साहित्य

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - श्रीगणेशस्तोत्र - चिमु

Submitted by चिमु on 26 August, 2020 - 01:09

नाव : कविता
मायबोली आय डी : चिमु
गट 'ब '

लेखणी :पायलट पेनstotrachimu.jpg

विषय: 

`सरप्राईज`

Submitted by पराग र. लोणकर on 24 August, 2020 - 01:33

`सरप्राईज`

सीमा, माझी पत्नी, तिच्या ऑफिसच्या एका dinner मिटींगला गेलेली होती. मी राजेशशी फोनवर बोलत होतो. राजेश माझा धाकटा भाऊ. अमेरिकेतल्याच एका मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालेला. तो म्हणत होता,

शब्दखुणा: 

सहजभाव

Submitted by गंधकुटी on 23 August, 2020 - 12:42

*सहजभाव*

झाडावरून हलकेच पडते
पान तरूतळी
मारता सूर मासोळी
उठती तरंग जळी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव वनमाळी

वसंतात झाडे बहरती
लेऊन पर्ण संभार कोवळा
शरद ऋतूत लगडते
चांदणे आभाळा
मजसी द्यावा ऐसा सहजभाव घननिळा

उगवता दिन मणी
बरसते प्रकाशाची झारी
निशी दिनी वसते
चैतन्याची दुनिया न्यारी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव श्रीहरी

नुरो चिंता नुरों खंत
सावरशिल तू ही आस उरी
विश्वास अभंग मनी
देवाने धरिला कर हा करी
मजसी द्यावा ऐसा सहजभाव मुरारी

।।विहीर तुडुंब।। (अलक कथा)

Submitted by mi manasi on 22 August, 2020 - 13:24

।।विहीर तुडुंब।।
(अलक कथा)

भुकेली, तहानेली
ती त्या अनोळखी गावांत आली.
जवळंच तिला एक जुनी विहीर दिसली.
पाणी पहाण्यासाठी ती आंत डोकावली.
आणि पडली ती तिथेच राहीली.
आता ती विहीर बाराही महिने...
तुडुंब भरलेली असते.
लोक म्हणतात "देव पावला!"

मी मानसी...

शब्दखुणा: 

।।मेलेलं कोंबडं।।। (भाग ५ - अंतिम)

Submitted by mi manasi on 22 August, 2020 - 12:40

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग ५-अंतिम)

जुई बिल्डिंगजवळ आली तर कंपाऊंडमध्ये ओला टॅक्सी उभी होती.

सवयीप्रमाणे तिकडे जराही लक्ष न देता जुई जिन्याकडे वळली तर तिला अगदी समोरून सुमाआजी येतांना दिसल्या. सोबत त्यांची मुलगी-अनघा होती. जुई समजली. म्हणजे सुमाआजी चालल्या…जुईचा गळा भरून आला. जुई जशी जमिनीत रुतूनच बसली. तिला एक पाऊलही टाकवेना. सुमाआजी अगदी पुढ्यात येऊन उभ्या राहिल्या तरी जुई जागीच खिळून होती. सुमाआजी आल्या आणि त्या जुईला जवळ घेणार इतक्यात अनघा रागाने म्हणाली..

येईल भान आता येणार जाग आहे

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 21 August, 2020 - 15:20

गेला वसंत माझी टाळून बाग आहे
होते तसे फुलांना केव्हा पराग आहे

घेतो उगा कुणी का आसूड जीवघेणे
पोटात पाखरांच्या पेटून आग आहे

ठेऊ जपून स्वप्ने थोडी तरी उराशी
येईल भान आता येणार जाग आहे

माझे मलाच मीही देतो कुशीत माझ्या
आधार माणसांचा झाला महाग आहे

घेतो टिपून डोळे थोडे हळूच तेव्हा
येता भरून डोळा अश्रू कजाग आहे

आले कधी कुणी ना माझ्याच वाटणीला
झाले असे घराचे माझ्या प्रभाग आहे

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- आनंदकंद
(गागालगा लगागा गागालगा लगागा)

।।मेलेलं कोंबडं।।।। (भाग ४)

Submitted by mi manasi on 21 August, 2020 - 01:28

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग ४)

दार लावून सुहास वळला. त्याने खांद्याला धरून जुईला कॉटवर बसवलं. आणि तिचे दोन्ही हात हातात घेत म्हटलं ...

"जुई डोळे बंद कर!"...जुई पुन्हा एकदा थरथरली...

"हं! आता उघड!"...

जुईने डोळे उघडले. सुहासने तिच्या हातावर पाचशेच्या बऱ्याचशा नोटा ठेवलेल्या होत्या...जुईने अंदाज बांधला... पंचवीस-तीस हजार असतील...

"हा माझा पहिला पगार जुई! हुं!.. पण आता कदाचित शेवटचाही ठरू शकतो”...सुहासने भावूक निवेदन करून पाहिलं...

आंदोलन

Submitted by वीरु on 20 August, 2020 - 17:34

पाचवी सहावीला असतांनाची गोष्ट. आमच्या शाळेचे संस्थापक थोर समाजसेवक कै.आण्णासाहेब बाळसे यांची जयंती दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहात साजरी व्हायची. सालाबादाप्रमाणे यावेळी देखील जयंतीची तयारी जोरात सुरु होती. पताका, तोरणं, रांगोळ्या यांनी शाळा सजवली होती. चित्रकलेचे सर शाळेबाहेरच्या फळ्यावर आण्णांची जीवनगाथा मन लावुन रेखाटत होते. कार्यक्रमाला स्वच्छ गणवेशातच येण्याबद्दल हेडसरांनी आठवणीने तर पी.टी.च्या सरांनी डोळे वटारुन सांगितले असल्याने त्यानुसार आमचीही तयारी सुरु होती.

विषय: 

।।मेलेलं कोंबडं।।। (भाग ३)

Submitted by mi manasi on 20 August, 2020 - 03:54

।।मेलेलं कोंबडं।।
भाग ३

आठ महिन्यापूर्वीचा तो दिवस तिच्या डोळ्यात उतरला...

त्या दिवशी निलेशने सुहासला स्वतः तिच्या मोबाईलवरून फोन करून चार वाजता घरी भेटायला बोलावलं होतं. पण सुहास सहा वाजले तरी आला नाही. तेव्हाच जुईच्या काळजाचा ठोका चुकला होता. वहिनी आधीच आरोहीला-त्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. कदाचित निलेशने तिला मुद्धामच पाठवलं होतं...

निलेशचा पारा चढलेला होता. गेली पाच वर्षं जुई सुहासला भेटत होती आणि त्याला मात्र ते आत्ता कळलं होतं... तेही लोकांकडून...

।।मेलेलं कोंबडं।।। (भाग-२)

Submitted by mi manasi on 19 August, 2020 - 05:44

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग २)

विचारसरशी जुई चालायला लागली होती. पण तितक्यात रस्ता क्रॉस करून सुहास तिच्यासमोर आला देखील. तिला थांबावंच लागलं...

"कशासाठी आलायस?" जुईने शक्य तितक्या कोरड्या स्वरात विचारलं...

"तुला भेटायला जुई! मी तुला भेटायला आलोय... कोण जाणे आता पुढे काय होईल? तुझं-माझं काही झालं तर सांगणारही कोणी नाही. नुसतीच वाट बघत बसू”… सुहास अगदी काकुळतीला येऊन समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

Pages

Subscribe to RSS - साहित्य