साहित्य

वर सुखाचा चेहरा

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 2 August, 2020 - 22:16

वर सुखाचा चेहरा
- महेश मोरे (स्वच्छंदी)

आत दु:खे वर सुखाचा चेहरा
माय म्हणजे कातळामधला झरा

प्रीत म्हणजे रातराणीची जखम
प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा

जन्म झाला शुभ्र चिंधीसारखा
रंग लावा अन् कुणीही वापरा

सावरू मी लागलो आता कुठे
आठवण काढा तिची अन् पोखरा

हे कधी कळलेच नाही ..जिंदगी !
तू खरी की..मी खरा की..तो खरा

शब्दखुणा: 

अनामिक लेखकांचे लेख मायबोली वर स्वत:च्या नावाने प्रसिध्द करणे योग्य आहे का?

Submitted by वीरु on 2 August, 2020 - 10:45

गेल्या दिवसात मायबोली वर यापुर्वी अन्यत्र वाचलेले लेख पुन्हा वाचण्यात आले. संबंधित धागालेखकांना हे लेख त्यांचे नसल्याचा कोणताही उल्लेख करावासा वाटला नाही. याबद्दल प्रतिसादात विचारले असता 'मला आवडला म्हणुन मी तो मा.बो. वर प्रसिध्द केला.' अशी उत्तरे मिळाली. एका महाशयांनी थोडाफार फेरफार करुन प्रसिध्द केलेला लेख तर मायबोली वर आधीच प्रसिध्द झाला होता. त्यांना
हे सांगितल्यावर 'मी मायबोलीवरचे लेख वाचलेले नाहीत कारण माझ्याकडे माहितीचं
भांडार आहे.' हे भन्नाट उत्तर मिळालं.
हे योग्य आहे का?

मैत्री

Submitted by Asu on 2 August, 2020 - 04:31

मैत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री
मैत्री असावी अशी -
फुलासारखी उमलणारी.
कस्तुरीसारखी दरवळणारी.
पाण्यासारखी पारदर्शी,
आल्या रंगात रंगणारी.
मैत्री असावी अशी -
जीवाला जीव देणारी.
एकमेकां समजून घेणारी.
सुखात सुखावणारी अन्
दुःखात विसावणारी.
मैत्री असावी अशी -
चुकल्यास कान धरणारी.
जिंकल्यास पाठ थोपटणारी.
संकट समयी सावरून,
आयुष्य तोलून धरणारी.
मैत्री असावी अशी -

शब्दखुणा: 

'स्पॅथोडिया'

Submitted by ज्येष्ठागौरी on 1 August, 2020 - 02:25

आमच्या ऑफिसच्या आवारात खूप झाडं आहेत.पिंपळ ,बहावा, जॅकरंडा पण मला आवडणारं एक विशेष झाड त्यात आहे ते म्हणजे स्पॅथोडियाचं.विशेष अशासाठी की ते आमच्या जिन्याला लागून आहे.आणि जिन्याच्या सज्ज्याला अगदी लागून.त्या सज्जात लोक जा ये करताना अगदी हाताला लागेल एवढ्या अंतरावर.ती जागा खूप खास आहे.तिथे"स्ट्रॉंग रेंज "येते म्हणून लोकं फोनवर बोलत असतात.खूप थंडीच्या दिवसात तिथं चहाचा कप घेऊन घटकाभर ऊन खातात. वळवाच्या पाऊस आला की तो पहिला पाऊस बघायला पाच मिनिटं येऊन जातात, सगळी याच एका चौकोनात. दुनिया दिसते तिथून.शिवाजीनगरची तुफान रहदारी,शेजारच्या शाळेत जाणारी मुलं.

रोज वाटते

Submitted by किमयागार on 31 July, 2020 - 00:01

रोज वाटते खूप लिहावे, दु:ख लेखणीतून वहावे,
अवती भवती काय चालले, शब्दांमधुनी जरा टिपावे.

जिथे जिथे मी गेलो तेथे चिखल पाहिला खूप भयंकर,
दर्शन घडता त्याला माझे त्यात पांढरे कमळ फुलावे.

आज म्हणे तो गेला आहे गाव मनीचे वसवायाला,
मी तर म्हणतो आधी त्याने वास्तवातील जगून घ्यावे.

स्वप्न पहावे जरूर मोठे कष्ट करावे तसेच मोठे,
शिखर यशाचे सर करताना इतरांनाही सोबत न्यावे.

