येत्या मे २०१८ मध्ये आई, बाबा व माझा नागपूरहून जम्मू, काश्मीर व कारगिल ला जाण्याचा बेत आहे. सोबत मावसभावाचे ४ जणांचे कुटुंब सुद्धा येण्याची शक्यता आहे (एकूण ७ व्यक्ती; २ ज्येष्ठ नागरिक, ३ प्रौढ, २ मुले ). आमची जम्मू, पटनीटोप, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर व कारगिल ला भेटी द्यायची इच्छा आहे, मात्र श्रीवैष्णोदेवी टाळायचे आहे. त्यामुळे जम्मू हून प्रवास सुरु करून श्रीनगर ला संपवण्याचा बेत आहे. मेकमायट्रीप वा तत्सम websites वर अचूक माहिती दिलेली नाही.
अनेक मायबोलीकरांचे जम्मू व काश्मीर प्रवास वर्णन वाचले आहे, त्यामुळे आपल्या सल्ल्यांची नितांत गरज आहे, जसे प्रवास कुठून सुरु करावा व कुठे संपवावा? एकूण किती दिवस लागतील? प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायला व intercity प्रवासासाठी taxi/cab आतापासून बुक करता येतील का? ईझीगो, मेकमांयट्रीप, वीणावर्ल्ड किंवा केसरी ह्यांच्याकडून हॉलिडे पॅकेज घ्यावे का? आणखी इतर माहिती सांगितल्यास बरे होईल.