The Scotland of India: Coorg

Submitted by pratidnya on 25 May, 2017 - 10:38

दर महिन्याला नेचरकॅम्प आणि ट्रेकिंगच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वेगवेगळी ठिकाणी पालथी घालून होतात. पण महाराष्ट्राच्या बाहेर वर्षातून एकदा तरी जाणं जमून यावं अशी माझी इच्छा असते. देशाच्या बाहेर फिरणं अजून तरी परवडेबल नाही. असो. यावेळी मी कूर्ग कोडागु हे कर्नाटकातील ठिकाण निवडले. तिथे काढलेली काही छायाचित्रे खाली देत आहे.

मडिकेरी -
हे शहर कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. इथल्या हवेत अगदी दुपारी २ वाजताही बराच गारवा होता.
IMG_2735.JPG

राजा सीट मंटप
IMG_2738.JPG

दुबारे एलिफ़ंट पार्कमधील हत्तीची अंघोळ.
IMG_2911.JPG

कावेरी नदीजवळच हे पार्क आहे. कूर्गमधील बाकी सर्व ठिकाणांच्या मानाने इथे लहान मुलांची बरीच गर्दी होती. अतिशय रम्य ठिकाण. पण मुलांना घेऊन फिरायला आलेल्या कित्येक आईबाबांनी बाळांचे डायपर नदीच्या पात्रातच फेकून या ठिकाणाची रम्यता अजून वाढवली होती.

IMG_2955.JPG

#
IMG_2957.JPG

कूर्गमध्ये पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट - इमिग्रंट फुलपाखरांचे चिखलपान mud - puddling
मंगलोरवरून कूर्गच्या दिशेने जाताना चहूबाजूला इमिग्रंट फुलपाखरे मोठ्या संख्येने भिरभिरत होती. कदाचित त्यांचे स्थलांतर चालू असावे. दुबारेला तर कावेरी नदीच्या काठी त्यांचा चिखलपान करतानाचा हा सुंदर फोटो मिळाला.
फुलपाखरांना त्यांच्या आहारात फुलामधल्या रसाखेरीज क्षारांची पण गरज असते. ही गरज ते ओल्या जमिनीतील क्षारांच्या द्वारे पूर्ण करतात.

IMG_2979.JPG
काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सर्वत्र अशा रंगीबेरंगी अळंब्या उगवल्या होत्या.

प्रवासातल्या सोबतीणींचे फोटो
IMG_3003.JPG

#
IMG_3090.JPG
हा परिसर सदाहरित वनांचा आहे. ओल्या जमिनीवर वाढणारी नेचे हि वनस्पती या वनांची खास ओळख.

IMG_3110.JPG
इरप्पू धबधबा.

हे ठिकाण स्थानिक लोकांनी मला वगळायला सांगितले होते. का तर म्हणे आता फारसे पाणी नसल्याने तिथे अंघोळ करता येणार नाही कि डुंबता येणार नाही. त्यांच ऐकलं असतं तर एक अतिशय सुंदर जंगल पाहायला मुकले असते आणि वर माझी लाडकी अशी खूप सारी फुलपाखरेही तिथे पाहायला मिळाली हा आनंद निराळाच.

IMG_3128.JPG
इरप्पू धबधब्याजवळ चिखलपान करणारे हे ब्लुबॉटल फुलपाखरू.

IMG_3168.JPG
भाईचारा.

चितळ आणि लंगूर यांचा भाईचारा बऱ्याच निसर्गाभ्यासकांच्या तोंडून ऐकला होता. पुस्तकांमधून वाचला होता. नागरहोळे जंगलामधील हा लंगूर झाडाच्या फांद्या तोडून या चितळाला अक्षरशः भरवत होता.

IMG_3181.JPG
#
IMG_3182.JPG
#
IMG_3233.JPG

आणि हा शेवटचा फोटो काढण्याची इच्छा मला अगदी शाळेत असल्यापासून होती. चहाची शेती आणि चहाची तोडणी करणाऱ्या स्त्रियां.
त्या हाताने पाने तोडण्याऐवजी एक ट्रे सारखा कटर वापरतात.

Group content visibility: 
Use group defaults

प्रतिज्ञा,
सुंदर फोटो काढलेयत. खूप आवडले.

खूपच सुंदर प्रचि !

फुलपाखरू अन चहाच्या मळ्याचे फोटो क्लासच !

खरंच कूर्ग (कोडगू ) हा भारतातील स्वर्ग आहे.
इथं कितीही राहिलं तरी मन भरणार नाही !

फारच छान फोटो.
फुलपाखरे आणि माकड हरीण सगळ्यात जास्त आवडले.

Pages