दर महिन्याला नेचरकॅम्प आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळी ठिकाणी पालथी घालून होतात. पण महाराष्ट्राच्या बाहेर वर्षातून एकदा तरी जाणं जमून यावं अशी माझी इच्छा असते. देशाच्या बाहेर फिरणं अजून तरी परवडेबल नाही. असो. यावेळी मी कूर्ग कोडागु हे कर्नाटकातील ठिकाण निवडले. तिथे काढलेली काही छायाचित्रे खाली देत आहे.
मडिकेरी -
हे शहर कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. इथल्या हवेत अगदी दुपारी २ वाजताही बराच गारवा होता.
राजा सीट मंटप
दुबारे एलिफ़ंट पार्कमधील हत्तीची अंघोळ.
कावेरी नदीजवळच हे पार्क आहे. कूर्गमधील बाकी सर्व ठिकाणांच्या मानाने इथे लहान मुलांची बरीच गर्दी होती. अतिशय रम्य ठिकाण. पण मुलांना घेऊन फिरायला आलेल्या कित्येक आईबाबांनी बाळांचे डायपर नदीच्या पात्रातच फेकून या ठिकाणाची रम्यता अजून वाढवली होती.
#
कूर्गमध्ये पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट - इमिग्रंट फुलपाखरांचे चिखलपान mud - puddling
मंगलोरवरून कूर्गच्या दिशेने जाताना चहूबाजूला इमिग्रंट फुलपाखरे मोठ्या संख्येने भिरभिरत होती. कदाचित त्यांचे स्थलांतर चालू असावे. दुबारेला तर कावेरी नदीच्या काठी त्यांचा चिखलपान करतानाचा हा सुंदर फोटो मिळाला.
फुलपाखरांना त्यांच्या आहारात फुलामधल्या रसाखेरीज क्षारांची पण गरज असते. ही गरज ते ओल्या जमिनीतील क्षारांच्या द्वारे पूर्ण करतात.
काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र अशा रंगीबेरंगी अळंब्या उगवल्या होत्या.
प्रवासातल्या सोबतीणींचे फोटो
#
हा परिसर सदाहरित वनांचा आहे. ओल्या जमिनीवर वाढणारी नेचे हि वनस्पती या वनांची खास ओळख.
इरप्पू धबधबा.
हे ठिकाण स्थानिक लोकांनी मला वगळायला सांगितले होते. का तर म्हणे आता फारसे पाणी नसल्याने तिथे अंघोळ करता येणार नाही कि डुंबता येणार नाही. त्यांच ऐकलं असतं तर एक अतिशय सुंदर जंगल पाहायला मुकले असते आणि वर माझी लाडकी अशी खूप सारी फुलपाखरेही तिथे पाहायला मिळाली हा आनंद निराळाच.
इरप्पू धबधब्याजवळ चिखलपान करणारे हे ब्लुबॉटल फुलपाखरू.
भाईचारा.
चितळ आणि लंगूर यांचा भाईचारा बऱ्याच निसर्गाभ्यासकांच्या तोंडून ऐकला होता. पुस्तकांमधून वाचला होता. नागरहोळे जंगलामधील हा लंगूर झाडाच्या फांद्या तोडून या चितळाला अक्षरशः भरवत होता.
#
#
आणि हा शेवटचा फोटो काढण्याची इच्छा मला अगदी शाळेत असल्यापासून होती. चहाची शेती आणि चहाची तोडणी करणाऱ्या स्त्रियां.
त्या हाताने पाने तोडण्याऐवजी एक ट्रे सारखा कटर वापरतात.
वॉव , सुंदर जागा आणि फोटोज .
वॉव , सुंदर जागा आणि फोटोज .
काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र अशा रंगीबेरंगी अळंब्या उगवल्या होत्या. >>> जरा कन्फुज झालो होतो त्याच्या खालचा फोटो पाहुन
बदल केले आहेत.
बदल केले आहेत.
मस्त फोटो आहेत..
मस्त फोटो आहेत..
कूर्ग खूप सही जागा आहे.. कधीतरी जायला हवे
छान आहेत फोटोज
छान आहेत फोटोज
अतिशय सूंदर फोटो. जायला आवडेल
अतिशय सूंदर फोटो. जायला आवडेल इथे. तूम्ही कोणत्या महिन्यात गेल्या होता.
या महिन्यातच. गेल्या आठवड्यात
या महिन्यातच. गेल्या आठवड्यात.
सुंदर आहेत फोटो. कूर्ग अगदी
सुंदर आहेत फोटो. कूर्ग अगदी छान जागा आहे खरंच!
प्रतिज्ञा अतिशय सुंदर फोटो
प्रतिज्ञा अतिशय सुंदर फोटो काढले आहेस.
मला खूपच आवडले.
मस्त फोटोज भाई-चारा
मस्त फोटोज
भाई-चारा
छान मस्त फोटोज. मजा आली
छान मस्त फोटोज. मजा आली वाचताना. मड पडलिंग्चा फुलपाखरांचा फोटो फार आवडला
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
कूर्गचा रूट बराच आडवा तिडवा
कूर्गचा रूट बराच आडवा तिडवा आहे जायला असे दिसते. यात जाण्याबद्दल काही मार्गदर्शन नाही.
