकोस, आपण नक्कीच या जहाजातून सूखरूप बाहेर पडू "
स्मीथच्या येण्यामूळे सर्वानाच एक हूरूप आलं होतं. पण विल्यम माञ एका कोपऱ्यात ऊभा राहून जळफळत होता.
स्मीथनी त्याच्याकडे एकवार रोखून पाहीलं.
" विल्यम तू "
" स्मीथ मला माफ कर, मी एलीजाबेथला या जहाजावर आणायला नको होतं. माझ्याकडून मोठी चूक झाली "
" पण आता पच्छाताप करून काय फायदा. एक गोष्ट लक्षात ठेव केवळ तूझ्यामूळेच सर्वजण या जहाजात अडकले आहेत. तूझ्या स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी तू सर्वानाच संकटात टाकलंस.
तूझ्या वाईट कर्माची शीक्षा तूला नक्कीच मिळेल "
एवढं बोलून स्मीथ रागाने बाजूला झाले. त्यांना हेही माहीत होतं की त्या जहाजातून बाहेर पडल्यशीवाय ते विल्यमचं काहीच बिघडवू शकणार नव्हते.
वेबचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. जँक त्याच्याकडे रागाने बघत होता.
त्या दोघांची नजरानजर होत असतानाच रॉन पाण्यामधून बाहेर आला.
" अरे एलीना कूठे आहे ती तूझ्या सोबतच होती ना " ज्युली
" तीचा पाय मागे एका वायरीत अडकलाय जँक चल लवकर रॉकीही तीथेच आहे. एलीनाला पाण्यामधून बाहेर काढायला हवं "
रॉन धापा टाकत बोलत होता.
त्याने पून्हा एक दीर्घ श्वास घेऊन जँकसोबत पाण्यात मूसंडी मारली. आणी काही मिनीटातच त्या तीघांनीही ऐलीनाला पाण्याबाहेर आणलं.
तीचं शरीर निस्तेज झालं होत. स्पदंने थांबली होती. रॉन तीच्या छातीवर जोरजोरात हूंदके देत तीला शूद्धीवर आणण्याचा अतोनात प्रयत्न करत होता.
परंतू त्याचा काहीच फायदा झाला नाही एव्हांना तीने जीव सोडला होता. तीचा निरूप देह फक्त पाण्यावर अधांतरी तरंगत होता. खरंतर ती स्टीफनला भेटण्यासाठीच हे जग सोडून गेली होती.
एलीनाचा निस्तेज देह पाहून सर्वच हादरून गेले होते. काही वेळापूर्वी त्यांच्या सोबत असलेल्या एलीनाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला होता. एलीजाबेथ स्मीथच्या खांद्याला पकडून सहानभूती मीळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.
अखेर एलीनाला मृतदेह तीथेच पाण्यात सोडून ते सर्वजण पूढे नीघून गेले
एव्हांना दूसरा बॉयलर रूमही पाण्याने संपूर्ण भरला होता.
" पण कँप्टन तूम्ही ईथे कसे काय पोहोचलात " रॉन
" ईथूनच वरती जाण्याचा मार्ग आहे तूम्ही सर्व माझ्या मागून या "
थोड्याच वेळाच सर्वजण पूढे जाऊन वरती पोहोचले होते. तीथे जहाजातील अनेक निरूपयोगी व बिघडलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
" ईथे तर कबाड खाना बनला आहे रे " रॉकी
" थांबा सर्वानी शांत राहा
तूम्हाला रीगंचा आवाज ऐकू येतोय का ?" रॉबेन
" कसला आवाज " लूसी
" हो मला पण कूठूनतरी रीगंचा आवाज ऐकू येतोय " एलीजाबेथ
" आपल्याला वाचवणारे आले वाटतं " ज्युली
जँकच्या बोलण्याने प्रभावीत होऊन सर्वजण घरी जाण्याच्या आशेने आवाजाचा मागोवा घेत पूढे निघाले.
