५२ एच झी
Submitted by अश्विनीमामी on 21 December, 2017 - 05:04
५२ एच झी.....
वेळी अवेळी, तप्त दुपारी,
खोल रांगड्या महासागरी
तू खर्ज स्वरात गाणे गात विहरतोस.
बाहेरच्या जगाचे चटके बसले कि
मी देखील अंतर्मनात एक सूर मारते.
कितीक बोटी आल्या गेल्या
अन काही चुकार पाणबुड्या़
काहींनी प्रदूषण केले
काहींनी फेकली शिळी दया
माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही
माझ्या अंतरंगातले गाणे कोणाला समजलेच नाही.
तू कोण?
एक मासा, एक जीव की एक अगम्य शक्ती?
मी कोण ?
एक स्त्री, एक शरीर की एक अव्यक्त व्यक्ती?
विषय:
शब्दखुणा: