५२ एच झी

Submitted by अश्विनीमामी on 21 December, 2017 - 05:04

५२ एच झी.....

वेळी अवेळी, तप्त दुपारी,
खोल रांगड्या महासागरी
तू खर्ज स्वरात गाणे गात विहरतोस.

बाहेरच्या जगाचे चटके बसले कि
मी देखील अंतर्मनात एक सूर मारते.

कितीक बोटी आल्या गेल्या
अन काही चुकार पाणबुड्या़

काहींनी प्रदूषण केले
काहींनी फेकली शिळी दया

माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही
माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही.

तू कोण?
एक मासा, एक जीव की एक अगम्य शक्ती?
मी कोण ?
एक स्त्री, एक शरीर की एक अव्यक्त व्यक्ती?

जगण्याचे देणे देउन संपले कि उरलेल्या श्वासात,
आता मला फक्त माझे सूर हवेत.
अड कायचे नाहीए विषारी शैवालात
फसायचे नाहीये प्रवालांच्या रंगीबेरंगी फुलोर्‍यात.

विहरायचे आहे गाणे गात निळ्या आकाशाखाली निर्भर.
अन प्रशांत महासागराचे पाणी माझ्या आत बाहेर.

मत्स्य पालनाच्या धाग्यावर मी पण एक व्हेल पाळला आहे असा खोडकर प्रतिसाद द्यायचा होता पण मग मी त्या व्हेल बद्दल केलेले एक जुनी कविता आठवली. हा लोनली व्हेल इतर व्हेल ला ऐकू न जाणार्‍या फ्रिक्वेन्सीत गाणे गात फिरत असतो. कवीतेचे नाव म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आहे.

लोनलिएस्ट व्हेल बद्दल लेख वाचला त्यावरून सुचलेले काही. मूळ लेख इथे आहे.
http://www.bbc.com/earth/story/20150415-the-loneliest-whale-in-the-world

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users