" कोणी आहे का तीकडे आम्ही सर्व ईथे आहोत " एलीजाबेथ
रॉकीने त्या आवाजाच्या दिशेने पूढे जाऊन बघीतलं. तो रीगंचा आवाज एका सीमेटंच्या गोणी मागून येत होता. रॉकीने ताबडतोब ती गोणी बाजूला केली आणी सर्वाच्याच अपेक्षेवर पाणी फिरलं. तीथे एका बिघडलेल्या टेलीफोनचा रीसीव्हर खाली लटकून वाजत होता. आणी त्यातूनच त्या रीगंचा आवाज येत होता.
" काय आहे रॉकी तीथे " रॉबेन
" फक्त एक डेड फोन "
रॉनच्या या वाक्याने सर्वाचीचं निराशा झाली होती.
मग प्रत्येकजण एकामागोमाग त्या सीमेटंच्या गोण्यांमागून पूढे आले.
तीथली अवस्था तर खूपच गंभीर होती. अनेकजणाचा खूपच वाईट पद्धतीने त्वचा जळून मृत्यू झाला होता.
" हवेमध्ये गर्मी वाढली असेल आणी त्यांचे फेफडे गँस प्रमाणे जळून राख झाले असतील " रॉबेन
" हे गाईज सर्वानी ईकडे या ईकडे "
कँप्टन स्मीथनी त्यांच्या पँटंच्या खीशातून एक कागद काढला त्यावर जहाजाच्या रचनेची आकृती होती.
" तूम्ही काय बघत आहात कँप्टन हा जहाजाच्या रचनेचा नकाशा आहे ना " रॉन
" हो, हे बघ या कॉरीडोरच्या खाली जहाजाचा बो आहे बरोबर
तीथे एक वॉटर टाईट दरवाजा आहे जो आपल्याला या बोथ रसल रूममध्ये घेऊन जाईल आणी एकदा का आपण सर्व प्रोपेलर ट्यूबमध्ये पोहोचलो. की मग बाहेरील अवकाश आणी आपल्यामध्ये कोणीच नसेल........आपण वाचू "
कँप्टनचा प्लान ऐकून पून्हा सर्वामध्ये घरी परतण्याच्या आशेने ऊत्साह संचारला.
" मग ठीक आहे सर्वानी लवकरात लवकरात लवकर पूढे या
चला तोच एक मार्ग आहे " जँक
एव्हांना प्रेशर टँकचे चार बॉयलर रूम्स पाण्याने पूर्णपणे भरले गेले व पाचव्या टँकमध्ये पाणी भरण्यास सूरवात झाली होती. त्यांना लवकरात लवकर जहाजामधून बाहेर पडावं लागणार होतं.
" आता आपल्याला ईथून एकदम शेवटी आणी मग तीथून वरती जायचं आहे "
स्मीथनी त्या कागदावरील जहाजाची रचना पाहून सर्वाना सांगीतलं
मग सर्वजण घाईघाईतच त्यांच्या मागून पूढे गेले.
" जरा संभालून खाली बघ "
कॉर्नर पाय घसरून खाली पाण्यात पडणार होता पण रॉबेननी त्याचा हात पकडला व त्याला पडण्यापासून वाचवलं.
पण समोर पाहताच त्यांची निराशा झाली. समोरील कॉरीडोरमध्ये खूप पूढपर्यतं पाणी भरलं होतं व त्यात मेलेल्या माणंसाचे मृतदेह पाण्यावर अधातंरी तरंगत होते.
" त्यांना घाबरू नकोस ज्यूली ते मेले आहेत " लूसी
" तूम्हाला काय म्हणायचं आहे की आपण पोहत एवढ्या लांब पोहोचू शकतो " रॉबेन
" नाही खूपच दूर आहे ते, अगदी अशक्य " स्मीथ
" कोणता दूसरा मार्ग असेल ना कँप्टन, तूम्हाला काय वाटतं "
जँकच्या या प्रश्नावर कँप्टन स्मीथ व रॉबेन दोघंही एकदम शांतच झाले. त्य दोघांकडेही काहीच ऊत्तर नव्हतं.
