साधना

साधना - ४ : समाप्त

Submitted by प्राचीन on 12 March, 2019 - 05:48

युक्ताहार -
यापुढील भागात आहाराबाबत काही मुद्दे पाहू.
साधनेच्या दृष्टीने आहारशुद्धीचे फार महत्त्व आहे. अन्नाद् भवति भूतानि। (भ.ग३/१४)

शब्दखुणा: 

साधना - २ : साधनेचे मार्ग

Submitted by प्राचीन on 9 March, 2019 - 04:47

साधनेचे विविध मार्ग
त्रयी सांख्यं योग: पशुपतिमतं वैष्णवमिति ।
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमद: पथ्यमिति च ॥
रुचीनां वैचित्र्याद्रृजुकुटिलनानापथजुषां।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥ (श्री शिवमहिम्नस्तोत्र – ७)
अर्थ - वेद,सांख्य,योग,शैवमत, वैष्णवमत अशा वेगवेगळ्या पंथांत आपलाच मार्ग हितकर आहे, असे रुचिवैचित्रयामुळे म्हणणार्‍या, सरळ किंवा वक्र अशा नाना मार्गांनी जाणार्‍या सर्व लोकांचे अंतिम ध्येय ; जसे सर्व नद्यांचे अंतिम मीलन महासागरात होते, ; तसे तूच केवळ आहेस.

शब्दखुणा: 

चमत्कार-दृष्टिकोन

Submitted by र।हुल on 5 October, 2017 - 19:57

पहिल्यांदा मी चमत्काराची व्याख्या करतो.
'चमत्कार म्हणजे अशा गोष्टी ज्या बघणार्याच्या जाणिवेला, बुद्धीला; ज्ञात माहितीस्त्रोत वापरून, ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परीमाणं लावून बघितली असता अनाकलनीय असतात.'
[व्याख्या ढोबळमानाने केली आहे. चुकल्यास कर्रेक्ट करा. Happy ]

गुढप्रवासी

Submitted by र।हुल on 25 September, 2017 - 07:41

गुढप्रवासी

सुक्ष्म पातळीवर मला
तू उलगडत जात आहे
आभास सगळे मनांचे
आता गळून पडत आहे ॥१॥

गत जाणिवांना आता
मी विसरून जात आहे
नविन प्रवास नव्यानं
एक सुरू करतो आहे ॥२॥

तू दाखविल्या रस्त्याला
फक्त चालणे हातांत आहे
अवघड वळणावरी तुझा
मला एकची आधार आहे ॥३॥

अस्तित्व समजून घेण्या
आता उद्युक्त झालो आहे
तुझ्या गाभार्यात प्रवेश
हात धरूनी करतो आहे ॥४॥

―र।हुल/ २५.९.१७

[जाणिवा-दु:ख, वेदना]

शब्दखुणा: 

तुझे ब्रह्म आहे शोषित जनी

Submitted by र।हुल on 22 September, 2017 - 10:08

ठेऊनी पाय मुंडक्यावरी
दे फेकूनी सगळे जोखड
न रूळलेली वाट हाकारी
चालणे आहे एक अवघड ॥१॥

न उमगल्या रितींना काय
तू उगाची कवटाळून आहे
धरतात जन कुणाचे पाय
म्हणूनी धरणे व्यर्थ आहे ॥२॥

गंडवितात सिद्धी मार्गावरी
ज्ञानीजन पथ दाखवून गेले
दिसतील तुला जे चमत्कारी
चालताना ते ध्येयं विसरले ॥३॥

तुला मार्ग दाखविला ज्यांनी
बडेजाव ना कधी मिरवीला
तुझे ब्रह्म आहे शोषित जनी
समर्पण हवे फक्त कान्ह्याला ॥४॥

―₹!हुल/२२.९.१७

शब्दखुणा: 

जप, ध्यान आणि प्रवास.....

Submitted by योग on 11 April, 2012 - 09:30

जप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.

तप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. "सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने "ध्यान" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.
तर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.

Subscribe to RSS - साधना