साहित्य

घन:श्याम आहे

Submitted by किमयागार on 11 August, 2020 - 03:52

मनापासुनी जर तुझे काम आहे
तुझ्याही नशीबात बघ दाम आहे.

नको दोष देऊस तू प्राक्तनाला
तुझेही कुठे कर्म निष्काम आहे?

उगवला कसा सोनचाफा सुगंधी?
खरेतर इथे पेरला घाम आहे

तुला का करू मी तिची जानकीशी
तसाही कुठे मी खरा राम आहे?

जरी पूर्ण केलीस तू चार धामे
घरी जा, तिथे पाचवा धाम आहे.

तुझे चालुदे कर्म धर्माप्रमाणे
तुझ्या सोबतीला घन:श्याम आहे.

---------© मयुरेश परांजपे(किमयागार)---------
११/०८/२०२०

`ती` लेखणी

Submitted by पराग र. लोणकर on 10 August, 2020 - 09:28

`ती` लेखणी

साडेअकरा-बाराची वेळ. रात्रीचा नुकताच डोळा लागला असेल नसेल आणि मोबाईलची रिंग वाजली. आमच्या क्षेत्रात वेळी-अवेळी, दिवस-रात्र न पाहता फोन येणे ही तशी नेहमीचीच गोष्ट. त्यामुळे त्याची सवय झालेली.

फोन उचलला. समोरून आवाज आला, ``पक्या सिरीयस आहे. तुला बोलवतोय. ताबडतोब सिटी हॉस्पिटलला ये.``

शब्दखुणा: 

चलेज्जाव!

Submitted by Asu on 9 August, 2020 - 10:38

आज ऑगस्ट क्रांती दिन-
९ ऑगस्ट १९४२ ला ऑगस्ट क्रांती दिनी इंग्रजांना ठणकावतांना परमपूज्य महात्मा गांधी असेच म्हणाले असतील…
('आयुष्य तरंग' या माझ्या काव्यसंग्रहातील कविता)

        चलेज्जाव!

चलेज्जाव आपुल्या देशी
रणशिंग आता फुंकले
अंगी जरी काटकुळा मी
कोटींचे बळ संचारले

भोई न आम्ही पालखीचे
मालक आम्ही इथले
परदेशी, कुठून आले
किडे मकोडे कुठले!

किडून, पिडून अवघा देश
पोखरून आम्हा लुटले
कडकडून घेतील चावा
मोहोळ आता उठले

शब्दखुणा: 

भासांंशी नाते जडले

Submitted by किमयागार on 9 August, 2020 - 05:13

मी मलाच शोधत फिरलो वनवास मलाही घडले
अस्तित्व टिकावे माझे इतकेच श्वास बघ उरले.

बगळ्याने गौरव केला आकाश ठेंगणे दिसले
गरुडाशी घेता पंगा मज रूप नभाचे कळले.

बहुतेक आज काटेरी शब्दांनी किमया केली
मुखवटे फेकुनी सारे हृदयात दुःख अवतरले.

मी काय तुला सांगावी वेदना उरी दडलेली
तू असा कसा मनकवडा?मन तुझ्याकडे अवघडले?

ती जादू कसली केली स्वप्नांनी माझ्यावरती?
आश्वस्त भावना झाल्या भासांशी नाते जडले.

---------© मयुरेश परांजपे(किमयागार)---------
०९/०८/२०२०

त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 8 August, 2020 - 12:38

त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
©®- महेश मोरे (स्वच्छंदी)

अन्यायाला शासन देतो दु:खितांस जो माया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
जो सूर्याला प्रकाश देतो अन् चंद्राला छाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

हवेत इथल्या आयुष्याचे श्वास पेरले ज्याने, जो मातीच्या कुशीत स्वप्ने पेरत फुलवत आला
जो मेंदूला ऊर्जा देतो भलेबुरे समजाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

शब्दखुणा: 

कोरोनातले रक्षाबंधन

Submitted by Asu on 5 August, 2020 - 07:13

कोरोनातले रक्षाबंधन

बंधू-भगिनी पवित्र बंधन
प्रेमे करितो तुजला वंदन
कोरोनाकृपे ना भेट आपली
विसरून जाऊ भीती दाटली

नाही बांधला समक्ष धागा
नाही मिठाई नाही औक्षण
अतूट अदृश्य प्रेमाचे बंधन
प्रेमच करील आपले रक्षण

विनंती करूया कोरोनाराया
ना पडो मानवा दुष्ट छाया
देऊ संदेश जगता सगळ्या
नका विसरू ममता माया

रक्षाबंधन अजब आपुले
कोरोनारुपी अंधारातले
निशा जावो दिशा उजळो
येवो दिवस प्रकाशातले

अवतार घ्यावा रामराया

Submitted by Asu on 5 August, 2020 - 07:04

श्रीराम जन्मभूमी भूमिपूजनानिमित्त-

अवतार घ्यावा रामराया

क्रूर कोरोनासूरा वधाया
अवतार घ्यावा रामराया
नाही त्राण अंगी रघुराया
जगणे झाले नित्य लढाया

सर्व मिळून करू लढाई
बळ आम्हास दे रघुराई
विनंती असे तुमच्यापायी
सर्व मानवा यश तू देई

मातला कोरोना जनीवनी
गांभीर्य ना समजे कुणी
अज्ञ मानवा बुद्धी द्यावी
जमाव करती गावोगावी

पसरव जगती सुखछाया
कौसल्यसुता पडतो पाया
कोरोनासूर नष्ट कराया
अवतार घ्यावा रामराया

मेसेज

Submitted by namra on 4 August, 2020 - 06:53

आज ऑफीस मधे आल्यापासुन दिपाली कामात होती.
शनिवारच्या मीटीन्ग चि पिपिटी आज फायनल करायचि होती. लन्च् वेळेपर्यन्त तिन पुर्न करुन मेल पण करुन टाकला.
हुशश, करत तीन खुर्चि वर मान टेकलि. अरे, सकाळ पासुन आपण फोन पन चेक ना हि केला. तिन फोन चेक केला.
अविनाश चा मिस्स् काल आला होता.
तिला कंटाळा आला होता. पण फेसबुक बन्द करुन तिने अविनाश ला कॉल लावला.
"दिपाली कधी पासुन तुला कॉल करतो आहे" अविनाश मोठ्याने ओरडला.

शब्दखुणा: 

आठवण येईल बहुदा न्याय मागत!

Submitted by Prashant Pore on 3 August, 2020 - 05:43

कोण जाणे? कोण कुठली? काय मागत?
आठवण येईल बहुदा न्याय मागत!

बोळवण केली पिठाचे दूध पाजुन
आर्जवे करतेय जनता साय मागत

शेत विकले; चैन केली, माज केला!
शेवटी दिसला बिचारा हाय "मागत"

बाप असतो बाप; मर्यादाच त्याला!
लेकरू रडणार अंती माय मागत!

जीवनाशी झुंजला घेऊन कुबड्या
तो कधी दिसलाच नाही पाय मागत!

प्रशांत पोरे

Pages

Subscribe to RSS - साहित्य