" तूम्ही शांत का आहात बोला ना काहीतरी
ओके ठीक आहे आपल्याला पून्हा कोणत्यातरी ऊंच जागेवर पोहोचावं लागेल.
बाहेर पडण्यासाठी कोणतातरी दूसरा दरवाजा शोधावा लागेल सर्वानी एमर्जन्सी डोर शोधायला सूरवात करा कोणताही दरवाजा चला लवकर "
ते दोघं अजूनही शांतच होते.
एव्हांना खाली पाचवा बॉयलर रूम पूर्णपणे पाण्याने भरून सहाव्या टँकमध्ये पाणी भरण्यास सूरूवात झाली होती.
" बाहेर पडायचा मार्ग मीळाला तूम्हाला " जँक
" नाही ईथून बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही " रॉकी
ते एकमेकांसोबत बोलत अचानकच ऊलट्या झालेल्या जहाजामध्ये पून्हा एक मोठा विस्फोट झाला.
बराच वेळ शोधूनही त्या जहाजातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग त्यांना आता सापडत नव्हता. शीवाय पून्हा मागे जाणंही अशक्य होतं. मागच्या प्रत्येक रूम पाण्याने भरल्या होत्या.
ते सर्वजण बाहेर पडायचा मार्ग शोधून हतबल झाले होते.
अखेर एवढ्या अडचणीचा सामना करून ते कसेबसे तीथपर्यतं पोहोचले होते. पण आता बाहेर पडण्यासाठी काहीच अंतर बाकी असताना त्यांना माघार घ्यावी लागत होती.
" आपण जाऊन तर बघूया तीथे " जँक
" नाही हे शक्य नाही जँक ते खूपच दूर आहे. आपण पाण्यातून पोहत जातानाच गूदमरून मरू आता या जहाजातून बाहेर पडायचा कोणताच मार्ग नाही " स्मीथ
कँप्टन स्मीथच्या या वक्तव्यावर माञ सर्वजण शांत झाले. प्रत्येकाला स्वतःचं मरण बघवणार नव्हतं. पण त्यापूढे काही ईलाजही नव्हता. फक्त काही क्षणाचाचं अवधी मग ते सर्वच त्या अथांग महासागरात जलमग्न होऊन तळाशी जाणार होतं.
" हे बघ जँक जीवन आणी मृत्यूवर कोणाचाच अधीकार नसतो.
तू एलीनाला वाचवण्याचे प्रयत्न केलेस.
तू आम्हा सगळ्यान वाचवण्याचे प्रयत्न केलेस " स्मीथ
" थँक्यू सो मच कँप्टन पण माझा यावर विश्वास नाही.
जर माणसाने त्याची संपूर्ण ईच्छाशक्ती एकवटून येणाऱ्या परीस्थीतीशी प्रकीकार करण्याची क्षमता बाळगली की हे जगही त्याच्या कर्तत्वाची दखल घेण्यास राजी होतं "
जँक खरं बोलत होता.
कारण अचानकच टर्बाईन स्कॉट मध्ये विस्फोट होऊन एक मोठा आगीचा ओघ तळपळत बाहेर आला. त्यामूळे सर्व जहाज काही क्षणातच संपूर्ण आगीने व्यापून गेलं. त्यातच भर म्हणून की काय सातव्या बॉयलर रूममध्ये पाणी शीरल्यामूळे जहाजाच्या स्टर्नकडील बाजूवर प्रेशर पडून पूढील भाग वरती आला. व त्यामूळेच त्याच्या समोरील चेबंरमध्ये एकञ जमा झालेलं सर्व पाणी बाहेर आलं. आणी त्यांना पूढे जाण्यासाठी वाट मोकळी झाली.
