निसर्ग
मंद प्रकाशी
मंद प्रकाशी
त्या चंद्र सावली डोहासाठी
व्याकूळ,वेडी,विरही धरती,
स्वैर सभोवती पोकळ नभी
शोधात फिरे एकाकी अंती !
मिलन म्हणू की विरहवेणा?
उगवता न् एक अस्ता जाती,
युगे युगे का प्रहर टिकवितो
अर्धशृंगारीक ती धूसर नाती?
निळ्या जळात सावळ अंबर
मिळून एकत्र अलिप्त राहती,
स्पर्श वाऱ्याचे ते झुळझुळते
अंतरे का मग स्वयें मोजती?
धुके धरता ओटीत बाळसे
झरते पान्हे कशात विरती?
ओलसर गोंडस रूप घेता
इंद्रधनू प्रकटण्या आतुरती !
आंबट-गोड आठवणिंच्या चिंचा
उरण येथे असलेल्या माझ्या माहेरच्या वाडीत ४-५ मोठ मोठी चिंचेची झाड होती. प्रत्येक चिंच वेगवेगळ्या गुणांनी भरलेली. साधारण तीन प्रकार असायचे. एक अतिशय आंबट एक एकदम गोड तर एक जात आंबट गोड. चिंचेची झाडे दिसायलाही हिरवी गर्द खाली भरपूर सावली देणारी.
भिगवण bird watching tour
1. Flamingos - रोहित
डोंगर संवाद
धामापूर गावाची उभारणी आणि परंपरा अशा अनेक गोष्टी माणसाने जरी पाहिले नसले तरीसुद्धा तलावाच्या कडेने दिवस - रात्र उभे असलेले हे तीन विशाल डोंगर मात्र या गावांची उभारणी व परंपरा यांचे साक्षीदार आहेत . ह्यावरच आधारित ह्या डोंगरांचा एक संवाद .
मी धामापूर तलाव बोलतोय ....
फुलपाखरांचे स्थलांतर : एक नयनरम्य सोहळा
सुमारे ऐंशी वर्षापूर्वी डॉ फ्रेड अर्कहार्ट या एका कॅनेडियन संशोधकाने मोनार्क या अतिशय सुंदर व नावाला अनुरूप, राजबिंड्या फुलपाखरांचा अभ्यास सुरु केला. कडाक्याच्या थंडीत ही फुलपाखरे कुठे जातात? हा लहानपणापासून त्याला पडलेला प्रश्न! कीटक विषयात डॉक्टरेट मिळवून त्यांनी व त्यांच्या पत्नी नोराह यांनी या फुलपाखरांच्या स्थलांतराचा शोध चालू ठेवला. फुलपाखरांच्या एकत्र येण्याबद्दल ब्रिटिश कीटक शास्त्रज्ञ सी.बी. विल्यम यांनी १९३० मध्ये एक पुस्तक लिहिले होते. पण मोनार्क फुलपाखरे कॅनडा व अमेरिकेतून थंडीच्या ऋतूत नक्की जातात कुठे? हे गूढ उकलले नव्हते.
अोढ.....कुठून येते ही?
इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना! ५ वर्षांचा असल्यापासून साध्या ड्रायसेलवर LED बल्ब लावण्यापासून सुरु झालेला प्रवास आता हाय एंड सेरीजच्या बिघडलेल्या म्युझिक सिस्टीम्स लीलया दुरुस्त करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
पालवी जीवन
पालवी जीवन
वेदना विरहाची जेव्हा
छळते शुष्क फांदिला,
शिशिर पानगळ होतसे
सोबत एकाकी वाटेला !
येणे जाणे फिरुन येणे
खेळ असे हा ठरलेला,
भास सारा उन सावली
देई उभारी जगण्याला !
नवचैतन्य तरु पालवी
जागवी मनात आशेला,
असेच खरे आशेवरती
जगणे शोभे चराचराला !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
सुपरमून आणि सूर्योदय
काल ( २१ जानेवारी २०१९) पौष पौर्णिमा होती आणि जानेवारी मधील ह्या पौर्णिमेला दिसलेला चंद्र हा नेहमी पेक्षा फार मोठा होता ह्याला सुपरमून असेही म्हणतात. ह्या सुपरमूनची आज सकाळी (२२ जानेवारी २०१९) ला पुण्यातून काढलेली हि प्रकाशचित्रे.
प्रचि १
प्रचि २