मी खिडकी लावून झोपायचा प्रयत्न करु लागलो. झोपेनी न येण्याचं ठरवलं असावं. मधेच मला डॉक्टर तिडबिडेंची आठवण झाली. कोण हा तिडबिडे ....? माझं डोकं चालेना. हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मला परत परत वाटू लागलं. आपण आत्ताच निघावं . कुठून तरी ताई खोलीतून बाहेर आली तर ? .........माझी आज रजाच होती. पण घरी वेळेवर गेलो तर विश्रांती तरी होईल. मी दीपाच्या खोलीत होतो. दीपा कुठे होती ....आणि पप्पा ? ताईला माझ्या खोलीत डांबलेलं होतं. माणसाला अतिशांतता आणि कशाचीही जाग नसलेली जागा आवडत नाही. मी अंथरुणावर पडलो होतो. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. मला लहानशी डुलकी लागली असावी त्यात स्वप्न पडलं . कोणीतरी एका मोठ्या हॉलचं कुलुप तोडीत होतं. लवकरच मला असं दिसलं की तो एक रानटी लोकांचा जमाव होता. त्यात माझी भूमिका मात्र समजत नव्हती. लांबून कुठूनतरी ढोल बडवण्याचा आवाज येत होता. हळूहळू कुलपावरचे घाव ऐकू येण्याऐवजी काहीतरी खरडल्याचा, घासल्याचा आवाज आता येत होता. अचानक स्वप्न नाहीसं झालं. दीर्घ मोठे श्वास कमी होत होते. मी कूस बदलली. अजूनही खरडण्याचा आवाज येत होता. तो माझ्या अगदी जवळून म्हणजे माझ्या जवळच्या भिंतीतून येत असावा. माझी झोप आता चाळवली आणि नाहीशी झाली . मी डोळे उघडले. अंधारात खोलीतल्या सामानाच्या कडा अर्धवट दिसत होत्या. आता भिंतीतला आवाज मोठा झाला. मी घाबरुन ताडकन् उठून बसलो. अंधारात मी " कोण आहे तिकडे ,,,,? असा प्रश्न फेकला. उत्तरादाखल फक्त खरडणं थांबलं. मी लाईट लावला. पिवळ्या उजेडात मला काहीच दिसेना. आता परत हळू आवाजात खरडणं चालू झालं. मी सावकाश त्या भिंतीला कान लावून उभा राहिलो. आवाज अचानक बंद झाला. .....भिंतीवर लहान आवाजात धक्के बसू लागले. मी काठीसारखं हत्यार शोधत होतो. आता माझी पाठ आवाजाकडे वळली होती.
मी टेबलाचा खण उघडण्याचा जोरदार प्रयत्न करीत होतो. तेवढ्यात भिंतीतला एक जुनाट दरवाज्या खडर्र.खट्....खडखड ...आवाज करीत उघडला. त्याचबरोबर जिन्यावरच्या पायऱ्यांवरुन ताईंचा निष्प्राण देह गडगडत मी उभा होतो तिथे माझ्या पायाशी येऊन धडकला. त्यांची छाती रक्ताने भरली होती. रक्त बरंच जात होतं. जमिनीवर रक्ताचं लहानसं डबकं तयार होत होतं. घाबरुन मी थरथरु लागलो. माझं तोंड उघडं पडलं होतं. मी आधारासाठी खुर्ची धरुन ठेवली. ..... ताईंच्या डाव्या छातीवर धारदार सुरा भोसकलेला दिसत होता. मी सहज म्हणून सुरा काढायचा प्रयत्न करुन पाहिला पण छातीत घुसलेला सुरा मला काढता येईना. माझ्या आयुष्यात मी प्रथमच नुकताच खून झालेला देह जवळून पाहत होतो.... तेवढ्यात जिन्यावरुन ताईंना ओलांडून पप्पा खोलीत आले. त्यांच्या हातात पिस्तूल होतं.