नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आलेय. मागच्या जन्मात आल्यासारखं वाटतंय अगदी. कसे आहात सगळे?
२०२० मध्ये खरडलेलं हे सापडलं, तर वाटलं माबोवर सादर करुया. अभिप्राय जरुर कळवा. आवडलं तर स्वतःची पाठ थोपटून घेईन आणि नाही आवडलं तर स्वतःला धपाटा मारण्याचं नाटक करेन. :इमोजी टाकणं विसरलेली बाहुली:
******************************
हिऱ्या
चाहूल
" बस्स झालं आता! मी अजून सहन नाही करु शकत! "
अंधारलेलं होतं आकाश एव्हाना,
अगदी त्याच्या ह्रदयासारखं नि
त्याच जुन्या विशाल उंबराखाली,
अजूनही तशीच तेवत होती ती,
नाजूक थरथरत्या पणतीसारखी ;
त्याच्या विशाल ह्रदयाचा ठाव घेत...
कित्येक पर्णं अशी गळून गेली
निसटत्या काळाची साक्ष देत ;
पण ती तशीच राहिलीय थांबून,
त्याच्या वाटेकडे नजर लावून,
कधीतरी परतेलच तो पुन्हा,
तिला एकदा ह्रदयाशी धरण्यास,
या भाबड्या निरागस आशेला
तिच्याच अश्रूंनी ताजंतवानं करत!
रिपरिप (मुक्तछंद)
तुझे बंद ढगाळ डोळे अन्
त्यांतून सरणारा पाऊस
आता ओळखीचा झालाय.
पण एक खरं सांगू का,
पावसाच्या अमाप सरींनंतर
तुझ्या ओठांवर पडणारं,
फिक्कट गुलाबी इंद्रधनु,
मला खरंतर जास्त आवडतं!
तुझ्या मनाच्या या आभाळाला
कुठला असा काठच नाहीये!
अपरिमित अथांग आहेस तू.
म्हणून कधीकधी अवघड जातं
तुझं मन पूर्ण समजून घेताना.
फेसाळत्या अथांग समुद्रालाही
कुठेतरी किनारा लागून असतो.
त्यामुळं तू सागराहून गूढ आहेस.
यावर्षी पावसाळा सुरु झाला त्यावेळी कट्ट्यावरील मित्रमैत्रिणींनी मागणी केली म्हणून लिहिलेली ही कविता आनंददादाच्या आग्रहास्तव आज येथे पोस्ट करत आहे.
माबोवर पहिल्यांदाच कविता या साहित्यप्रकारातलं लेखन टाकतेय. आशा आहे आपल्याला आवडेल.
_____________________________________________
याआधीचे भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १
संघर्ष भाग २
_____________________________
पूर्वभाग-
आम्ही तर आमच्या डोळ्यांवर त्याच्यावरच्या आम्ही ठेवलेल्या विश्वासाची आणि कृतज्ञतेची पट्टीच बांधली होती. या हतबलतेमुळेच तर या पट्टीच्या अलिकडे असलेला त्याच्या डोळ्यांतील मुळचा क्रूर आणि लोभी भाव आम्हाला दिसलाच नाही!
याआधीचा भाग येथे वाचा.
संघर्ष भाग १
पूर्वभाग -
किर्याकाका तर आमच्या जीवावर उठला होता. त्याचा मुद्देमाल न सापडल्याने तो धुमसत होताच. त्याने जागोजागी माणसं पेरून आम्हाला वाळीतच टाकलं होतं. मग घाईतच आमची मतं जाणून न घेता बापाचं ठरलं,
शेकडोंची पोशिंदी मुंबैमाता आपल्याला पदरात सामावून घेईल.
×××××××××××××××××××××××××××××××××××
आता पुढे-
×××××××××××××××××××××××××××××××××××