©संततधार - भाग ९ -पार्टी!

Submitted by अज्ञातवासी on 17 June, 2020 - 05:22

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग - ८
https://www.maayboli.com/node/75098

पुढील भाग शनिवारी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

स्नेहलने दरवाजा उघडला. 
"वेलकम मनू." ती हसली.
मोकळे सोडलेले स्टेप कट केलेले व हलकेसे सोनेरी हायलायटेड केस, हलकासा मेकअप, ओठांना पिंकीश रेड लिपस्टिक लावलेली. नेवी ब्लु - व्हाईट अशी अबस्ट्रॅक्ट कुर्ती व खाली व्हाईट लेगिंग्स असा संपूर्ण पेहराव तिने केला होता.
मनू क्षणभर तिला या रुपात बघून थबकलाच... नेहमी तो तिला ऑफिसच्या ट्राउजर आणि टॉप, गच्च बांधलेले केस अशाच अवतारात बघायचा. मात्र हे रूप बघून तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला.
"वेल, तू इतकी सुंदर दिसतेस हे मला माहिती नव्हत."
"वेल, डोन्ट बी सो फास्ट मनू." ती त्याला खिजवत गोड हसली.
"वेल, टेक इट ऍज अ कॉम्प्लिमेंट फ्रॉम अ 'मॅरीड' जेंटलमन." त्यानेही तिला तसच हसून प्रत्युत्तर दिलं.
तो घरात आला. स्नेहलच अतिशय नीटनेटकं सजवलेलं घर बघून तो प्रभावित झाला. कुठेही वस्तूंचा अनावश्यक वापर नव्हता, मात्र प्रत्येक वस्तू घराच्या सौंदर्यात भरच घालत होती.
मात्र घरात स्नेहलव्यतिरिक्त कुणीही दिसत नव्हत.
"पार्टी संपली की काय? कुणीही दिसत नाहीये." त्याने विचारले.
"फक्त तूच एकटा इनवायटेड आहेस. ही पार्टी मी फक्त तुला देतेय. तसही ऑफिसमध्ये बाकी कुणी माझ्या प्रमोशनमुळे खुश झालं असेल असं मला वाटत नाही."
"वेल, हे माझ्यासाठी आता अनपेक्षित आहे. मला वाटलं होतं इथे पार्टीला बरेच लोक असतील." मनू थोडासा अवघडलेपणाने म्हणाला.
"सॉरी मनू." स्नेहलच्या चेहऱ्यावर अतिशय खजील भाव आले. 
एक दोन क्षण असेच शांततेत गेले.
"डोन्ट बी सॉरी, उलट आय एम सॉरी, तुला आता माझ्याबरोबर बोअर व्हावं लागेल."
मनू अतिशय शांतपणे म्हणाला. मात्र त्याच्या या वाक्याने स्नेहलची कळी खुलली.
"नाही होणार मी बोअर. वेट, तुझ्यासाठी काय आणू?"
"फक्त पिण्यायोग्य पाणी. काहीही वेलकम ड्रिंक नकोय मला."
"सो स्वीट. कारण मी नेमकं वेलकम ड्रिंकच विसरले होते. थांब आणते."
स्नेहल आत गेली. मनूची नजर भिंतीवरच्या एका फोटो फेमकडे गेली.
स्नेहलने एका लहान मुलाला मिठी मारली होती, व ते दोघेही कॅमेऱ्याकडे बघून हसत होते.
स्नेहलने पाणी आणलं, मात्र मनू अजूनही ती फ्रेम बघत होता.
"माय सन, विराजस. ही इज नो मोर." स्नेहलने त्याच्याकडे बघून म्हटले.
"ओ, आय एम एक्सट्रिमली सॉरी. मला माहित नव्हतं."
"डोन्ट बी सॉरी मनू. पाणी." तिने ग्लास पुढे केला. 
"आम्ही हौसेने गणपती बसवायचो. गणपती विसर्जनाच्या दिवशी तो अक्षरशः बाप्पा चालला म्हणून रडायचा. एकदा असाच तो गणपती बुडवायला मित्रांसोबत गेला होता, आणि नंतर त्याची बुडून गेल्याची न्यूज आली."
मनू शांतपणे ऐकत होता.
"ही वॉज माय लाईफ मनू. तो गेल्यानंतर मी एकटी, एकाकी पडले. आणि त्यातून सावरण्यासाठी मग कामात स्वतःला इतकं गुंतवून घेतलं, की माझं मलाच भान राहिलं नाही."
"मी बघतोय ते. मनू म्हणाला. खरं सांगायला गेलं, तर स्नेहल मी कधीही तुझ्या पर्सनल लाईफची चौकशी केली नाही. मला गरजही वाटली नाही, आणि तुझ्या पर्सनल स्पेसवर मला अतिक्रमण केल्यासारखं करायचही नव्हतं. पण जस्ट, आय एम सॉरी, की मी एक सीइओच्या नजरेच्या पुढे बघू शकलो नाही." 