या सर्वच गडबडीत लहानगा मीशेल त्याच्या आईपासून वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर कूठेतरी दूर गेला होता. तो आजूबाजूला कूठेच दिसत नसल्याने लूसीने बाहेर येऊन पाहीलं. पाण्यच्या जबरदस्त ओघामूळे सर्वच ऊध्वस्त झालं होतं. ती अगदी कासावीस होऊन कॉर्नरला सगळीकडेच शोधत होती. सर्वच वस्तू क्षणाक्षणाला तूटून पाण्याच्या ओघाबरोबर वाहून जात होत्या.
" यस जँक यू आर ग्रेट
तूझं बोलणं खरं ठरलं. ह्या चोबंरमधील पाणी निघून गेल्यामूळे आता आपण प्रोपेेलर ट्यूबमध्ये जाऊन बाहेर पडायचा मार्ग शोधू शकतो
कम ऑन सर्वानी आता लवकरात लवकर पूढे या "
अचानकच पून्हा सर्वामध्ये ऊत्साह संचारला होता.
" कँप्टन तूम्ही पूढे व्हा मी लूसीला व कॉर्नरला घेऊन प्रोपेलर ट्यूब मध्ये पोहोचतो "
जँक त्या दोघांना शोधण्यासाठी पून्हां मागे आला. लूसीने एका जाड लोखंडी खांबाला घट्ट पकडून स्वतःला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापासून कसंबसं रोखलं होतं. पण कॉर्नरचा माञ कूठेच पत्त नव्हता.
" लूसी तूला लागलं तर नाही ना " जँक
" मीशेल, मीशेल कूठे आहे " लूसी
" रडू नकोस, आपण त्याला शोधून काढू तो आपल्याला नक्कीच सापडेल.
कम ऑन लूसी " जँक
" मीशेल तू कूठे आहेस "
लूसीने त्याला मोठ्याने आवाज दिला. मग ते दोघंही त्या भरलेल्या पाण्यामध्ये कॉर्नरला शोधू लागले.
वरती स्मीथनी एक मोठा हँच खोलून जहाजाच्या तळ मजल्यामध्ये प्रवेश केला होता. मग पून्हा एक आडवी सीढी चढून ते सर्वजण बो कँबीनेटमध्ये पोहोचले होते. त्या ठीकाणी प्रोपेलर स्कॉटमधून खूपच गरम वाफा बाहेर निघत होत्या. प्रत्येक कोनाड्यात जाड लाबंलचक साखळ्यांनी मोठमोठ्या खांबाना जखडून ठेवलं होतं.
" ही नक्कीच प्रोपेलर ट्यूब असायला हवी "
रॉबेननी एका मोठ्या पाईपच्या दिशेने ईशारा करत सर्वाना कल्पना दिली.
" हो ही प्रोपेलर ट्यूबच आहे "
कँप्टन स्मीथ व रॉबेन एकमेकांसोबत बोलत असताना रॉकी कोणालाही न सांगताच त्या प्रोपेलर ट्यूबपर्यतं पोहोचला.त्या ट्यूबच्या मध्यभागी आत जाण्यासाठी एक गोलाकार हँच होता.
" रॉकी थांब तो हँच खोलू नकोस "
स्मीथ मोठ्याने ओरडले पण रॉकीला कदाचीत ऐकू गेलं नसावं. त्याने हँच ऊघडला व प्रोपेलर ट्यूबमध्ये खूप वेळ कोडूंन राहीलेली गरम वाफ रॉकीच्या तोडांवर आली. वेदना असह्य होऊन तो अचानक ऊलट्या झालेल्या सीढ्यांवरून खाली पडला. त्या गरम वाफेच्या फनकाऱ्याने रॉकीच्या चेहऱ्यावरील त्वचा गंभीररीत्या भाजली होती. सूदैवाने पायऱ्याजवळ रॉन आणी एलीजाबेथ ऊभे होते. त्यामूळेच तो खाली पडून मरण्यापासून वाचला होता.
एव्हाना जँकने व लूसीने मीशेलला शोधून काढले पण तो एका छोट्याशा रूममध्ये अडकला होता.
कँप्टन स्मीथनी बाजूला पडलेला एक कागद ऊचलला.
