रासायनिक चंगळवाद
उपेक्षित भावनांसोबत उसाचे रिकामे पडतात
विचार साले कुरघोडी करून ढिगाऱ्याने सडतात
इर्षेचा अन वासनेचा रासायनिक चंगळवाद घेऊन,
झिजून सबंध जन्म लोक मृत्यूपंथी हमसून रडतात
- मंगेश विर्धे
उपेक्षित भावनांसोबत उसाचे रिकामे पडतात
विचार साले कुरघोडी करून ढिगाऱ्याने सडतात
इर्षेचा अन वासनेचा रासायनिक चंगळवाद घेऊन,
झिजून सबंध जन्म लोक मृत्यूपंथी हमसून रडतात
- मंगेश विर्धे
चुकते कोण?
नियम पाळून थकले सारे
अंगी आली बेफिकिरी
आयुष्यावर सोडून पाणी
नंगे होऊन करी फकिरी
कधी लॉक कधी अनलॉक
बातम्यांचा टीव्ही वर शॉक
गोंधळ माजला सर्व देशात
सीमेवर चीनपाक्यांचा धाक
जगण्या ना कुणा शाश्वती
मरणाची पण पक्की भीती
जग उद्याचे पाहिले कुणी
वर्तमानात जगू हीच नीती
मरायचे जर कधी एकदा
मस्त खाऊन पिऊन मरू
मरण भीती अजून कीती
मरणाला ना आम्ही घाबरू
जगी सर्वत्र जर हीच रीत
कोण कुणा किती सावरे?
संयमबंध फुटता जगभर
बेफिकीरी मन कशी आवरे!
"ग्रेस"
मी मुळात मायबोलीवर आलो ते वैभव जोशीचा इंटरव्ह्यु बघून! स्पृहा जोशीच्या 'खजिना' मध्ये तो भरभरून बोलला 'मायबोली' बद्द्ल.
दुसर्याच दिवशी मायबोली जॉइन केलं. त्याने त्या दीड पावणेदोन तासांच्या गप्पांमध्ये कविता, गझल, बकीचे कवी जसं की बालकवी, ग्रेस इ. याबद्द्ल जे काही बोललयं त्याला तोड नाही. खाली खाली त्याची लिंक देतोय. ज्यांंना बघावं वाटेल त्यांनी बघावं!!
कुडीचे ऐनवेळी चांदणे होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)
तुझ्या दारात जेव्हा थांबणे होते
बिचारे मन पुन्हा वेडेपिसे होते
तुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्
जगाला वाटते की बोलणे होते
बदलली वाट नाही आजसुद्धा मी
दिशेवर प्रेम माझे आंधळे होते
कुठे हे राहते ताब्यात माझ्या मन ?
तुझ्यापासून जेव्हा वेगळे होते
तुझ्या हातात माझा हात असला की
कळत नाही किती हे चालणे होते
हृदय माझे तसे माझेच आहे पण
तुझ्या नजरेस पडले की तुझे होते
सध्या रिमझिम पाऊस पडत असता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कविवर्य पी.सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील) यांच्या 'रिमझिम पाऊस पडे' या कवितेचे मी केलेले विडंबन, त्यांची क्षमा मागून-
लाखलाखांनी वाढे
लाखलाखांनी वाढे सारखा
मृत्युलाही अति जोर चढे
कोरोनाकोरोना चहूकडे
गेला मोहन कुणीकडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
तरुण बाधित, बाधित सगळी
मुलेबाळेही बाधित झाली
रुग्णवाहिका येता गल्ली
दचकून माझा उर उडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
.
बंद केले पापणीला साचलो मी
आग झाली आसवांची भाजलो मी
वेदनांचा कैफ आता काय सांगू
भान जाण्या वेदनाही प्यायलो मी
दूर जा तू फार माझ्या सावलीच्या
ना तसाही फार कोणा लाभलो मी
रात्र नेली तारकांनी चोर वाटे
नेमका रात्रीच त्याही जागलो मी
खूळ होते आंधळे डोक्यात काही
काय होतो रे जगाशी भांडलो मी
अर्थ का केव्हा कधी शब्दास होता
जो फुकाचा खूप तेव्हा गाजलो मी
टाळले होते कुणी का आरशाला
तेवढा होतो मलाही लाजलो मी
राहिलो ना मी जुना हा बोल त्यांचा
वेगळा होतो कधी का वागलो मी
.......घाबरून मी अर्धवट फुटलेली कवटी उचलून प्रथम वार्ड रोबच्या खणात टाकली. तिचा भुसा कसातरी गोळा करून वार्डरोबच्या बाजूच्या खणात फेकला. दरवाज्या उघडला दारात ताई उभ्या . मी पटकन टाईम पाहिला साडेदहा होत होते. आत येत ताई म्हणाल्या , " टाईम बघू नका. दीपा आत्ताच झोपायला गेल्ये." ताई आता साडीमध्ये होत्या. त्या आत शिरल्या. एकूणच सर्व वातावरण पाहून म्हणाल्या, " काय शोधाशोध चालल्ये . तुम्हा पीएचडी वाल्यांची नजर सारखी काही ना काही तरी शोधत असते. " असं म्हणून त्यांनी दरवाज्या लावला. माझी छाती धडकली. आता ही बाई काय करते असा भाव माझ्या तोंडावर असावा .
वारकरी संप्रदायाचे महत्त्व
वारी आणि वारकरी-
वारी म्हणजे आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून पंढरपूरला केलेली सामुदायिक पदयात्रा. विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती वारी, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. एकादशीला किंवा इतर पवित्र दिवशी जो नियमित वारी करतो, त्याला ‘वारकरी’ किंवा ‘माळकरी’ म्हणतात. आणि वारकरी जो धर्म पाळतात त्याला ‘वारकरी धर्म’ किंवा ‘भागवत धर्म’ म्हणतात.
वारकऱ्यांची लक्षणे-