"मनू एक सांगू? यु आर बेस्ट बॉस आय एव्हर हॅव." स्नेहल थोडी भावविवश होत म्हणाली.
"तुला वर्स्ट म्हणायचंय?" मनू हसत म्हणाला.
"नो मनू, मी याआधी दोन मोठ्या ब्रँड्ससाठी काम केलं, जिथे साधा मॅनेजर सूटाबुटात वावरायचा. पण सूटाबुटात लचके तोडणारे लांडगे असतात हे मला पदोपदी जाणवलं."
"मला तुझा इंटरवयु आठवतोय स्नेहल. दोन वर्षात तीन मोठ्या कंपन्या सोडून आमच्याकडे का जॉईन व्हावंसं वाटतय, असा मी तुला प्रश्न विचारला होता. आणि त्याचं उत्तरही. काय होतं ते आठवतंय आता?"
"...जर माझ्या डीग्नीटीशी समझोता करावा लागणार असेन, तर आय अल्वेज चुज माय डीग्नीटी फर्स्ट." स्नेहल हसून म्हणाली.
"आणि त्याक्षणी आम्ही तुला सिलेक्ट केलं. आय मिन तू आमची कंपनी सिलेक्ट केलीस." मनू हसून म्हणाला.
"हं. अलमोस्ट तीन वर्षे ना?"
"येस."
"बाय द वे, जर आपण डायनिंग टेबलवर बसलो, तर तुझी काही हरकत नाही ना? म्हणजे मला तुला नीट स्टार्टर्स सर्व करता येतील."
"माझी काहीही हरकत नाहीये. बादवे आज तू ड्रिंक्स घेणार आहेस?" मनूने विचारले.
"जस्ट सुला दिंडोरी रिजर्व शिराज." ती म्हणाली.
"ओके. मी ऑरेंज ज्यूस." मनू म्हणाला.
"मनू तू सिरियसली वल्ली आहेस. खरंच सांगते. म्हणजे आपल्या ऑफिसच्या सेमी अन्युअल पार्टीचं अलमोस्ट दोन - तीन लाखांचं फक्त ड्रिंक्सचं बिल तू भरतोस, आणि तू ड्रिंक्स घेत नाहीस, याचं मला कायम आश्चर्य वाटतं."
"आय एम हलवाई, बस मिठाई खिलाता हू, चखता नही." मनू हसून म्हणाला.
त्यावर स्नेहलही खळखळून हसली. आणि दोघेही आत गेले.
चिकन बंजारा कबाब, चिकन टिक्का, पनीर टिक्का आणि हराभरा कबाब. सोबत पापड आणि काजू असा मेन्यू स्नेहलने स्टार्टर म्हणूनच ठेवला होता.
"स्नेहल, हे एवढं सगळं करायची गरज नव्हती."
"मी केलेलच नाहीये. हे सगळं बाहेरून मागवलय. फक्त जेवणात चिकन टिक्का बिर्याणी, चिकन मसाला आणि नान मी बनवलेत."
"तू मला जाडजूड करूनच पाठवशील आज." मनू हसला.
"अच्छा. मग तर चांगलंच आहे. वेट मी ग्लास आणते."
तिने ग्लास आणले, व वाईनची बाटलीसुद्धा आणली. ज्यूस आधीच टेबलावर होतं.
ती बाटली उघडणार इतक्यात...
"वेट, बॉटल मला दे. आणि ग्लाससुद्धा." मनू म्हणाला.
ती आश्चर्यचकित झाली.
त्याने बॉटल उघडली. पाऊणला थोडा वर ग्लास भरला, आणि खाली टेबलावर ग्लास ठेऊन अतिशय वेगात स्नेहलकडे सरकवला...
...ग्लासमधून एक थेंब वाइन खाली सांडली नव्हती, मात्र ग्लासमध्ये एक छोटंसं चक्रीवादळ तयार झालं होतं.
"ओ माय गॉड! इज इट सम काइंड ऑफ ट्रिक?" स्नेहल हसून म्हणाली.
"येस." मनूही हसला.
त्यानेही ज्यूसचा ग्लास भरला.
"चियर्स." तो म्हणाला. स्नेहलनेही ग्लास उंचावला, आणि दोघांनीही एक घोट घेऊन ग्लास खाली ठेवला.
"मनू, एक विचारू?"
"विचार ना?"
"पर्वणीने MD पद सोडण्याचं कारण सांगशील? हे खूप विचित्र आहे माझ्यासाठी, किंवा सगळ्या स्टाफसाठी, कारण हे होणं अशक्यप्राय गोष्ट आहे."
मनू विषण्ण हसला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, आणि बोलायला सुरुवात केली.
"स्नेहल, मी तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही, हे मला माहितीये. कारण तू ते लगेच पकडशील, आणि त्यांनंतर मीसुद्धा ओकवर्ड होईल, आणि तुलाही तसच वाटेल.
