मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65351
बारा साडेबाराच्या सुमारास जाग आली. आजचा दिवस मी ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. मुलींनाही उठवले. अंघोळी वगैरे सगळे आधीच आटपले असल्याने लगेच तयार होऊन बाहेर पडलो. आमच्या बाजूच्या खोलीत मुंबईकर अशोक उतरलेला. सकाळी आमच्यासोबतच तोही कॅम्पवरून इथे आला होता. फिरायला सोबत जाऊ म्हणाला होता, पण त्याच्या खोलीला कुलूप दिसल्यावर आम्ही निघालो.
बदलू या होळीचा ‘रंग’!
व्यथा एका चिमणीची
सकाळची वेळ. गच्चीत फेऱ्या मारून व्यायाम करून खुर्चीवर विश्रांती घेत बसलो होतो. तेवढ्यात गच्चीच्या भोवताली चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडला. त्यातील एक चिमणी माझ्या बाजूला येऊन बसली. मी एकटक तिच्याकडे पहात होतो. मला जाणवले की तिला काहीतरी मला सांगायचंय. माझ्याशी संवाद साधायचाय. मलाही जरा आश्चर्यच वाटले.
समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/64260
आम्ही पायवाटेवरून चालायला सुरुवात केल्यावर माझा पोर्टरही मागून यायला लागला.(त्याचे नाव विसरले.) बाकी कोणी पोर्टर घाटीत नव्हते, सगळे त्या मोठया दगडी गुहेत आराम करत होते. मी याला म्हटले की सोबत यायची तशी गरज नाही पण तो तरी आला मागून…
घाटी चढताना दिसलेले हिरवेगार गवती पठार प्रत्यक्षात कमरेएवढ्या उंच झाडांचे दाट जंगल आहे.
आपण काही वेळा उपयोगी पडतील म्हणून तर कधी लहानग्यांचा हट्ट म्हणून घरी एक नवा पाहुणा आणतो.अल्पावधीतच तो घरात इतका मिसळून जातो की घराचा अविभाज्य भाग बनतो.त्याच्या शिवाय घराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
त्याचे लाड एका बाळा सारखेच करतो आपण. आणि त्याच्या जाण्याने सैरभैर होतो आपण.अशा काही आठवणी येथे share करूयात.
फोटो टाकलेत तर दुधात साखरच
आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)
मुखपृष्ठ :
जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची योजना
५२ एच झी.....
वेळी अवेळी, तप्त दुपारी,
खोल रांगड्या महासागरी
तू खर्ज स्वरात गाणे गात विहरतोस.
बाहेरच्या जगाचे चटके बसले कि
मी देखील अंतर्मनात एक सूर मारते.
कितीक बोटी आल्या गेल्या
अन काही चुकार पाणबुड्या़
काहींनी प्रदूषण केले
काहींनी फेकली शिळी दया
माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही
माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही.
तू कोण?
एक मासा, एक जीव की एक अगम्य शक्ती?
मी कोण ?
एक स्त्री, एक शरीर की एक अव्यक्त व्यक्ती?
या वर्षातला पहिला स्नो पडला आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी कधी आपण पाहतोय ते खरंच घडतंय याच्यावर विश्वास बसत नाही. वर आकाशाकडे बघत आहे आणि छोटे छोटे कण एकदम अलगद जमिनीकडे येत आहेत. सुरुवातीचे काही मिनिट ते कण जमिनीवर पडताच विरघळून जातात आणि त्यांचं अस्तित्व राहातच नाही. पण हळूहळू सलग १-२ तास ते येत राहतात. त्यांना पावसासारखा आवाज नसतो की कधी जोरात येणाऱ्या गारांची तीव्रता. अगदी कापसाचे बारीक कण अलगद तरंगत जमिनीवर हळुवार टेकावेत असे ते शांतपणे साचत राहतात. आणि लवकरच एक पांढरा शुभ्र थर गवतावर किंवा रस्त्यावर दिसू लागतो.