©संततधार! - भाग ८

Submitted by अज्ञातवासी on 14 June, 2020 - 08:10

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

पुढील भाग बुधवार दि. १७ जून २०२० रोजी रात्री नऊ वाजता प्रकाशित होईल.

भाग ७ - https://www.maayboli.com/node/75055

मनू दिवसभर काम करत होता. त्याला जेवणाचीही शुद्ध नव्हती.
अक्षरश: आजच सगळं काम संपवायचय, अशा हिशेबाने तो काम करतोय, असंच सगळ्यांना वाटत होतं. जे डिपार्टमेंट हेड्स दोन दोन दिवस मनूला भेटत नसत, ते दर अर्धा एक तासाने केबिनमध्ये बोलावले जात होते.
दुपारी चार वाजता स्नेहल मनूच्या केबिनमध्ये गेली.
"मनू, कॅन आय लिव अर्ली टुडे? निड टू प्रिपेर अँड गेट प्रिपेर्ड." तिने विचारले.
"येस. ऑल द बेस्ट." त्याने मान वर करूनही तिच्याकडे बघितलं नाही, इतका तो कामात होता.
"ओके, बाय." ती जरा नाराजच झाली.
पाच वाजता मनूने काम संपवलं आणि मस्त आळस दिला. त्यानंतर तो उठून कॉफी मशीनजवळ गेला. त्याने त्याची आवडती कॉफी मगमध्ये घेतली, आणि एक घोट घेऊन म्हणाला.
"लिसन एवरीबडी. इनफ फॉर टुडे. यु ऑल मे लिव नाऊ. मात्र पुढच्या पंधरा मिनिटात मला कुणी ऑफिसमध्ये दिसलंच, तर त्याला विदाऊट पे आठवडाभर एक्स्ट्रा दोन तास काम करावं लागेल."
तो पुन्हा शांतपणे कॉफी घेऊ लागला. सगळ्यांची धावपळ त्याला स्पष्ट जाणवत होती.
दहा मिनिटात संपूर्ण ऑफिस रिकाम होतं.
मनूने लॅपटॉप बंद केला, व तोही खाली आला. त्याने गाडी सरळ बंगल्याकडे घेतली.
◆◆◆◆
सकाळी पर्वणीने शांतारामबरोबर कागद पाठवून दिला.
ती अस्वस्थ होती. आज मात्र ती कोलमडून पडल्यासारखी झाली होती.
दुपारी ती बाहेर पार्किंगजवळ आली. बाजूलाच शांताराम उभा होता.
"शांताराम, चावी द्या गाडीची."
"पण मॅडम..."
"मी जे म्हणतेय, ते करा. आणा चावी इकडे." पर्वणीने जवळजवळ चावी हिसकावूनच घेतली.
सुसाट वेगाने गाडी चालवत ती त्याच्या डोळ्यासमोरून कधी गेली तिचं तिलाच कळलं नाही.
ती त्या वस्तीत पोहोचली. गाडी बाजूला लावतानासुद्धा अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
ती झरझर हेमलच्या खोलीत गेली.
"आलीस... मला वाटलं तुझ्या नवऱ्याला कळलं की काय यावेळी." तो खिन्न हसून म्हणाला.
"गोळ्या घेतल्या दुपारच्या?" तिने पर्स बाजूला ठेवली, व ती आवरू लागली.
"पर्वणी ऐकशील माझं."
हेमलचा आवाज आज पहिल्यांदा तिला आश्वासक वाटला.
"माझ्या जवळ बस. मी काहीही करणार नाही. बस."
ती हळूच त्याच्या जवळ गेली.
त्याने तिचा हात हातात घेतला.
"एवढं नको करु माझ्यासाठी, कधीही नको करुस. तू खूप सुंदर आहेस आता स्वतःसाठी जग. माझं आयुष्य हळूहळू संपतय, पण त्याबरोबर तुझं आयुष्य संपवून घेऊ नकोस."
पर्वणीच्या डोळ्यात पाणी आलं.
"तू कुठेही जाणार नाहीस."
"जावं लागेल... पण थँक्स. आयुष्यात थोडा तरी ओलावा आला तुझ्यामुळे."