त्यांच्या हातात काल मी पाहिलेले चामड्याचे मोजे होते.माझे विस्तारलेल्या डोळ्यांकडे पाहात ते म्हणाले, " तुम्हाला धक्का बसणं स्वभाविक आहे. पण माझं हे प्लानिंग फार जुनं होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल ,पिस्तुल असताना मी सुरा का वापरला ? " ,........ मला पप्पांचा राग आला होता, मी बोलत नाही असं पाहून टेबलाजवळच्या खुर्चीवर बसत म्हणाले," काय आहे ना अविनाशराव, ह्या ताईनी डॉमिनेट करुन माझं चैन नाहीसं केलं होतं. ताई जन्माला आली आणि माझी नोकरी गेली. लहानसहान धंदे आणि नोकऱ्या करीत मी दिवस ढकलंले. नंतर दीपाचा जन्म झाला आणि माझा एका धंद्यात जम बसला. पण ताईचं लग्न जमत नव्हतं. शेवटी मी तिच्यावरच सोडलं. दीपाची आणि तुमची मैत्री मला बरी वाटली. निदान माझी एक मुलगी तरी मार्गाला लागेल. याचं समाधान वाटलं. पण ताईनी तुमच्यावर डोळा ठेवला. मला वाटलं तुम्ही तरी तिच्या पंजात फसणार नाही. पण तुम्हीही सामान्य पुरुषच निघालात. फार कशाला ताई दीपाशीही समलिंगी विक्रुती असल्यासारखी एकदोन वेळा वागल्याचं मला दीपाने आडून आडून सांगितलं. तिला चांगलीच शरम वाटत होती. अचानक मला तुम्हाला ताईनी वाड्यावर बोलवल्याचं समजलं .तिचं प्लानिंग मला माहित होतं. डॉ.तिडबिडेना बोलवून ती तुमच्या कमरेच्या खालचा भाग तीन चार वर्षाच्या मुलाएवढा करुन, तुम्हाला गुलाम बनवणार होती. आणि इथेच ठेवणार होती. हे डॉक्टर तिडबिडे कोण तुमच्या मनात आलं असेलच नाही का ? ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांचं संशोधन अमेरिकन सरकार विकत घेणार आहे. दीपा इतक्यात उठणार नाही. त्यामुळे आपल्याला आता वेळच वेळ आहे. तुमच्या शंकाही नाहीशा होतील.... काय? " .......आता मात्र मला म्हाताऱ्याचा फार राग आला. माझ्या मनात वेगळेच विचार चाललेले पाहून त्यानी पिस्तुलाचं टोक माझ्याकडे वळवलं. तरीही धीर करुन मी म्हंटलं, " समजा मी पोलिसाना बोलावलं तर..... ?" थोडा वेळ तसाच जाऊन देत माझ्याकडे रोखून बघत पप्पा महणाले. " काय आहे ना अविनाशराव तुम्ही त्या सुऱ्याला हात लावलाय, आणि मी माझं काम हातमोजे घालून केलंय. ठसे तुमचे मिळतील. बोलवाच तुम्ही पोलिसाना. आणी दुसरं म्हणजे तुम्ही तिच्या बरोबर सिनेमाला गेला होतात. तिनी ते दीपाला सांगीन म्हंटल्यावर तुम्हाला भिती वाटली. तसं झालं तर हीही जाईल आणि तीही जाईल या भितीनी तुम्ही दीपा आवडत असल्यानं हिला संपवायचा प्रयत्न केलात, हे मी सांगू शकतो. बोलवा, बोलवाच तुम्ही पोलिसाना. ताईनी तुम्हाला चांगलंच नादी लावलं होतं. आणि तुम्ही इथं यायला तयार झालात, अशी सुवर्णसंधी मी कशी सोडीन, सांगा. " ........ माझ्या कपाळावर आणि मानेवर घामाचे थेंब जमू लागले होते. मला एक प्रकारची थरथर सुटली.
