बंद कळ्यांचे फूल होण्या…

Submitted by Asu on 19 June, 2020 - 00:55

बंद कळ्यांचे फूल होण्या…

बंद कळ्यांचे फूल होण्या
पोषक स्थिती निर्माण करा
त्यांचे त्यांना स्वतः फुलू द्या
फुलता पाहणे आनंद खरा

अनेक फुले बागेत फुलती
नाजूक सुंदर कुणी छोटेसे
गेंदेदार कुणी एक एकटे
कुणी टपोरे दिसे मोठेसे

रंग वेगळे, गंध वेगळे
निसर्गात वैविध्य किती
लोभस सुंदर परि सगळे
अजब असे ही निर्मिती

कुठे फुलावे, कसे फुलावे
त्यांचे त्यांनाच ठरवू द्या
असंख्य बागा जगी असती
त्यांचे त्यांना उमलू द्या

माळी तुम्ही, बाग तुमची
फूल पोसणे तुमचे काम
मालक ना तुम्ही फुलांचे
विश्वस्त म्हणून तुमचे नाम

आशाअपेक्षा स्वप्ने तुमची
नका लादू या मुलांवरी
त्यांचे जगणे त्यांची स्वप्ने
पाहू द्या त्यांना त्यांचेपरि

मालक नाही मित्र होऊनि
संवाद साधा पाल्यांशी
गुण उजळून गंध पसरतील
खात्री असू द्या मनाशी

बळजबरीने फूल फुलविता
पाकळी मोडेल नाजुकशी
गंध पाकळी विखरून जाता
फूल राहील ना हाताशी

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

मिटता पापण्या दिसते मज स्वप्न काही. इवल्याश्या घरट्यात तू आणि मी बाकी कोणीच नाही. डोळ्यात तुझ्या ग हरवून का मी गेलो? हे स्वप्न आहे माझे हे विसरून का मी गेलो? उघड्या डोळ्यांनीहि भास तुझा जाणवला. दिसता मज तू जीव हा वेडावला.

मिटता पापण्या दिसते मज स्वप्न काही. इवल्याश्या घरट्यात तू आणि मी बाकी कोणीच नाही. डोळ्यात तुझ्या ग हरवून का मी गेलो? हे स्वप्न आहे माझे हे विसरून का मी गेलो? उघड्या डोळ्यांनीहि भास तुझा जाणवला. दिसता मज तू जीव हा वेडावला.

Submitted by sb sardar on 19 June, 2020 - 09:44
सर, आपण दिलेला हा अभिप्राय माझ्या 'बंद कळ्यांचे फूल होण्या…' या कवितेवर चुकून तर दिला नाही?

अतिशय सुरेख आणि आशयसंपन्न रचना! Happy

@sb sardar, सुंदर प्रतिसाद.. Happy

@असु काका, महाभारताची शल्यचिकित्सा कधी पोस्ट करणार? वाट पाहत आहे.. Happy