हेमलचं हे बदलतं रूप तिला गतकाळाची आठवण करून देऊ लागलं.
तिने प्रेम केलेला एक मनस्वी चित्रकार…
"आयुष्यात मला हवं ते कधीच मिळालं नाही. पण सर्वात जास्त मला तू हवी होतीस. तू निघून गेलीस आणि मी तुटलो पर्वणी."
त्याचा हात अजून घट्ट झाला.
पर्वणी त्याच्याकडे बघत होती.
अनेक क्षण शांततेत गेले. पर्वणीच्या मनावर काल रात्रीचा प्रसंग झरझर येऊन गेला.
तुला हवं ते कर म्हणणारा मनू तिला आठवला. तिच्याकडून तिची कंपनी हिरावून घेणारा मनू तिला आठवला.
'त्याला फक्त कंपनी हविये, मी नकोय, तर मी त्याचा विचार का करावा?
ज्याला मी हविये, त्याला का देऊन टाकू नये?'
असह्य शांततेत बाणासारखे पर्वणीचे शब्द घुमले...
"तुला जे हवं ते मिळेल..."
पर्वणी थंडपणे म्हणाली.
"आज मी तुला जशी हविये, तशी मिळेल. बोल मी तुला कशी हविये?"
हेमलचे डोळे लकाकले, तो तिच्या जवळ सरकला.
तो जसजसा जवळ आला, तसतशी तिची छाती फडफडू लागली. तिने गच्च डोळे मिटून घेतले.
एका अथांग सागरात उडी मारावी, अशी तिची अवस्था झाली. मिटलेल्या डोळ्यासमोर अंधारी होती.
...आणि अचानक आतून आवाज आला...
'सगळं ठीक होईल... डोन्ट वरी... तू माझी पर्वणी आहेस कळलं?'
...मात्र आवाज मनूचा होता.
त्याक्षणी तिने हेमलचा गालापर्यंत पोहोचलेला हात जोरात झिडकारला.
"नीच, नीच आहेस तू. जा निघ इथून..." तो वेदनेने कळवळला.
"सॉरी... मी नाही करू शकत." ती तुटली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. व ती आवरू लागली.
"सॉरी परु, उद्या नक्की ये. आपण पुन्हा ट्राय करू. तिच्याकडे बघत तो म्हणाला." तो गडबडून म्हणाला.
ती सरळ बाहेर निघाली. आजही अनेक नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या होत्या.
तिने गाडी सुसाट बॉलेवॉर्डच्या दिशेने घेतली.
◆◆◆◆
बंगल्याजवळ गाडीचा आवाज ऐकून अनुराधा धावत आली.
मनूला बघून तिला आश्चर्य वाटले.
"मॅडम नाही आल्या अजून?" त्याने विचारले.
"नाही साहेब."
"ओके."
ती घाईघाईने आत गेली.
तो शांतपणे आत आला, व त्याच्या वरच्या बेडरूममध्ये गेला. त्याने ऑफिसचे कपडे उतरवले, व तो अंघोळीला गेला.
गार पाण्याने त्याचा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला.
त्याने कपडे बदलले आणि स्नेहलला फोन लावला.
"स्नेहल, मॅप पाठवशील प्लिज? आय नो तू पुण्यात वर्ल्ड फेमस आहेस, पण तरीही..."
"अरे सॉरी."
"इट्स ओके ग. पाठव लवकर. मी निघतोय आता."
त्याने फोन ठेवला. तो खाली आला आणि त्याने अनुराधाला आवाज दिला.
"मॅडमला सांग, मी आज रात्री बाहेरच जेवेन."
"पण त्यांनीच तुम्हाला निरोप दिलाय, की त्या आज बाहेरच जेवतील म्हणून."
मनू चमकला.
"ठीक," म्हणून तो बाहेर पडला.
त्याने मॅप लावला, तो गाडीत बसला आणि विषण्ण मनस्थितीत त्याने गाडी स्नेहलकडे घेतली.