" रॉबेन ईकडे या हे बघा पाणी झपाट्यने वाढत आहे.
या प्रोपेलर ट्यूबचा ईजीनं कंन्ट्रोल रूम पाण्याखाली आहे. जवळजवळ एकशे पन्नास फूट खाली.
आपल्याला पाण्यामधून तीथे पोहत जाऊन तो प्रोपेलर टँब बंद करावा लागेल "
कँप्टन स्मीथ बाजूला भरलेल्या पाण्याच्या दिशेने ईशारा करत रॉबेनना समजावत होते.
" नाही कँप्टन, आपण अशी कोणतीही वस्तू घेऊ जी प्रोपेलरमध्ये अडकून राहील व त्यामूळे प्रोपेलर फँन बंद होईल मग आपण बाहेर पडू शकतो "
" नाही वेब तसं होणार नाही. हा प्रोपेलर ऊलट्या बाजूने फिरत आहे.
हा प्रत्येक वस्तूला आपल्याकडे फेकेल आपल्याला या प्रोपेलरला बंदच करावं लागेल "
जँक व लूसी थोड्याच वेळात कॉर्नरपर्यतं पोहोचले.
" कॉर्नर तू आतमध्ये कसा काय अडकलास " जँक
" माहीत नाही. पण पाणी वाढत आहे मॉम, मला लवकर बाहेर काढा "
कॉर्नर रडत रडत मोठ्याने ओरडत होता.
" तू रडू नकोस बेटा. आम्ही तूला लवकरच या जाळीमधून बाहेर काढू "
लूसी त्याला धीर देता देता स्वतःही रडत होती.
जँकने कॉर्नरला बाहेर काढण्यासाठी पून्हा पाण्यात झेप घेतली.
ते दोघंही एकमेकांना भेटण्यासाठी अगदाल आतूर झाले होते. मध्ये जाळी असल्यामूळे लूसीला कॉर्नरपर्यतं पोहोचता येत नव्हत.
" पलीकडे जाण्यासाठी एक दरवाजा आहे तो दरवाजा ऊघडला की आपण कॉर्नरला बाहेर काढू शकतो "
जँक पाण्यातून बाहेर आला व लूसीला समजाऊ लागला.
मग थोड्यावेळाने त्याने पून्हा पाण्यात झेप घेतली. व पूढे जाऊन त्या रूमचा बंद दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागला.
" हे शक्य नाही कँप्टन आपल्याला बाहेर पडण्यासाठी दूसरा एखादा मार्ग शोधावा लागेल " वेब
" बेटा घाबरायची काहीच गरज नाही.
मी खालच्या ईजींन रूममध्ये जाऊन पून्हा लवकरात लवकर वरती येईन " स्मीथ
" डँड तूम्ही तीथे नका जाऊ, डँड प्लीझ माझं ऐका " एलीझाबेथ
" हो एलीजाबेथ बरोबर बोलतेय. तूम्ही तीथे नाही पोहोचू शकत कँप्टन., नाही पोहोचू शकत. हे एकदम अशक्य आहे. प्रोपेलरचं ईजीनं कंन्ट्रोल खूपच दूर आहे
आणी तूम्हाला हेही माहीत आहे की कदाचीत मीच तीथे पोहचू शकतो. आणी ते ही एकाच श्वासात.
रॉन एलीजाबेथंच रडणं ऐकून कँप्टन स्मीथना तीथपर्यतं जाण्यापासून रोखण्यासाठी असं बोलत होता.
" नाही रॉन तू तीथे गेलास तर पून्हा वरती येण्याच्या लायकीचा राहणार नाहीस " स्मीथ
" आपल्यापैकी कोणालातरी तीथे जावंच लागेल. आणी तोच जाईल जो पोहत तीथपर्यतं पोहोचू शकतो.
बरोबर ना मी काही चूकीचं तर बोललो नाही ना " रॉन
" डँड प्लीझ तूम्ही तीथे जाऊ नका माझं ऐका " एलीजाबेथ
" नाही एलीजाबेथ हे शक्य नाही.
