साहित्य

माझ्याच आहे घरी वेदना

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 21 June, 2020 - 00:15

त्रासून सोडे जरी वेदना
माळून मी का तरी वेदना

दैवास आली अशी माणसे
वाटून जावी बरी वेदना

टोचून का मी कधी बोललो
बोलून जाते खरी वेदना

दुःखास काही असा गायलो
लाजून गेली उरी वेदना

जाऊन मीही कुठे जायचे
माझ्याच आहे घरी वेदना

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- तारामती
(गागाल गागाल गागाल गा)

सूर्यग्रहण

Submitted by Asu on 20 June, 2020 - 23:22

सूर्यग्रहण

सूर्य पिता माता वसुधा
कुटुंबाची एका मंडळी
बालचंद्रा धरून हाती
खेळ खेळती नभांगणी

एकमेकांच्या भेटीसाठी
युगानुयुगे करती भ्रमण
अवसेला कधी अचानक
भेट होता घडे सूर्यग्रहण

बापलेकाचा भेट सोहळा
माय पहाते डोळे भरून
नयन भरता प्रेमजलाने
सूर्य दिसेना पृथ्वीवरून

वर्णिले इथे ना सत्य कधी
दृष्टीचा असतो नित्य भास
जगणे मरणे जसे आपुले
जगी आंधळ्यांचा प्रवास

वर्षानुवर्ष वाऱ्यावर फिरती
नशिबाच्या या उगा कल्पना
भविष्य असे अपुल्या हाती
ग्रहताऱ्यांच्या नको वल्गना

शब्दखुणा: 

©संततधार! - भाग १०

Submitted by अज्ञातवासी on 20 June, 2020 - 00:07

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग ९- https://www.maayboli.com/node/75131

पुढील भाग मंगळवार दिनांक २३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

बंद कळ्यांचे फूल होण्या…

Submitted by Asu on 19 June, 2020 - 00:55

बंद कळ्यांचे फूल होण्या…

बंद कळ्यांचे फूल होण्या
पोषक स्थिती निर्माण करा
त्यांचे त्यांना स्वतः फुलू द्या
फुलता पाहणे आनंद खरा

अनेक फुले बागेत फुलती
नाजूक सुंदर कुणी छोटेसे
गेंदेदार कुणी एक एकटे
कुणी टपोरे दिसे मोठेसे

रंग वेगळे, गंध वेगळे
निसर्गात वैविध्य किती
लोभस सुंदर परि सगळे
अजब असे ही निर्मिती

कुठे फुलावे, कसे फुलावे
त्यांचे त्यांनाच ठरवू द्या
असंख्य बागा जगी असती
त्यांचे त्यांना उमलू द्या

तुले जानं पळीन

Submitted by Asu on 18 June, 2020 - 03:26

तुले जानं पळीन

आती झालं हासू आलं
कोरोनाचं तं भयच गेलं
आता तुले कोन घाबरीन!
लस सोध्याले तुलेच वापरीन

मरन तं कव्हा बी यीन
आता तुले मी पाही घीन
वाघोबा म्हनलं तरी मारशीन
वाघ्या म्हनलं तं काय करशीन?

लय सोसले चोसले तुह्ये
आता पाहाय धपके माह्ये
मांजर कुढलोंग चूप राहीन
येळ आल्यावर आंगावर यीन

औसद काहाळू लस सोदू
नको तु आवढा गैऱ्हा मातू
नियम पायीन, फिरनं सोळीन
एक दिस तुले जानं भाग पळीन

शब्दखुणा: 

©संततधार - भाग ९ -पार्टी!

Submitted by अज्ञातवासी on 17 June, 2020 - 05:22

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग - ८
https://www.maayboli.com/node/75098

पुढील भाग शनिवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

हरएक श्वासात भिनतेस तू

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 15 June, 2020 - 02:13

हरएक श्वासात भिनतेस तू
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
8554085101

ठरवून देतो शहारा शरीरास त्या गूढ स्पर्शात असतेस तू
भरतेस अस्सल सुखांनीच आयुष्य अन् धुंद बरसात करतेस तू

हळुवार स्पर्शून जाते किनाऱ्यास ती लाट पाण्यातली तू सखे
पाण्यास असते तुझी काळजी आणि अपुल्याच खेळात रमतेस तू

तो चंद्र फिरतो जसा भोवताली नि धरणी जशी त्यास दुर्लक्षिते
मी घालतो नित्य घिरट्या तशा आणि अपुल्याच नादात फिरतेस तू

शब्दखुणा: 

©संततधार! - भाग ८

Submitted by अज्ञातवासी on 14 June, 2020 - 08:10

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

पुढील भाग बुधवार दि. १७ जून २०२० रोजी रात्री नऊ वाजता प्रकाशित होईल.

भाग ७ - https://www.maayboli.com/node/75055

Pages

Subscribe to RSS - साहित्य