फक्त एवढंच सांगू शकतो, की नाऊ माय वाईफ इज नॉट इन माईंडसेट टू हँडल दॅट पोजिशन, मी फक्त आशा करतो, की ती पुन्हा हे पद सांभाळण्याच्या लायक व्हावी."
"मग तू पुन्हा सीईओ, आणि मी डेप्युटी डिरेक्टर. नॉट फेयर." स्नेहल हसली.
"डोन्ट वरी, तुझं कधीही डीमोशन होणार नाही. आय प्रॉमिस." मनूही हसून म्हणाला.
"मनू, तुमच्यात सगळं ठीक आहे ना? आणि मी खऱ्या उत्तराची अपेक्षा ठेवतेय." स्नेहलने साशंकतेने विचारले.
"स्नेहल... सगळं ठीक नाहीये, पण अजून सगळंच बिघडलेलं नाही." मनू नजर चुकवत म्हणाला. 
"हे मला लक्षात येत होतं मनू, खरंच लक्षात येत होतं. पण विचारू शकले नव्हते. पण तुझ्यासारख्या एका चांगल्या किंबहुना परफेक्ट माणसाच्या लाईफ मध्ये असं काही असेल, याचा विचार करूनच गिल्टी वाटत होतं."
"थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट स्नेहल, पण पर्वणीही चांगली आणि परफेक्ट आहे. पण दोन चांगल्या व्यक्ती चांगलं आयुष्य उभारतीलच असं नाही."
स्नेहल शांत बसली, आणि थोड्यावेळाने म्हणाली.
"मनू, तू एक परफेक्ट माणूस आहेस हे मी पुन्हा सांगतेय. त्याचबरोबर एक परफेक्ट हजबंड सुद्धा. शी इज सो लकी. आणि जर मी तिची मैत्रीण असते ना, तर तुम्ही एकत्र राहावं म्हणून कायम प्रयत्न केले असते."
"थँक्स स्नेहल अँड येस शी इज.".तो हसून म्हणाला."
"बाय द वे, व्हॉट अबाऊट युवर हजबंड?"
"वेल..." आता स्नेहलने दीर्घ श्वास घेतला.
"आय वॉज इन टॉक्सिक रिलेशनशिप. इट वॉज लव मॅरेज. चार वर्षे शारीरिक, मानसिक सगळे अत्याचार सहन केले. दोन वर्ष प्रेम प्रेम म्हणून, दोन वर्ष ऑप्शन नाही म्हणून. आणि एके दिवशी सरळ मुलाला घेऊन आई बाबांकडे आले. त्याच्याकडून खूप त्रास झाला, खूप. पण शेवटी डिओर्स घेतलाच."
"सॉरी स्नेहल, पण गुड तू बाहेर पडलीस."
"ते वयच वेडं होतं रे. कुणीतरी डॅशिंग हिरो आपल्यासाठी येईल असं आपल्याला वाटत असतं, आणि तो दिसला की कुठलाही विचार न करता आपण प्रेमात पडतो. त्याची बंधने केयर वाटतात. त्याच्या मनाप्रमाणे वागण्यात थ्रील वाटतं, आणि त्याचं ऑबसेशन, त्याच्या इच्छा हेच खरं प्रेम वाटतं."
"हम्म. खरं आहे."
"व्हॉट अबाउट युअर लव्ह स्टोरी, इफ यु कॅन टेल?"
"खरं सांगायला गेलं, तर आमची आधी मैत्री होती, असं तिला वाटतं. पण मी तिला पहिल्यांदा बघताच प्रेमात पडलो. तेव्हा मी तिच्याविषयी प्रचंड रागीट, अग्रेसीव होतो. पण पर्वणी खमकी होती. तिने मला फ्रेंड म्हणूनच ठेवलं होतं. एकदा प्रचंड वाद झाले, आणि ती मला न सांगता पुण्याला निघून आली. दोन वर्षे वि आर नॉट इन टच. पण एके दिवशी तिचा फोन आला, आणि काही दिवसांनी आम्ही लग्न केलं."
"ग्रेट. पण प्रेमात माणूस किती बदलतो ना? कबीर सिंग मधून डायरेक्त विवाह मधला शाहिद...".ती जोरजोरात हसू लागली.
"नॉट शाहिद. व्हॉट अबाउट अमोल पालेकर?"
"नो... काहीही काय." तिचं हसू आवरत नव्हतं.
"काहीही नाही. जर त्याकाळी मध्यमवर्गीय लोकांना प्रेम करण्याची स्वप्ने इतर कलाकार दाखवत असले, तरीही हिरो न बनता वास्तवात प्रेम कसं करावं, हे अमोल पालेकरनीच शिकवलं."
"अरे लहानपणी ना, मी एक रोमँटिक गाणं ऐकायचे अमोल पालेकरचं. खूप सुंदर गाणं होतं ते."
"थांब. मी ऐकवतो. माझ्या सगळ्यात फेवरीट गाण्यामधील एक आहे हे."
मनूने मोबाईल बाहेर काढला. एव्हाना रिकामा झालेला ग्लास स्नेहलने पुन्हा भरला.
आणि त्याने गाणं लावलं...