मी या जहाजाचा कँप्टन असल्यामूळे या जहाजातील प्रवाशांचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे. मला तीथे जावचं लागेल " स्मीथ
" कँप्टन तूम्ही मला फक्त हे सांगा की मी कसं.........."
पाण्याचा आवाज झाल्यामूळे रॉन थांबला त्याने मागे वळून पाहीलं. कोणाचंच लक्ष नसताना मी. रॉबेननी पाण्यात झेप घेतली होती.
रॉबेन वेगाने पोहोत प्रोपेलरच्या ईजींन रूमपर्यतं पोहोचण्याचा अतोनात प्रयत्न करत होते.
एकीकडे जँक पून्हा पाण्यातून बाहेर आला होता.
" कॉर्नर जीथे अडकला आहे त्या रूमचा दरवाजा आतून बंद आहे कदाचीत तो दरवाजा ऊघडूनच आपण कॉर्नरला पाण्यात बूडण्यापासून वाचवू शकतो "
कॉर्नर घाबरून सारखा रडत होता. त्या छोट्याशा जाळीमधून त्याची लहानशी बोटं बाहेर येत होती.
" तू घाबरू नकोस बेटा मी ईथेच आहे. ईथे तूझ्या सोबतच ऊभी आहे " लूसी
ज्या रूममध्ये कॉर्नर अडकला होता तो रूम पूर्णपणे पाण्याने भरला गेला. आणी त्या भरलेल्या पाण्यामधूनही कॉर्नरचे बोबडे बोल लूसीला स्पष्ट ऐकू येत होते. ती जीवाच्या आकांतेने मोठमोठ्याने रडून त्याचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. मग काही वेळाने तीही पाण्यात बूडू लागली.
एव्हांना रॉबेन ईजींन रूमचं दार ऊघडून कसेबसे आतमध्ये पोहोचले होते.
जहाज ऊलटं झाल्यामूळे सर्व नावंही त्यानां ऊलटी दिसत होती. त्यामूळे प्रोपेलरचं मूख्य ईजींन बंद करण्यास त्यांना ऊशीर होत होता. त्यातच भर म्हणून की काय तीथलं ईमर्जन्सी स्टॉपच बटणही वायरीसहीत बाहेर निघून आलं होतं. त्यांनी निट पाहीलं त्या बटणाच्याच बाजूला दोन चैकोनी आकाराची मोठी बटणं होती. त्यापैकी एकावर स्टारबोरड ( ऊजवीकडे वळवणे ) आणी दूसऱ्यावर पोर्ट ( डावीकडे वळवणे ) असं लिहीलं होतं. एव्हांना त्यांचा श्वास पाण्यामध्ये कोढूं लागला होता. मग शेवटचा पर्याय म्हणून त्यानी पोर्टचं बटण दाबलं. त्यामूळे प्रोपेेलर डाव्या दिशेने फीरू लागला होता परीणामता त्यामध्ये खिचाव ऊत्पन झाला. रॉबेन पून्हा मागे येण्यासाठी त्या ईजींनरूममधून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतू त्यांच्या बाहूत आता प्राण ऊरले नव्हते. त्यांची सहनशक्ती संपत आली होती. तीथून पून्हा दीडशे फूट पोहत मागे येणं म्हणजे निव्वल अशक्य होतं. ईतरांचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामूळे अगदी शेवटच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले होते. अखेर त्यांनी प्राण सोडला होता.
एव्हांना जँक पाण्यामधून पून्हा बाहेर आला होता व यावेळी कॉर्नरलाही सोबत घेऊन येण्यामध्ये तो यशस्वी झाला होता.
कॉर्नरला बाहेर आलेलं पाहून लूसीच्या जीवात जीव आला. तीने कॉर्नरला ह्रूदयाशी कवटाळून घेतलं.
" मी म्हटलं होतं ना.
आम्ही तूला सूरक्षीत बाहेर काढू "
कॉर्नरचा जीव वाचल्यामूळे लूसीला खूपच आनंद झाला होता.
