बंद कळ्यांचे फूल होण्या…

बंद कळ्यांचे फूल होण्या…

Submitted by Asu on 19 June, 2020 - 00:55

बंद कळ्यांचे फूल होण्या…

बंद कळ्यांचे फूल होण्या
पोषक स्थिती निर्माण करा
त्यांचे त्यांना स्वतः फुलू द्या
फुलता पाहणे आनंद खरा

अनेक फुले बागेत फुलती
नाजूक सुंदर कुणी छोटेसे
गेंदेदार कुणी एक एकटे
कुणी टपोरे दिसे मोठेसे

रंग वेगळे, गंध वेगळे
निसर्गात वैविध्य किती
लोभस सुंदर परि सगळे
अजब असे ही निर्मिती

कुठे फुलावे, कसे फुलावे
त्यांचे त्यांनाच ठरवू द्या
असंख्य बागा जगी असती
त्यांचे त्यांना उमलू द्या

Subscribe to RSS - बंद कळ्यांचे फूल होण्या…