'ना बोले तुम, ना मैंने कुछ कहा,
मगर न जाने ऐसा क्यों लगा,
कि धूप में खिला है चाँद, दिन में रात हो गई,
ये प्यार की बिना कहे सुनेही बात हो गई!'

"मनू, तू मनकवडा आहेस का? म्हणजे हेच गाणं मला हवंय असं ओळखूच कसा शकतोस तू?" स्नेहल पूर्ण प्रभावित झाली होती.
"बीकॉज आय एम अमोल पालेकर फॅन." मनू हसून म्हणाला.
"मनू तू ग्रेट आहेस. सिम्पली ग्रेट. "
तिने ते गाणं तिच्या मोबाईलवर शोधलं, आणि लावलं. 
त्याबरोबर अतिशय मंद आवाजात घरभर ते गाणं वाजू लागलं.
"मस्त सिस्टीम केलीये तू स्नेहल." मनू म्हणाला.
"एकटी असते, तेव्हा म्युजिक आणि डान्स, हेच माझे सोबती."
"तू डान्सही करतेस."
"येस."
"मस्त."
एव्हाना स्टार्टर संपले होते. जेवणाला अजून वेळ होता.
"थोडावेळ डान्स करूयात?" स्नेहलने विचारले.
"मी आणि डान्स?" मनू हसला.
"का नाही?"
ते दोघेही उठून हॉलमध्ये गेले. स्नेहलने मंद इन्स्ट्रुमेंटल गाणी लावली.
मनूने डावा हात तिच्या पुढे केला. तिनेही उजवा हात त्याच्या हातात देऊन त्याला साथ दिली. 
दोघांनीही हात थोडा वर घेतला व ते संथपणे डान्स करू लागले.
कितीतरी वेळ त्यांचा डान्स चालू होता.
तेवढयात इलेक्ट्रिक गीटारवर एक म्युजिक जोरात वाजलं.
"बेखयाली, राईट?" मनूने विचारलं.
"येस." ती म्हणाली. "यावर जोडीने डान्सच्या जबरदस्त स्टेप्स आहेत."
"हो मी बघीतल्यात त्या." मनू म्हणाला.
"वाना ट्राय?"
 "लेट्स ट्राय."
दोघांनीही हळूहळू स्टेप्स मॅच करायला सुरुवात केली. दोघेही गाण्यात आणि नाचण्यात पूर्ण गुंतून गेले होते. त्यांना कशाचंही भान राहिलं नव्हतं.

