मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65351
बारा साडेबाराच्या सुमारास जाग आली. आजचा दिवस मी ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. मुलींनाही उठवले. अंघोळी वगैरे सगळे आधीच आटपले असल्याने लगेच तयार होऊन बाहेर पडलो. आमच्या बाजूच्या खोलीत मुंबईकर अशोक उतरलेला. सकाळी आमच्यासोबतच तोही कॅम्पवरून इथे आला होता. फिरायला सोबत जाऊ म्हणाला होता, पण त्याच्या खोलीला कुलूप दिसल्यावर आम्ही निघालो.
अतिशय थकल्या भागल्या अवस्थेत मी गेटच्या आत पाऊल टाकले. आत मॅनेजरसाहेब पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे येरझाऱ्या घालत होते. त्यांचा अवतार पाहून मी महेशलाच रूमची काय व्यवस्था म्हणून विचारले. त्याने पहिल्या मजल्यावर तीन नंबरच्या रूममध्ये सामान ठेवा, मग बघू असे मोघम सांगितले. आम्ही तीन नंबरमध्ये गेलो तर तिथे आधीच सात आठ सॅकस पडलेल्या होत्या. म्हणजे इतके लोक ह्या खोलीत राहणार होते की काय? गेल्या वेळेस आम्हा तिघीना मिळून एक रूम होती.
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65129
नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता जाग आली, बेड टी टाळून हॉट रनिंग वॉटरवाल्याकडून पाणी मागवून आन्हिके आटपून नाश्त्याला गर्दी केली. रात्रभर पाऊस होताच, आताही भुरभुर सुरू होती. बॅगेत होते तितके कपडे अंगावर चढवले असूनही थंडी वाजत होतीच. आज घाटी बंद होती. काल स्वच्छ ऊन व आज पावसाची भुरभुर. इथल्या निसर्गाचा काही भरोसा नाही. आज आमची घाटी भेट असती तर काही खरे नव्हते. युथ हॉस्टेलची आमची शेवटची बॅच होती. त्यामुळे आज आमच्या बाजूने घाटीत जाणारे कोणी नव्हते.
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/64260
आम्ही पायवाटेवरून चालायला सुरुवात केल्यावर माझा पोर्टरही मागून यायला लागला.(त्याचे नाव विसरले.) बाकी कोणी पोर्टर घाटीत नव्हते, सगळे त्या मोठया दगडी गुहेत आराम करत होते. मी याला म्हटले की सोबत यायची तशी गरज नाही पण तो तरी आला मागून…
घाटी चढताना दिसलेले हिरवेगार गवती पठार प्रत्यक्षात कमरेएवढ्या उंच झाडांचे दाट जंगल आहे.
आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/64189
बसने आम्हाला गोविंदघाटाला नेऊन सोडले. हा रस्ताही आधीच्या रस्त्यासारखा डेंजर आहे.
वळणे घेत जाणारा रस्ता:
बाकी शिळा वगैरे नेहमीची दृश्ये:
आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/64171
रात्री झोप नीटशी लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून. चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.
आधीचा भाग :
https://www.maayboli.com/node/64161
दिल्ली सोडल्यानंतर गाडी जरी थांबत थांबत, इतर गाड्यांना
खो देत निघाली तरी हरिद्वारला मात्र वेळेत म्हणजे 1 वाजता पोचली. हरिद्वारला उतरल्यावर गर्मीने नको जीव झाला.
हरिद्वारला पोचताच हा सुविचार आपले स्वागत करतो.