पप्पांचा बिनधास्तपणा पाहून आणि लक्ष विचलित झालेले पाहून त्यांच्या हातावर हल्ला करीत हातातलं पिस्तूल खेचून घेण्याचा प्रयत्न केला. ते सावध झाले आणि मला दरवाज्याकडे ढकलून त्यांनी तोल सांभाळीत हातातलं पिस्तूल माझ्यावर रोखीत म्हंटलं, " आता तुम्ही ताईला खेचून जिन्याजवळ आणून खाली न्यायला मला मदत करा. अंगणात खड्डेही खोदावे लागतील. "...... मी अनिच्छेनेच ताईंच्या खांद्याखाली हात घालून ओढायला सुरुवात केली. त्यांचं वजन मुळातच जास्त असावं. एवढं वजन ओढण्याची मला संवय नव्हती. असल्या गोष्टी चित्रपटातच पाहिल्या होत्या. ताई तसूभरही हलल्या नाहीत. ते पाहून पप्पा पिस्तूल खिशात ठेवीत म्हणाले" अजिबात चलाखी करायची नाही समजलं ना . चला लावा जोर ." त्यांनी ताईंना पायांकडून उचलंल. जिन्यापर्यंत नेताना आम्हाला चांगलाच दम लागला. पप्पाना कसं अडकवायचं माझा प्लान चालूच राहिला. काहीतरी विचारायचंं म्हणून विचारलं, " पपा, राधाबाईना चुकवून कसं करणार ....?" त्यानी यावर आधीच विचार केला असावा. " अहो राधाबाईचीही मी सोय लावलीच असेल ना ....? , तुम्हाला काय वाटतं . " , सहजपणे मी विचारलं, " त्याना तुम्ही घरी पाठवलंच असेल. " ..... " हो पाठवलं की फक्त देवाच्या घरी. कारण त्याना स्वत:चं घर नाही. आधीच्या मालकानीच त्याना ठेवल्या होत्या. त्या विनापाश , विनापत्य,अनाथ विधवा. या जगात त्यांचा एकही नातेवाईक नाही.. वाडा विकत घेतल्यावर त्याना आणि सखारामला(म्हणजे सामान नेणारा ) आम्ही इथेच राहायला सांगितलं. तो सखारामही बहिरा आहे. राधाबाईंनी तर पाय धरले. कारण त्याना कुठेही आसरा नव्हता नवरा गेल्यापासून त्या वाड्याच्या सेवेतच होत्या. म्हणून तर दोन खड्डे खोदावे लागतील. उगाच का तुमची मदत हव्ये मला ? " , मी शहारलो. असल्या लोकाना निरुपद्रवी लोक मिळतात तरी कुठून. मला परमेश्वराचा राग आला. " म्हणजे त्यानाही तुम्ही मारलंत तर. " मी सहन न होऊन विचारलं. ..... " बिच्चारी, मला तिला मारणं भाग होतं हो. तसे तिचे माझ्याशी बायकोसारखे संबंध होतेच. पण काय आहे ना , माणूस खुनाच्या मामल्यात वफादार कसा राहणार , नाही का? तिला उगाच त्रास नको म्हणून तिची सुटका केली. " अचानक मला वॉशरुम जायची जाणीव झाली. पप्पाना सांगितल्यावर ते म्हणाले, " ओके बट नो चीटिंग हं. " ते वॉशरुमच्या बाहेर उभे राहिले . तिथेच त्यानी चूक केली. मी आत जाऊन फ्लश सोडला आणि खिशातला मोबाईल काढून पोलिसाना फोन केला. " बोला, कोण ? ... "..... मी पुन्हा एकदा फ्लश चालू केला. " मी अविनाश सातपुते बोलतोय. इथे खून झालाय, बदामी वाडा. " आणि मी फोन कट केला . पँटची झिप लावतो न लावतो तोच पपा आत शिरले.