'मैं जो तुमसे दूर हूँ, क्यूँ दूर मैं रहूँ?
तेरा गुरुर हूँ
आ तू फ़ासला मिटा, तू ख्वाब सा मिला
क्यूँ ख्वाब तोड़ दूँ?'

दोघांचीही शरीरे एकदम जवळ आली.

'ये जो लोग-बाग हैं, जंगल की आग हैं
क्यूँ आग में जलूँ?
ये नाकाम प्यार में, खुश हैं ये हार में
इन जैसा क्यूँ बनूँ?'

स्नेहलने डोळे मिटले, आणि हळूहळू ती ओठ मनूच्या अगदी ओठांजवळ नेऊ लागली...
मनू सावध झाला. त्याने तिच्यापासून स्वताला सोडवून घेतलं.
"सॉरी स्नेहल, मी हे नाही करू शकत. कितीही लांब असलो, तरी अजूनही मी पर्वणीचा नवरा आहे."
स्नेहल मात्र प्रचंड ओशाळली होती. तिला प्रचंड अपराधी वाटत होतं.
"आय एम सॉरी मनू..." ती एवढंच म्हणू शकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, व ती आत निघून गेली.
थोड्या वेळाने मनू किचनमध्ये आला.
"स्नेहल, मला थोडा वेळ देशील."
"बोल ना." ती त्याच्याकडे न बघता म्हणाली.
माझ्याकडे प्लिज बघशील एकदा?
तिने त्याच्याकडे बघितले... अजूनही ती प्रचंड ओशाळलेली होती.
"सगळ्यात आधी शांत हो. जे झालं, ते फ्लो मध्ये झालं. आणि त्यामुळे तुझी माझ्या मनात इमेज खराब होईल, किंवा मी तुझ्याशी तुटक वागेल, असं नाही होणार. असं तुसुद्धा करू नये असं मला वाटतं. 
आज कित्येक दिवसांनी स्नेहल, तुझ्या सोबतीने मी खूप एन्जॉय केलंय. एक मित्र म्हणून. मी जितकं आज मोकळं झालोय, तितक कधी होईल की नाही, शंकाच आहे. 
त्यामुळे थँक्स. खूप खूप थँक्स. एक इतकी जवळची मैत्रीण मी इतके दिवस ओळखू शकलो नाही, याचंच मला आश्चर्य वाटतय."
"मनू..." स्नेहलने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.
"प्लिज, आता मला जेवायला वाढशील? कारण मी आता न जेवता घरी गेलो ना, ती बिर्याणी आपल्याला शाप देईन ग. आणि डोन्ट वरी, एव्हरीथिंग इज फाईन. विसर आता."
"थांब, लगेच वाढते." तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.
दोघेही जेवायला बसले. स्नेहलने मनूला वाढलं. मनू जेवण करू लागला.
"अप्रतिम झालंय सगळं स्नेहल... वाह!!!" मनू म्हणाला.
"थँक्स."
जेवताना ते कितीतरी वेळ गप्पा मारत होते, गणतीच नव्हती.
मनू जायला निघाला. 
स्नेहल त्याला दारापर्यंत सोडायला आली.
"सॉरी अगेन." ती म्हणाली.
"थँक्स अगेन" तो म्हणाला आणि बाहेर निघाला. 
थोडी पावले चालून तो परत आला... 
"...आणि परु आणि माझं नातं आता कुठे जाईल माहिती नाही. पण स्नेहल, तू कधीही परु आता नाहीये म्हणून परुची ऑप्शन म्हणून माझ्या आयुष्यात यावं असं मला वाटणार नाही."
स्नेहल हसली.
"...आणि डोन्ट वरी, मी नात्यांमध्ये इतकी पोळलीये, की आता मनूने स्नेहलवर जीवापाड प्रेम केलं, तरीही मी सगळ्या बाजूनी विचार करूनच ठरवेन, की मनूला स्वीकारायचं की नाही." ती म्हणाली.
"दॅटस माय सीईओ. गुड नाईट" मनू हसला, आणि तो निघून गेला.
दूर जाणाऱ्या मनूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघतच राहिली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम... खूपच सुंदर झाला आहे हा भाग. स्नेहलच्या बाबतीत जे घडलं ते वाचून वाईट वाटलं. रित्विक माझ्या मुलाच सुद्धा नाव आहे म्हणून जास्तच.