अजूनही एलीजाबेथ पाण्यावर स्वतःची भीरभीरती नजर रोखून रॉबेनची वाट पाहत बसली होती. परंतू त्याचा मृत्यू केव्हांच झाला होता हे प्रत्येकाच्या लक्षात आल्यावाचून राहीलं नव्हतं.
तेवढ्यात जँक त्या मायलेकाना घेऊन वरती पोहोचला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. रॉबेन त्याला कूठेच दिसत नव्हते.
" हे ज्यूली रॉबेन कूठे आहेत " जँक
" हा प्रोपेलर बंद करण्यासाठी त्यांनी कोणालाच न सांगता पाण्यामध्ये ऊडी घेतली.
" कीती दूर आहे तो प्रोपेलरचा ईजींन रूम ? ते केव्हा गेले ?"
जँकच्या या प्रश्नावर माञ सर्वजणच शांत होते.
त्यामूळे नक्कीच रॉबेन पाण्यात बूडून मेले असतील याची कल्पना जँकला आली होती. नाहीतर ते केव्हांच वरती आले असते.
" हे काय आहे "
जँकने प्रोपेलर ट्यूबच्या दिशेने धाव घेतली व बाहेरील हँच ऊघडून तो ट्यूबमधील फँनकडे बँटरीचे प्रकाशझोत मारून पाहू लागला. त्या ट्यूबमधील वाऱ्याचा जबरदस्त खीचावामूळे जँक प्रोपेलरच्या दिशेने खेचला जात होता.
" त्यांनी ईजींन रीव्हर्स केलं आहे त्यामूळे खीचाव ऊत्पन्न होईल आपण कोणतीही अवजड वस्तू फेकून प्रोपेलर फँन थांबवू शकतो. "
कँप्टन स्मीथनी जँकला स्पष्टीकरण दिलं.
" ओ रॉबेन जीनीअस आहेत यार त्यांनी जाता जाता सर्वच सोप करून ठेवलंय.
विल्यम तो लाल सींलेडर माझ्यापर्यतं घेऊन ये "
ईमर्जन्सी आग विजवण्यासाठी असलेला लाल सीलेडंर विल्यमच्या बाजूला पडला होता. विल्यमने ऊलट्या सीढ्यांवर चढून तो सीलेडंर जँकच्या हातात दिला.
" मागे व्हा सर्वजण लवकरात लवकर मागे व्हा
मी आता हा सीलेडंर प्रोपेलर ट्यूब मध्ये टाकणार आहे त्यामूळे मोठा स्फोट होऊन दोन्ही प्रोपेलर फँन फिरायचे थांबतील "
जँकने काही वेळातच त्या लाल सीलेंडरवरील आच्छादन काढून तो सीलेंडर वेगाने फिरणाऱ्या प्रोपेलर फँनमध्ये फेकला पण हवेच्या जबरदस्त खीचावामूळे तो सीलेडंर सरळ प्रोपेलर ट्यूबमध्ये न जाता त्या ट्यूबबाहेरील हँचमध्येच अडकून राहीला. त्याबरोबरच जँकही हवेच्या बेसूमार खीचावाने ट्यूबमध्ये ओढला जाऊ लागला व त्या सीलेडेरप्रमाणेच तोही त्या गोलाकार हँचबाहेर अडकून राहीला.
त्या ट्यूबमधील प्रोपेलर फँनच्या वेगात फिरण्यामूळे पाण्याचे फवारे आतल्या बाजूने बाहेर जात होते.
यावेळी आठव्या म्हणजेच शेवटच्या बॉयलर रूममध्ये पाणी भरण्यास सूरवात झाली होती. पाण्याच्या जबरदस्त प्रेशरमूळे प्रत्येक वेल्डीग पीलरला तडा जाऊन पाण्याचे मोठमोठे ओघ त्यांच्या रूममध्ये येऊ लागले होते. फक्त काही क्षणांचाच अवधी मग ते विशाल जहाज निथल पाण्याशी झूझं देत समूद्रात विलीन होणार होत.
