संकल्प लढण्याचा
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
शपथ असे भारतीयांना
ना विसरू त्यां शूरवीरांना
सांडले रक्त ज्या मर्दांनी
गलवान घाटीत लढतांना
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
भितो ना फुत्कारांना
ड्रॅगनच्या दुष्ट चालींना
ठोशास त्यां ठोसा देऊ
रक्तथेंबांचा बदला घेऊ
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
सीमेवर जवान लढती
देशासाठी शहीद होती
निःशस्त्र ना सर्व जनता
स्वावलंबन सुदर्शन हाती
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
देशभक्ती ना दुसरी काही
आत्मनिर्भर बांधवा होई
धिःक्कार करू चिन्यांचा
बहिष्कार अन् चिनी वस्तूंचा
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
हा क्रूर घातकी शेजारी
रक्तपिपासू असे आजारी
जमिनीस हा सदा भुकेला
निर्दय निष्ठुर जगी एकला
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
नाही विसरलो आम्ही
अक्साई चीनचा लचका
जखम ती भळभळती
करी मनात सदैव विचका
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
झडप जरी ड्रॅगनची
गिळण्या गलवान घाटी
देऊ त्यांना तिथेच माती
आमच्या प्रिय देशासाठी
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
शेजार जरी श्वापदांचा
लांडगे लागले पाठी
करू शिकार दुष्टांची
या पवित्र भूमातेसाठी
संकल्प करु लढण्याचा, ड्रॅगन चिनी ठेचण्याचा
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.17.06.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita