यावर्षी पावसाळा सुरु झाला त्यावेळी कट्ट्यावरील मित्रमैत्रिणींनी मागणी केली म्हणून लिहिलेली ही कविता आनंददादाच्या आग्रहास्तव आज येथे पोस्ट करत आहे.
माबोवर पहिल्यांदाच कविता या साहित्यप्रकारातलं लेखन टाकतेय. आशा आहे आपल्याला आवडेल.
_____________________________________________
अवचित जेव्हा धरा गातसे आतुरतेची गाणी
नकळत टपटप पडते कानी मेघांबराची वाणी
प्रेमळ ही धरणी कुशीत घेऊन थोपटते थेंबांना
सलज्ज कुमारिकेसम दिसे ती जलबिंदू निथळताना
वसुधेचे हे रूप न्याहाळता उल्हास पहा पशूंचा
अलवार गाते प्रसन्न गाणी ही खगभाटांची वाचा
मधूर कूजनाने खगांच्या, प्रसन्न धरती होते
आल्हादमय वार्याने मग तृणपाते डोलते
सरी कोसळतात शांतपणे, क्ष्मादेवी आनंदी होते
जणू बावर्या राधेच्या गाली खळी गोड उमटते
वृद्ध कणखर पर्वत मग बरसत्या मेघांना थांबवतो
मिठीत घेऊन लहानग्या थेंबबाळांना हा जोजवतो
वीज लकाकते कुठेतरी, वर्षेला मार्ग दाखवण्यासाठी
गर्व तिचा हा किती, कडाडते अस्तित्त्व दिसण्यासाठी
ही वात्सल्यमूर्ती वर्षा न्हाऊ घालते या धरतीला
नंतर कौतुकाने तिच्या कंठात घालते बिंदूमाला
लाजून ही सलज्ज धरित्री, पांघरते हिरवा शालू
शालूवरचे प्रत्येक पर्ण हे खुशीत लागले डोलू
लहान बालकांच्या हर्षोद्गाराने पृथ्वी खुदकन हसावी
बरोबर त्याचवेळी सुरेख इंद्रधनुची लकेर दिसावी
-जुई नाईक
९ जून २०१८
व्वा सुरेख लिहिलय खुप आवडली
व्वा सुरेख लिहिलय खुप आवडली कविता
खूप खूप धन्स पंडितजी!
खूप खूप धन्स पंडितजी!
वा छान
वा छान
धन्यवाद निलेशजी!
धन्यवाद निलेशजी!
सुरख जमलीए अगदी.
सुरेख जमलीए अगदी.
पडते तेव्हा मेघांबराची वाणी>>> पडते ऐवजी झरते हवय का? कारण वाणी झरते, पडत नाही.
धन्यवाद शालीजी!
धन्यवाद शालीजी!
'पडते' मलाही खटकलं.. थोडा बदल केलाय.. योग्य वाटतोय का?
कविता मनापासून वाचल्याबद्दल खूप आभार आपले!
छान बदल केलाय. मुखातून वाणी
छान बदल केलाय. मुखातून वाणी झरते पण कानी मात्र पडते.
धन्स!
धन्स!
जुया छान जमलीये कविता!
जुया छान जमलीये कविता!
धन्स मेघातै!
धन्स मेघातै!
कविता अगदी सुन्दर जम्लीये जुई
कविता अगदी सुन्दर जम्लीये जुई
क्ष्मादेवी आनंदी होते >> हे काय आहे ?
जुई क्ष्मा- धरती
जुई
क्ष्मा- धरती
किल्लीतै, आनंददा धन्स!
किल्लीतै, आनंददा धन्स!
क्ष्मा- धरती> बरोबर!