मस्त फोटो, मस्त माहिती.
मस्त फोटो, मस्त माहिती.
खुपच सुंदर सगळे फोटो.
खुपच सुंदर सगळे फोटो.
कूर्गचा रूट बराच आडवा तिडवा आहे जायला असे दिसते. यात जाण्याबद्दल काही मार्गदर्शन नाही.>>>> दिनेशदा त्याचा कुर्ग प्रवासाचा एक धागा त्यात डीटेल सापडतील तुम्हांला
कूर्गचा रूट बराच आडवा तिडवा
कूर्गचा रूट बराच आडवा तिडवा आहे जायला असे दिसते. यात जाण्याबद्दल काही मार्गदर्शन नाही.>>> जाण्याबद्दल मी काही खास मार्गदर्शन करु शकते असं मला वाटत नाही. रस्त्यांच्या बाबत माझी स्मरणशक्ती धन्य आहे. मंगलोर इथून गाडी बुक केली होती. तिथून कुर्गला पोहोचायला ४ तास लागले. आमचे गेस्ट हाउस कुर्गमध्ये बर्याच आतल्या भागात होते.
फोटो छान आहेत!! कूर्गला
फोटो छान आहेत!! कूर्गला Scotland of India का बरे म्हणतात????
सर्व फोटो छान, इथे
सर्व फोटो छान, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
सुंदर.. वर्णन आणि फोटो २न्ही!
सुंदर.. वर्णन आणि फोटो २न्ही!
खूप सुंदर फोटो..
खूप सुंदर फोटो..
कूर्गला Scotland of India का
कूर्गला Scotland of India का बरे म्हणतात????>>दोन्ही ठिकाणांमध्ये काही भौगोलिक समानता असावी. म्हणजे डोंगराळ भाग, थंड हवा वगैरे वगैरे
'दुनियामे जर्मनी और इंडियामे
'दुनियामे जर्मनी और इंडियामे परभणी' अशी एक म्हण आहे तसे असेल ते
असेल.
असेल.
मस्त छायाचित्रे. फुलपाखरे आणि
मस्त छायाचित्रे. फुलपाखरे आणि नेचे खूपच आवडले.
सुंदर आहेत फोटो, आणि वर्णनही
सुंदर आहेत फोटो, आणि वर्णनही आवडले! कूर्ग बहुधा म्हैसूरहूनही जायला जवळ असावे.
हो. कुर्ग म्हैसूरहून जास्त
हो. कुर्ग म्हैसूरहून जास्त जवळ आहे.
फार मस्त चित्र आणि लेखन.
फार मस्त चित्र आणि लेखन. कूर्गचे रस्तेच खूप सुंदर आहेत. अखंड त्या रस्त्यांवरून चालत राहावंसं वाटतं.
आम्ही आत्ताच जाऊन आलो.
इथे उच्च प्रतीचे मसाले मिळतात. मिरी, लवंग आणि वेलची अप्रतिम आहे. तसेच जंगली लवंग म्हणून एक प्रकार आहे तोही अतिशय चव वाढवणारा आहे. नॉन व्हेज खाणाऱ्या लोकांनी इथून जरूर खरेदी करावी. कॉफी (फिल्टर) चे पण चांगले प्रकार आहेत.
कूर्ग बहुधा म्हैसूरहूनही
कूर्ग बहुधा म्हैसूरहूनही जायला जवळ असावे. >>>> नाही. मेंगलोर फ्लाइट घेतली तर कुर्ग बाय रोड ४ तास आहे. अणि त्या ऐवजी बेंगलोर फ्लाइट घेतली तर बेंगलोर पासुन मैसुर साधारण ३ तास आणि पुढे मैसुरहुन कुर्ग साधारण ४ तास. पण रस्त्यात मैसुर पॅलेस आणि कुशालपुरची गोल्डन मॉनेस्ट्री पहायची असेल तर बेंगलोरवरुन जाणं जास्त सोयिस्कर आहे. कुशालपुरची मॉनेस्ट्री खुप छान आणि तिथल्या शाळेत शिकणारे सगळे पिल्लु मॉन्क्स खुप क्युट आहेत. मैसुर पॅलेस सुद्धा पहाण्यासारखा आहे.
सुंदर फोटो आहेत..
सुंदर फोटो आहेत..
कुर्ग सारखेच सुंदर आणि अजुनही
कुर्ग सारखेच सुंदर आणि अजुनही थंड असलेले ठिकाण कुन्नुर आहे, तिथली २/४ दिवसांची ट्रिप छन होते. मदुमलाई चे जंगल आणि थेपकडु हुन पुठे बांदिपुर हे कर्नाटकातले अभयारण्य अस सगळा पल्ला गाठता येतो. ऊटी ही आहे, पण ते आता पुण्या इतकेच थंड आहे.
मस्त फोटो. मलाही कुर्गला
मस्त फोटो. मलाही कुर्गला एकदा जायचंय.
Pages