पिस्तूल माझ्या कानशिलाला लावून माझा मोबाईल त्यानी खेचून घेतला. वॉशरुमच्या बाहेर आलो. आता ताईंना त्या नागमोडी अरुंद जिन्यावरुन वाड्याच्या पुढच्या भागात घेऊन जायचं असावं. की मागच्या भागात ?. आता मी जिन्याच्या पायरीवर उभा होतो. ताईंच्या काखेत हात घालून उचलण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आणि पप्पा ताईंचे पाय उचलीत म्हणाले, " पायरी सांभाळा, नाहीतर मागच्या पडलात तर तुम्हाला खोक पडायची. इथे तिडबिडेंशिवाय डॉक्टर नाही..डॉक्टरसाठी तालुक्याला जावं लागतं. अजून राधाबाईंना उचलायच्येत. तरुण असून तुमच्यात जोर फार कमी आहे. " मी त्यांचं बोलणं मनावर घतलं नाही. किती वाजत होते याचा अंदाज मला येत नव्हता. आम्ही ताईंना घेऊन उतरायला सुरुवात केली. ताई हळूहळू जड होत चालल्या होत्या.. आता टाइम त्यानाच विचारावा लागेल.. तेवढ्यात हॉलमधल्या घड्याळानी तीन ठोके दिले..माझं अंग आता चांगलंच दुखू लागलं.
कसेतरी आम्ही हॉलमधे आलो..ताईंना खाली ठेवल्या. दीपा जागी व्हावी असं मला सारखं वाटत होतं.मी इकडे तिकडे पाहत होतो. ते पाहून पप्पा म्हणाले, " चहा घेणार का ,थोडा ,,,? एवढे कष्ट केल्यावर थोडं उत्तेजक पेय्य हवंच , नाही का ? तुम्ही दारु पीत नाही मला माहिती आहे. " मी काहीच बोलत नाही असं पाहून ते पुढे म्हणाले, " ,चहा मीच बनवणार आहे. आणि काय आहे जाणारा जातोच हो. त्यामुळे जिवंत माणसाचं रुटीन थोडंच बदलंतय ? ". न राहवून मी म्हंटलं ," तुमच्या हातून दोन खून झालेले आहेत. दोन दोन प्रेतं समोर असताना, हे कसं सुचतं हो तुम्हाला. ? " मला आता उजाडेपर्यंत टाईमपास करायचा होता. दिवसाउजेडी पोलिस येण्याची जास्त शक्यता होती.माझं बोलणं त्याना फारसं आवडलं नाही. पण काही न बोलता ते कीचनकडे वळले. मी त्यांच्यामागे जाऊ लागलो. त्यानी कीचनमधला लाईट लावला. तिथे असलेली राधाबाईंची बॉडी गायब झालेली दिसली. ते न आवडून म्हणाले ," या राधाबाई गेल्या कुठे ? इथेच तर पडल्या होत्या. रक्ताचे डाग सगळीकडे दिसत होते. त्यांचा माग काढीत पप्पा त्याना शोधत होते. हातातलं पिस्तूल माझ्याकडे वळवून म्हणाले " चला मला राधाबाईना शोधायला मदत करा. हिला गोळीच घालायला हवी होती. " आम्ही शोधू लागलो. रक्ताचे डाग मागच्या दरवाज्याशी येऊन दिसेनासे झाले. दरवाज्या अर्धवट उघडा होता. त्या नक्कीच मागच्या दरवाज्याने पळाल्या असणार. पण गेल्या कुठे . मागच्या दरवाज्यातून बाहेर जाणार एवढ्यात, मला त्यामागे मेन फ्यूज दिसले. पप्पा बाहेर पडले..मला त्यांनी बाहेर यायला सांगितलं. मी वाड्यातले लाईट घालवले आणि पटकन् दरवाज्या लावून घेतला तर ते बाहेर अडकतील.मी तेच विजेच्या वेगाने केलं. दरवाज्या लावून घेतला आणि आतून एकदाची कडी घातली. अंगच्या कुलुपावर अवलंबून राहण्यात अर्थ नव्हता. पप्पांकडे चावी असण्याची शक्यता होती . बाहेरुन त्यांचा करडा आवाज आला. " अविनाश दरवाज्या उघड. नाहीतर, बिजागिरींवर गोळ्या झाडून दरवाज्या तोडून आत येईन. मग तर तू मेलासच समज." आता त्यानी घाणेरड्या शिव्या घालायला सुरुवात केली. ते आत आले तर त्याना दिसू नये म्हणून तर मी मेन फ्यूज काढून घेतलेहोते.. आतमधे पूर्ण अंधार झाला होता......