जँक कसाबसा जोर लावून तो लाला सीलेंडर ट्यूबमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होता. पण हवेच्या जबरदस्त खीचावाने त्याला हँचवर थोपून धरलं होतं.
जँकने त्याची संपूर्ण शक्ती एकवटून तो सीलेडंर हँचच्या तोडांपासून बाजूला केल्याबरोबरच अचानक विजेच्या वेगाने तो सीलेडरं प्रोपेलर ट्यूबमध्ये गेला व क्षणार्धात मोठा विस्फोट होऊन आगीचा एक जीवघेणा ओघ ट्यूबमधून बाहेर आला. आणी मग सर्वच अचानक शांत झालं.
ट्यूबमधील दोन्ही प्रोपेलर फँन विस्फोटामूळे तूटून ऊध्वस्त झाले होते. त्यांमूळे त्यांना बाहेर पडण्यासाठी तीथे एक छोटीशी जागा ऊपलब्ध झाली होती.
परंतू या सर्वच गडबडीत जँकचा माञ कूठेच पत्ता नव्हता. ज्यूलीची भीरभीरती नजर कासावीस होऊन त्याला आजूबाजूला शोधू लागली.
आणी अचानकच तो जखमी अवस्थेत ट्यूबमधुन बाहेर आला.
जँकला पाहताच सर्वााच्या जीवात पून्हा जीव आला होता.
त्या मोडलेल्या प्रोपेलरच्या पंख्यामधून बाहेर येत प्रत्येकाने जहाजाबाहेर पाऊल ठेवलं.
दाट धूक्याने व्यापलेला आसंमत चंद्राच्या मंद प्रकाशात आणखीनच भयाण वाटत होता. त्यातच भर म्हणून की काय थंड हवेच्या स्पर्शाने प्रत्येकाच्या रोमरोमात शहारून येत होतं.
त्या जहाजातील जीवघेण्या संघर्षातून त्यांनी यशस्वीरीत्या स्वतःची सूटका करून घेतली होती.
क्रमशः
पूढील भाग लवकरच.....................
भाग १५ साठी
http//www.maayboli.com/node/62257
भाग १४ साठी
http//www.maayboli.com/node/62152
भाग १३ साठी
http//www.maayboli.com/node/62075
Wah, Hollywood movie chi
Wah, Hollywood movie chi aathvan zali, pudhil part chi waat baghte.
धन्यवाद सर पूढचा भाग नक्कीच
धन्यवाद, पूढचा भाग नक्कीच मनोरंजक असेल
पोसायडॉन मधली वाटली ही सगळी
पोसायडॉन मधली वाटली ही सगळी सुटका..
पोसायडॉन मधली वाटली ही सगळी
पोसायडॉन मधली वाटली ही सगळी सुटका..>> अगदी बरोबर!!
वाचतांना तो पूर्ण भाग दिसत होता डोळ्यासमोर.
खुपच मस्त रे भावा...!!! अगदी
खुपच मस्त रे भावा...!!! अगदी कल्पना पलिकडेचा हा भाग झालाय....!!! खुपच थरार होता या भागामध्ये....!! एक हॉलिवुड अॅक्शन चित्रपट पाहत आहे, असे वाटले....!!! हा भाग पण मागील सर्व भांगापेक्षा खुपच मोठा होता...!!! वाचताना खुप मजा आली....!! असेच लिहीत रहा....!!! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...!!!
जबरी रे भावा!
जबरी रे भावा!
पोसायडाॅन आठवला. पुढचा भाग लवकर टाक.
सर्वाचे मनापासून धन्यवाद,
सर्वाचे मनापासून धन्यवाद, पूढील भाग लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करेन
अतिशय उत्कंठावर्धक भाग होता
अतिशय उत्कंठावर्धक भाग होता हा... पुढील भागाच्या प्रतीक्षेत
धन्यवाद गैरी
धन्यवाद गैरी