◆◆◆◆
"हाय पर्वणी, लुकिंग नाईस." नीला तिच्याकडे बघत म्हणाली.
"थँक्स नीला."
"किती दिवसांनी आपण भेटतोय, तेही अचानक."
"येस. अग वेळच मिळत नव्हता."
"कळतंय मला, थिंकलॅबची MD बिजी असणारच."
"अं, हो. पण आता मनू MD आहे."
"का? आय मीन सॉरी, पण हे कधी झालं."
"आज सकाळी."
"ओके." नीला आश्चर्यचकित झाली.
"नीला, डे बाय डे, आम्ही दुरावत चाललोय. दिवसेंदिवस असं वाटतंय, की वी आर नॉट मेड फॉर इच अदर."
"पर्वणी काहीही काय बोलतेय? मनू आणि तूला आम्ही एक आयडियल कपल मानतो. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल."
"नाही नीला, यात जास्तीत जास्त चूक माझी आहे. पण, आता असं वाटतंय, की मी कायम चुकत आलेय, माणसे ओळ्खताना."
"पर्वणी... काय झालंय सांगशील?"
"जस्ट एक सांगते... आय एम ब्रोकन नाऊ. आणि म्हणून मला डीव्होर्स हवाय."
"पर्वणी प्लिज."
"किती लवकर होऊ शकेल ही प्रोसेस."
"पर्वणी तू थोडा..."
"लवकरात लवकर तू ही प्रोसेस करू शकत असशील तर सांग. लगेच पेपर्स तयार कर. तू करू शकत नसशील, तर डोन्ट वरी. आय विल फाईंड अदर लॉयर."
"मी करते उद्यापर्यंत पेपर रेडी." नीला मान खाली घालून म्हणाली.
"थँक्स नीला. बादवे मी रेड वाईन घेतेय, तुझ्यासाठी?"
"आय एम फाईन..." थँक्स.
पर्वणीने वाईनची ऑर्डर दिली, व काहीच न घडल्यासारखं ती नीलाशी गप्पा मारू लागली.
◆◆◆◆
त्या टुमदार रो हाउसेसच्या रांगांमध्ये स्नेहलचं एक रो हाऊस होतं. त्याच्याच बाजूला पार्किंग होती.
पाहुण्यांसाठी असलेल्या पार्किंगमध्ये त्याने गाडी लावली, व तो स्नेहलच्या घराकडे निघाला.
एक बारीक लोखंडी गेटवर स्नेहलचं नाव लिहिलेलं होतं. तिथून पुढे छोटीशीच बाग केलेली होती. ते बघूनच छान वाटत होती. बाहेरच्या भिंती स्नेहलच्या कलात्मकतेची साक्ष देत होत्या.
मनू बघत बघत दारापर्यंत पोहोचला. त्याने बेल वाजवली.
स्नेहलने दरवाजा उघडला...
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Every story of yours is simply astoundingly well-written, characters are not flimsy and each twist is really brilliant! I am a fan of your writing. I am also eagerly awaiting the trilogy that you have mentioned may not be real - that it was only a teaser that you had posted. If this is true, I would be heartbroken as I love subjects like Naag, Naagin, Vishkanya - etc. They may be only a fantasy but it is something I like to read about. Please do consider writing the trilogy. My best wishes for your future projects, always! Sorry to be writing in English but this would have taken too much time to write in Marathi. Next prayaas will be surely in Marathi.