आता माझ्या जवळ मोबाईलही नव्हता की मी दीपाला किंवा पोलिसाना करु शकलो असतो.पप्पांच्या शिव्या चालूच होत्या त्यात त्यांनी एक गोळी झाडली. तिचा दणदणीत आवाज वाडाभर घुमला. गोळीचा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. आता मी त्यांच्याकडे लक्ष न देता . ओट्यावरची काडेपेटी शोधू लागलो. कीचनची रचना मला माहीत नव्हती. एक दोन वेळा भिंतीवर आपटलो ही. पप्पाचा नेम चुकला असावा.त्यांनी दुसरी गोळीही झाडली. मी माझे हात कानावर घट्ट दाबल. दरवाज्या अजूनही शाबूत होता. काडेपेटी असायलाच हवी. कारण खेडेगावात गँस कसा असेल. कदाचित असेलही. मी कीचन पाहिलंच नव्हतं. असो . ओट्याखालच्या खणात अंदाजाने हात फिरवला. दोन चार डबे मोठ्ठा आवाज करीत खाली पडले. ते ऐकून पप्पांनी शिव्यांची सरबत्ती पुन्हा चालू झाली. बाजूच्या दुसऱ्या खणात हात फिरवला पुन्हा डबे पडले . पण यावेळेस मात्र काडेपेटी पडल्यासारखा आवाज आला. कीचनच्या लादीवर पडून हात फिरवायला सुरुवात केली. अचानक एक बंडल हाताला लागलं. तर ते काडेपेट्यांचा बॉक्स निघाला. मी थरथरत्याहातानी काडी ओढली मला हॉलकडे जाण्याचा मार्ग दिसला . पुन्हा काढी ओढून जिना शोधला . कडी विझली. परत अंधार झाला. मी अंदाजानीच जिन्याकडे चाललो होतो. अचानक पायाखाली काय आलं कळलं नाही. अडखळून मी आडवा झालो. हातातला काडेपेटीचा बॉक्स फेला गेला. कसातरी उभं राहून मी तो बॉक्स शोधला. आणि काडी ओढून पाहिली. तर,,,,,जे पाहिलं त्यानी मी शहारलो. काडीच्या अंधुक प्रकाशात मला ताईंचा फुगलेला चेहरा आणि त्यांची माझ्याकडे पाहणारी कधी न बंद नहोणारी तटस्थ सताड नजर दिसली. पप्पांचा आवाज येत नव्हता. ते नक्कीच पुढच्या दरवाज्याने प्रयत्न करतील. मी हळूहळू तिकडे चालू लागलो. आता मलाच लाईटाची गरज भासू लागली . पण काडेपेटीतल्या काड्यांवर मी मुख्य दरवाज्या गाठला. बाप रे, केवढा दम लागला. प्लँपफॉर्मच्या आकाराएवढा हॉल मोठा आहे हे विसरलोच होतो.काडी ओढून पाहिलं आतले बोल्ट लावलेले होते. मी निश्चिंत झालो. पुन्हा मागे वळून जिन्याकडे जाताना दुसरं कोणीतरी आत आहे, असं जाणवलं. अंगाला घाम सुटला . कोण असेल ? पप्पा, राधाबाई का ताई , का दीपा .... ?
(क्र म श.:)
भाग लिहिण्यास आणि पाठविण्यास
भाग लिहिण्यास आणि पाठविण्यास फार वेळ लागला. क्षमस्व.
छान. सुंदर लिहली आहे.
छान. सुंदर लिहली आहे.
फक्त मागच्या भागांची लिंक दिलीत तर फार बरं होईल. मागचे भाग शोधायला खुप वेळ लागला.
खुप छान !!
खुप छान !!
आता राहीलेली कथा लवकरात लवकर पुर्ण करा
थरारक आणि उत्कंठावर्धक......
थरारक आणि उत्कंठावर्धक...... सुरवातीला एवढी खास नाही वाटली नंतर मस्त पकड मिळवली आहे.
उत्कंठावर्धक....
उत्कंठावर्धक....