ताई (भाग ५वा )
Submitted by मिरिंडा on 25 July, 2020 - 13:15
मी खिडकी लावून झोपायचा प्रयत्न करु लागलो. झोपेनी न येण्याचं ठरवलं असावं. मधेच मला डॉक्टर तिडबिडेंची आठवण झाली. कोण हा तिडबिडे ....? माझं डोकं चालेना. हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मला परत परत वाटू लागलं. आपण आत्ताच निघावं . कुठून तरी ताई खोलीतून बाहेर आली तर ? .........माझी आज रजाच होती. पण घरी वेळेवर गेलो तर विश्रांती तरी होईल. मी दीपाच्या खोलीत होतो. दीपा कुठे होती ....आणि पप्पा ? ताईला माझ्या खोलीत डांबलेलं होतं. माणसाला अतिशांतता आणि कशाचीही जाग नसलेली जागा आवडत नाही. मी अंथरुणावर पडलो होतो. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. मला लहानशी डुलकी लागली असावी त्यात स्वप्न पडलं .