पालवी जीवन

Submitted by शिवाजी उमाजी on 29 January, 2019 - 07:43

पालवी जीवन

वेदना विरहाची जेव्हा
छळते शुष्क फांदिला,
शिशिर पानगळ होतसे
सोबत एकाकी वाटेला !

येणे जाणे फिरुन येणे
खेळ असे हा ठरलेला,
भास सारा उन सावली
देई उभारी जगण्याला !

नवचैतन्य तरु पालवी
जागवी मनात आशेला,
असेच खरे आशेवरती
जगणे शोभे चराचराला !

©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults