साहित्य

बाबा

Submitted by पराग र. लोणकर on 24 July, 2020 - 07:58

बाबा

निद्रादेवीची आराधना
रोजच मी करत असतो
कारण झोपलो तरच पडतात स्वप्नं
आणि स्वप्नात आपण दोघे भेटतो...

तुम्ही घेऊनच गेलात माझी
रात्रीची झोप सारी
त्याची मला खंत नाही पण,
जागेपणी तुम्ही भेटत नाही...

विचारायचे असतात अनेक सल्ले,
मारायच्या असतात खूप गप्पा,
सांगा बरे कसा घालवू
आयुष्याचा हा टप्पा...?

इकडे तिकडे शोधू लागतो
मिळतो का तो आधार तुमचा,
निराशाच पदरी पडते
सारेच संपल्याची उरे भावना...

शब्दखुणा: 

प्रश्न!

Submitted by पराग र. लोणकर on 23 July, 2020 - 09:38

प्रश्न?

नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता मोबाईलचा अलार्म वाजला आणि मी उठलो. नेहमीप्रमाणे सकाळचा पाउण तासाचा walk आणि तासाभराचा व्यायाम पूर्ण करून आंघोळ-ब्रेकफास्ट करून माझ्या कामाला लागलो. माझी दैनंदिन व्यावसायिक कामं करायला आज मला पाच वाजेपर्यंतच वेळ होता. नंतर आवरून मला एका पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये जायचं होतं.

शब्दखुणा: 

जमाखर्च

Submitted by Asu on 22 July, 2020 - 05:15

जमाखर्च

नफा-तोटा नको मोजूया
नाही फायदा त्यात काही
सरणावर जातांना अंतिम
जमाखर्च हा शून्य होई

राग लोभ मद मोह मत्सर
सोडून द्यावे जगता सत्वर
असे जगावे आयुष्य खास
प्रेमाचा फक्त जिथे सहवास

सुखास कधी नसावा तोटा
दुःखात नसावा कुणास वाटा
आयुष्य असे असेल कोठे!
शोधण्या आयुष्य पडेल थिटे

लखलाभ कुणा जीवन असले
लाभाविना हे जगणे कसले ?
माणूस ना सद्गुणांचा पुतळा
दुर्गुणाविना ना माणूस कुठला

शब्दखुणा: 

माझेच काही चुकले असावे

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 21 July, 2020 - 15:43

चंद्रास तारे खुपले असावे
त्याने नभाला लुटले असावे

अंधार आला नशिबात जेव्हा
माझेच काही चुकले असावे

अर्ध्यात जाते पलटून बाजी
अंदाज सारे हुकले असावे

सोसून होतो भरपूर दुःखे
सोसून थोडे सुटले असावे

हासून गेलो भरताच डोळे
काही तळाशी रुतले असावे

देतो कसे मी भलते बहाणे
काही नवे ना सुचले असावे

मूर्तीत यंदा दिसते न आभा
वारीस कोणी मुकले असावे

गा रे निलू तू दमदार त्यांना
त्रासून जेही झुकले असावे

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- इंद्रवज्रा
( गागा लगागा ललगाल गागा )

इथे आसवांना कुठे भान होते

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 18 July, 2020 - 09:05

उरी पेटलेले जरी रान होते
कसे काय ओठी हसू छान होते

पुसावे कशाला उगा गाल कोणी
इथे आसवांना कुठे भान होते

कुणी लाजले का गळे कापतांना
कुणी फार कोणा दिले मान होते

लिहू लागलो मी जरी भावणारे
खरे सांगणारे रिते पान होते

कशी धार झाली कमी लेखणीची
कुठे शब्द माझे अता म्यान होते

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- भुजंगप्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)

सावरकर साहित्य : अग्रणी

Submitted by प्रगल्भ on 18 July, 2020 - 07:25

सावरकर साहित्य या नावाने एक धागा असावा असं मला गेल्या दोन-तीन दिवसांपासून फारच वाटत होतं. मी फार काही बोलणार नाहिये कारण या धाग्याच नाव ‘क्रांतिवीर सावरकर’, ‘स्वातंत्र्यवीर’, ‘क्रांतिकारकांचे शिरोमणी’ वा ‘सावरकर एक धगगगते यज्ञकुंड’ असं काहीही नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 

हे एक झाड आहे: रसग्रहण

Submitted by किमयागार on 16 July, 2020 - 07:38

कवयित्री शांता शेळके यांची 'हे एक झाड आहे' ही कविता म्हणजे शांताबाईंच्या प्रतिभा संपन्नतेची व अगाध कल्पनाशक्तीची अनुभूती घडवणारी विलक्षण कविता आहे. वरवर पाहता ही कविता झाड, माती, बीजाचे रुजणे, अंकुरणे, त्याची वाढ होऊन झाडात रूपांतर होणे याविषयी असावी असे वाटते. पण याच झाडाच्या मुळापर्यंत खोल खोल जाण्याचा प्रयत्न केला तर झाडाचे एक वेगळेच रूप उलगडत जाते जे कवितेच्या शेवटच्या अक्षरापर्यंत आपल्याला जखडून ठेवते आणि मग कविता संपल्यावर मिळते एक वेगळीच अनुभूती.

विषय: 

कवी अनिल

Submitted by प्रगल्भ on 16 July, 2020 - 01:26

कवी अनिल,
कवी अनिल मला फक्त एकच माहिती होते. ज्यांनी 'त्या कोवळ्या फुलांचा' ही कविता लिहीलीय. पुढे या कवितेचं गाणं देखील झाल जे श्रीधर फडकेंनी संगितबद्ध केलं आणि गायले देखील. पण,

विषय: 
शब्दखुणा: 

वस्त्र सुखदु:खाचे

Submitted by Asu on 13 July, 2020 - 01:27

वस्त्र सुखदु:खाचे

बिनकष्टाचा पैसा मिळता, कष्टाचे ना मोल कळे
घाम गाळुनी घास कमवा, धरतीवरती स्वर्ग मिळे
पैसा पैसा जमवून दिवसा, रात्री सुखाची भ्रांत पडे
गरीब बिचारा कष्टकरी तो, गोधडीवरही शांत पडे

सपक प्रेमाचे गोड बोलणे, भांडणाने होई खमंग
विरहा नंतर येता भरती, प्रेम होईल अति अभंग
कडू गोडाचे मिश्रण होता, मुखात विडा खूप रंगतो
आयुष्याचे तत्त्वज्ञान हे, ध्यानी घ्यावे तुम्हा सांगतो

रासायनिक चंगळवाद

Submitted by मंगेश विर्धे on 10 July, 2020 - 17:37

उपेक्षित भावनांसोबत उसाचे रिकामे पडतात

विचार साले कुरघोडी करून ढिगाऱ्याने सडतात

इर्षेचा अन वासनेचा रासायनिक चंगळवाद घेऊन,

झिजून सबंध जन्म लोक मृत्यूपंथी हमसून रडतात

- मंगेश विर्धे

Pages

Subscribe to RSS - साहित्य