तुला कशाला चिंता छळते लोकमताच्या प्रक्षोभाची,
जसे बोलणे तसे वागणे हेच सूत्र तू मनी जपावे.

----------मयुरेश परांजपे---------
७२७६५४६१९७

जादू तुझी

Submitted by किमयागार on 29 July, 2020 - 23:12

मी तुझी चाहूल व्हावे अन् तुझ्या मागून गावे.
मोरपंखी पाखरांनी गीत अपुले दूर न्यावे.

वाहिला आहे तुला मी जन्म माझा फार आधी.
याचजन्मी तू मला व्यापून माझे सूर व्हावे.

बघ इथे खोळंबला आहे कधीचा मेघ ओला.
तू अशी लाजून बघता आज त्याने रिक्त व्हावे.

झाडवेली स्तब्ध होत्या मोगरा ही मौन होता,
तू अशी हासून बघता रोज त्यांनी दरवळावे.

काय ही जादू तुझी की मी मला विसरून जावे?
अन् तुझ्या प्रेमात पुरते मी मधासम विरघळावे.

---------© मयुरेश परांजपे (किमयागार)---------
७२७६५४६१९७

अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...

Submitted by Prasad Chikshe on 29 July, 2020 - 04:49

अंबाजोगाईच्या दासूच्या आभाळभर कविता...
dasoo.jpg
अंबाजोगाई म्हणजे थोडं इरसाल गाव. इथली लोकं वेगळ्याच तंद्रीत असतात. प्रत्येकात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. जगातील प्रत्येक विचारधारेचे पाईक आपल्याला हमखास अंबाजोगाईत पाहायला मिळतात. इथे एकाहून एक माणसे घडली. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी अशी प्रचंड उंचीची माणसे म्हणजे अंबाजोगाईकर.

विषय: 

बुद्धीचा आदेश

Submitted by Asu on 28 July, 2020 - 06:13

बुद्धीचा आदेश

विजयाचे घोडे
उधळू द्या आवेशात
विचारांचे आवेग पण
असू द्या हातात
भरकटतील नाही तर
दाट रानावनात
पोहोचायचे कुठे
राही मनातल्या मनात
मनाचे पाखरू
आकाशात फिरते
थकून भागून शेवटी
जमिनीवरच उतरते
हृदयीच्या पाखराला
बुद्धीचा पिंजरा
विचारांच्या असाव्या
त्यावर नजरा
हृदयीच्या भावना
चंचल कंपन
असावे तयाला
बुद्धीचे कुंपण
विचार जरी सदा
मनानेही करावा
आदेश सर्वदा
बुद्धीचा मानावा

शब्दखुणा: 

झीरो...पॉइन्ट झीरो

Submitted by अभ्या... on 28 July, 2020 - 05:56

..............................झीरो................................
.
"मम्मे, बुटं कुटं फेकलीसा?" इनशर्ट करत करत रव्या बोंबलला
"न्हाय माय, म्या कशापायी टाकू. ते दावेदारानं नेलं का उचलून बघ माय"
"तिज्यायला न्हेऊन्शानी, कायतर सोड म्हण"
एक सापडला बाहेरच्या खाटंखाली, दुसरा न्हाणीच्या चुलीमागं. तिथलंच फडकं मारल बसून तोपर्यंत फवं न च्या आला.
एक घास फव्याचा न एक घोट चाचा करणार्‍या लेकाला न्हाहाळत बसली माय.

शब्दखुणा: 

ताई (भाग ५वा )

Submitted by मिरिंडा on 25 July, 2020 - 13:15

मी खिडकी लावून झोपायचा प्रयत्न करु लागलो. झोपेनी न येण्याचं ठरवलं असावं. मधेच मला डॉक्टर तिडबिडेंची आठवण झाली. कोण हा तिडबिडे ....? माझं डोकं चालेना. हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मला परत परत वाटू लागलं. आपण आत्ताच निघावं . कुठून तरी ताई खोलीतून बाहेर आली तर ? .........माझी आज रजाच होती. पण घरी वेळेवर गेलो तर विश्रांती तरी होईल. मी दीपाच्या खोलीत होतो. दीपा कुठे होती ....आणि पप्पा ? ताईला माझ्या खोलीत डांबलेलं होतं. माणसाला अतिशांतता आणि कशाचीही जाग नसलेली जागा आवडत नाही. मी अंथरुणावर पडलो होतो. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. मला लहानशी डुलकी लागली असावी त्यात स्वप्न पडलं .

Pages

Subscribe to RSS - साहित्य