निष्ठा
शेवटी झाडांनीही ठरवलं
करावं स्थलांतर
दुष्काळात तडफडत मरण्यापेक्षा
अन झाडे निघाली
झाडे निघाली मुळाशी
घट्ट बिलगलेल्या मातीचा
विरोध डावलून
पण पण
नाहीच मिळाली
अशी एकाही जागा
जिथे रुजता येईल मातीशिवाय
आता झाडे एकनिष्ठ आहेत
मुळांशी आणि मातीशीही