@मन्याS - धन्यवाद Happy
@रुपाली - धन्यवाद Happy
@अजय - धन्यवाद Happy
@स्नेहलता - धन्यवाद Happy
@peacelily2025 - इतक्या सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद. खरंच मला इतक्या स्तुतीची सवय नाहीये, त्यामुळे काय बोलावं नाही कळत. Just I am feeling little shy now Lol
खरं सांगायला गेलं, तर नागराज ही कथा मी फक्त १५ मिनिटात टाईमपास म्हणून लिहिली होती, आणि खाली टिजिंग साठी त्या काल्पनिक पुस्तकांची नावे टाकली होती. It was just for fun, or just to do something different. But I never expected such kind of response from anyone. In fact, जे मला पर्सनली ओळखतात (असे खूप कमी जण आहेत, पण आहेत) ते तर मागेच लागलेत, आता बुक्स लिहिच म्हणून.
तरीही पुस्तकाविषयी एवढंच सांगेन, just wait, but don't expect.
हो मात्र, त्याच धर्तीवर एक आगामी आकर्षण आहे. Just wait for it.
Thank you so much again.... I am feeling really lucky to blessed with such readers.
@आबासाहेब - धन्यवाद Happy

हो मात्र, त्याच धर्तीवर एक आगामी आकर्षण आहे. Just wait for it.>>>
अरे वा !! म्हणजे पुढे काहीतरी आम्हारा भन्नाट वाचायला मिळेत तर..
आम्ही वाट पाहू.. लिह आरामात..

माझ्या अंदाजाप्रमाणे कथा मध्यंतरापर्यंत आली आहे. आता या कथेचा सुखांत का दुःखांत हे सर्वस्वी कथालेखकाच्या हातात आहे.

कृपया पुढील भाग पुढील आठवड्यात कधीही प्रकाशित होईल असे लिहून जीव टांगणीला लावू नये. Biggrin

रच्याकने कथा छान चालू आहे, कथावेग तोडू नये.

Parvani ne divorce nhi tar game palti keli pahije.Manu is searching an finalising option ani parvani la chuk kartana manucha avaj yetoy that real Love.Pan Parvani betray jhali tar khup vait vatel purn story madhe guntle atta. Expecting jaadu but not by releasing manu.Pyar kiya to dono saman bugtenge.

पाफा+१०१, Wink
अज्ञा, तु नागराज सारख्या अनेक कथा अगदी सहज लिहु शकतोस. हे माहितीये.. पण मार्को, उंबरठा आणि संततधार यांसारख्या तुझ्या कंफर्ट झोन बाहेरच्या कथा तुझ्या लेखणीतुन लिहल्या जाव्यात.. अस मला मनापासुन वाटतं.. Happy

आता या कथेचा सुखांत का दुःखांत हे सर्वस्वी कथालेखकाच्या हातात आहे. >> काहीही असेल पण तर्कसुसंगत असेल आणि वास्तवाच्या जवळ जाणारा असेल यात शंकाच नाही..

@अजय - लवकरच येईल. धन्यवाद.
@पाफा - सॉरी Lol लवकरच टाकेन..धन्यवाद.
@nisha - नका हो मनूचा इतका द्वेष करू Lol जस्ट जोकिंग. धन्यवाद Happy
@मन्या - थँक्स. बघुयात Happy
@नौटंकी - खूप खूप धन्यवाद, इतका विश्वास दाखवल्याबद्दल
@प्रीतम - लवकरच येईल. धन्यवाद Happy

खरं सांगायला गेलं, तर या भागाकडून थोडी निराशाच झाली.
म्हणजे हाती काही लागलं असेल, तर ते पर्वणीचा फारकतीचा निर्णय एवढंच.
मला मनू आणि स्नेहलच्या भेटीची प्रचंड उत्सुकता आहे.
मी हळूहळू कथेत गुंतून पडतेय.
ही कथा जर अर्धवट ठेवलीस ना, मी खरंच केस करेन तुझ्यावर Lol

खूप छान चालली आहे कथा/ असे वाटते आहे वाचकही एक भाग होत आहेत कथेचा, खिळवून ठेवले आहे Happy
नेहमी सारखे खूप उंचीवर कथा नेऊन (twist देऊन ) लवकर संपूर्ण करा. तुमच्या कथा या डोंगर चढल्यासारख्या वाटतात , रोज थोडे थोडे वर जाऊन शेवटी धक्कादायक टर्न होऊन संपतात. शुभेच्छा Happy !

@महाश्वेता - डोन्ट वरी, की कथा नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद. Happy
@अस्मिता - थँक यु सो मच... ही कथा त्या उंचीवर ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. Happy