अप्रतिम..… शक्यतो दोन समदुखी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातला जिव्हाळा अधिक तीव्र होतो... इकडे त्यांच्या मनावरील स्वतःची बंधने पाहून बरं वाटलं.... पुढील भागाची उत्कंठा मात्र वाढीस लागली आहे...

अप्रतिम झालाय हा ही भाग..मनूच हे रूप पाहून अजुनच पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागलीय.. स्नेहलचा भूतकाळ वाचून वाईट वाटलं..

निशब्द...
काय बोलावं नाहीये सुचत. एखादी नितांतसुंदर प्रेमकथा तिथेच बसून बघतेय असं झालंय. वातावरणनिर्मिती, दोघांचा भूतकाळ, उत्कटता, भावविवशता, समजूतदारपणा आणि तरीही भविष्य सुंदर असण्याची भावना, आणि सगळं किती सहज आणि शांततेत घडतंय! गाणी तर अगदी या भागासाठीच लिहिली गेलीत अशी वापरलीत. अमोल पालेकर, कबीर सिंग, सगळंच अगदी एखाद्या क्लासिक चित्रपटाचा परमोच्च बिंदू असावा असं...
संपूर्ण एक भाग फक्त मनू, स्नेहल आणि तिचं घर! मात्र या भागात किती गणिते सहज सोडवलीत!
मी कथेत गुंतले होते, पण आता ही कथा माझ्या मनात घर करून बसलीये, आणि आता मला स्नेहल इतर कुणापेक्षाही जास्त आवडतेय, भलेही नायिका पर्वणी असू दे.
तयार असेल तर पुढचा भाग लगेच टाक प्लिज! नसेल, तर लवकर लिही आणि टाक.
एकच सांगते, कथा आता खूप खूप उंचीवर पोहोचलीये, प्लिज शेवटही अशाच उंचीवर कर...

हा भाग टाकून एका कामात गढलो. आता जस्ट बघितलं तर सात प्रतिसाद बघून जरा शॉकच झालो. Happy
@ रुपालीजी - धन्यवाद. छान आहे तुमच्या मुलाचं नाव (पण आता मी ते कथेत बदलतोय, कारण ते या अनुषंगाने यायला नको.) Happy तुमचे प्रतिसाद नेहमी हुरूप वाढवतात.
@तुषारजी - धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आवडला.
@अजय - धन्यवाद. Happy स्टे ट्यून
@महाश्वेता - एवढं लिहून तू मलाच निशब्द केलंय. Happy
एकच सांगतो, हा भाग एका रात्री एकटाकी टाईप केला. Lol
लिहिताना जे सहज वाटलं ते लिहिलं.
धन्यवाद.
@स्वाती२ - धन्यवाद Happy
@नौटंकी - खूप खूप धन्यवाद Happy
@cuty - धन्यवाद Happy

अज्ञातवासी तुम्ही नाव नाही बदललं असतं तरी चाललं असतं. मी सहज सांगितलं. माझी काही हरकत नव्हती नावाबद्दल.

तसं काही नाही, पण म्हटलं नाव बदललं तरी काही फरक पडणार नाही कथेत, पण ते थोडं दुःखी अनुषंगाने आलंय, म्हणून मलाच बदलणं ठिक वाटलं.
आणि रित्त्विक नाव आता एखाद्या छानश्या कथेसाठी राखून ठेऊयात... Happy

Wow, एकदम जबरदस्त भाग झाला आहे.
एकदम हार्ट टाचिंग लिखाण आहे आपले.
पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.
"दोन चांगल्या व्यक्ती एक चांगले आयुष्य उभारतीलच असे नाही" एकदम हार्ट टाचिंग.

