घाटी

फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बेस कॅम्प परत एकदा

Submitted by साधना on 18 February, 2018 - 12:21

अतिशय थकल्या भागल्या अवस्थेत मी गेटच्या आत पाऊल टाकले. आत मॅनेजरसाहेब पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे येरझाऱ्या घालत होते. त्यांचा अवतार पाहून मी महेशलाच रूमची काय व्यवस्था म्हणून विचारले. त्याने पहिल्या मजल्यावर तीन नंबरच्या रूममध्ये सामान ठेवा, मग बघू असे मोघम सांगितले. आम्ही तीन नंबरमध्ये गेलो तर तिथे आधीच सात आठ सॅकस पडलेल्या होत्या. म्हणजे इतके लोक ह्या खोलीत राहणार होते की काय? गेल्या वेळेस आम्हा तिघीना मिळून एक रूम होती.

शब्दखुणा: 

फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - ऋषिकेशला परत..

Submitted by साधना on 13 February, 2018 - 09:42

मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65219

जोशीमठावरून बद्रीनाथला ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आता परत निघालो. अर्ध्या तासात दरडीच्या जागी पोहोचलो. गाडीतून उतरून समोर पाहिले तर रस्ता गायब.. तिथे दगडमातीचे डोंगर पसरलेले. माती उचलणारे जेसीबी होते, काम सुरू होत होते.

फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रीनाथ.

Submitted by साधना on 4 February, 2018 - 11:57

खेड्यामधले घर कौलारु

Submitted by मनीमोहोर on 18 April, 2014 - 13:05

नि. ग वर नाडण वर चर्चा झालीच आहे तर चला मी तुम्हाला आमच्या गावी/घरी घेऊन जाते. नाडण हे गाव आहे हापुससाठी प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यात. हे एक अगदि छोटसं गाव आहे, ज्याची वस्ती असेल दोन अडीच हजारापर्यंत. कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशन पासून ५० /६० कि. मी. दूर आहे. मुंबई गोवा हायवे तळेरे येथे सोडुन पाटगाव फणसगाव मार्गे ही जाता येतं. हे माझ्या सासरचे गाव आहे. दोन छोट्या टेकड्यांच्या मधे हे वसले आहे आणि मधुन जातो एक ओढा ज्याला आम्ही वहाळ म्हणतो. घरं सगळी थोडी उंचावर आहेत त्यामुळे पाय-याना ( कोकणच्या भाषेत पावठण्या) पर्याय नाही. चला, आता घर दाखवते.

Subscribe to RSS - घाटी