Submitted by धनि on 31 May, 2017 - 09:38
फत्थरांच्या इमल्यांचे जंगल सभोवती वाढते आहे
या भकास वातावरणात मला तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
तुझे झाडांवरील प्रेम, त्यांच्या वाढीसाठीचा कळवळा
आता मात्र नुसती झाडेतोड , ही धरा सहते आहे
हिरव्यागार त्या पाचूवनात पाऊस येई मृदगंध दरवळे
उजाड या शहरात पाऊस पूर बनून कोसळतो आहे
उकाडा वाढतोय , पूर्वीची ती मंद हवा आता उदास भासते आहे
विकासाच्या या हव्यासात मला तरी तुझ्या झाडांचे स्मरण होते आहे
(प्रेरणा: http://www.maayboli.com/node/62719 )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला!! भारीच की , धनि!!
हायला!! भारीच की , धनि!!
सही , मस्त रे धनि.
सही , मस्त रे धनि.
हाहाहा.... मस्त.
हाहाहा.... मस्त.
तुझ्या झाडांचे सरण, असे शीर्षक पाहिजे होते.
-दिलीप बिरुटे
तुझ्या झाडांचे सरण >> प्रा.
तुझ्या झाडांचे सरण >> प्रा. साहेब बरोबर आहे तुमचं म्हणणं
वाह धनि!!
वाह धनि!!