सुंदर....जेवढे अंदाज लावते आहे ते सगळे फोल ठरत आहेत. मनू आणि स्नेहल दोघे हि एकत्र येणार असं वाटत होत पण मनु ने म्हटलेलं
"...आणि परु आणि माझं नातं आता कुठे जाईल माहिती नाही. पण स्नेहल, तू कधीही परु आता नाहीये म्हणून परुची ऑप्शन म्हणून माझ्या आयुष्यात यावं असं मला वाटणार नाही."
मस्तच.....

वेलकम बॅक महाश्वेता... अज्ञातवासीच्या या कथेचं कौतुक करायला तुम्ही परत येणार अशी अपेक्षा होतीच.

@उदयगिरी - धन्यवाद. Happy तुमचा प्रतिसाद बघून छान वाटलं.
@प्रीतम - धन्यवाद. अजूनही कथा चालू आहे, अजूनही ट्विस्टस असतील. Happy
@च्रप्स - धन्यवाद Happy
@धनवन्ती - धन्यवाद. शनिवारी नक्कीच पुढचा भाग येईन.
@Snehalata - खूप खूप धन्यवाद.

मनुच पर्वणीविषयीच प्रेम, स्नेहासोबत राखलेली मर्यादा, स्नेहाचा भूतकाळ सारंकाही एकाच भागात खूपच सुंदर शब्दांत गुंफलय.. भावनिकरित्या गुंतत चाललीये कथेत.. पुभाप्र!

खूपच छान
रच्याकने तुम्ही सुद्धा मनकवडे आहात का,अमोल पालेकर च गाणं वाचल्यावर जे गाणं डोक्यात आलं पटकन, पुढे वाचले तर तेच गाणं Happy

गुंतागुंत वाढवायला, स्नेहल आणि हेमल नवरा बायको दाखवू शकतोस.
Biggrin छान झालाय हा ही भाग. सलग लिंक राहीली आहे. पुभाप्र

पाफा + 1 - आणि स्नेहल मुळे हेमल ची अशी अवस्था झाली हे ऍड केले तर अजून खतरनाक गुंतागुंत...

@आदू - मनकवडा नाही, पण या कथेत आलेली तीनही गाणी माझी टॉप ३ फेवरीट गाणी आहेत. Happy धन्यवाद.
अमोल पालेकरचे चित्रपट आयुष्याच्या अधिक जवळ जाणारे असतात, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी फॅन आहे त्यांच्या काही चित्रपटांचा
@मन्या - धन्यवाद
@प्रवीणजी - धन्यवाद
@पाफा - अजून कथा सुरू आहे Lol , काहीही होऊ शकतं धन्यवाद Happy
@च्रप्स - अजून कथा सुरू आहे Lol , काहीही होऊ शकतं धन्यवाद Happy
@मी अस्मिता - धन्यवाद. लवकरच पूर्ण करेन.

अप्रतिम चालली आहे, मनू आणि पर्वणी चे मनातले कंगोरे खूपच सुक्ष्म शब्दबद्ध केलेत. या दोघांमध्ये मन असं गुंतवलंय तुम्ही अज्ञात की कथा संपल्यावर एक रिक्तता येईल. प्रत्येक भाग आधी च्या भागापेक्षा वरचढ आहे.

धन्यवाद प्रज्ञा, तुमच्या या अतिशय सुंदर प्रतिसादाबद्दल.
खरं सांगायला गेलं, की ही कथा संपल्यावर मलासुद्धा थोडे दिवस रिक्तता येईलच. कारण माझ्याकडील मनू, पर्वणी, स्नेहल, हेमल हे पुन्हा कधीच कुठल्या कथेत येणार नाही, याची मला जाणीव आहे. त्यांचं आयुष्य कथेबरोबरच संपेन, ही जाणीवच बोचरी असते.
धन्यवाद किल्ली, लेट्स होप फॉर द बेस्ट!!! Happy

Pages