पाऊस

Submitted by shuma on 21 May, 2017 - 12:53

आजचा पाऊस
फारा वर्षांनी
पुन्हा तुझा माझा
कोसळत राहिला
बाहेरही अन आतही
काचांवर अन खाचांतून
डोळ्यांच्या अविरत ...
सारे थेंब ओथंबलेले
सावरलेले आजवर
निसटले न जुमानता
माझ्याच नजरकैदेतून
ऐकूआली टपटप
तुलाही दूरवर
माझ्याही नकळत
ओघळलेल्या सरींची
सावरले परत क्षण सारे
आवरत पसारा थेंबांचा
त्यातील काही थेंबांवर मात्र
हक्क तुझाही होता

शमा

Group content visibility: 
Use group defaults