Submitted by Asu on 10 July, 2020 - 11:15
चुकते कोण?
नियम पाळून थकले सारे
अंगी आली बेफिकिरी
आयुष्यावर सोडून पाणी
नंगे होऊन करी फकिरी
कधी लॉक कधी अनलॉक
बातम्यांचा टीव्ही वर शॉक
गोंधळ माजला सर्व देशात
सीमेवर चीनपाक्यांचा धाक
जगण्या ना कुणा शाश्वती
मरणाची पण पक्की भीती
जग उद्याचे पाहिले कुणी
वर्तमानात जगू हीच नीती
मरायचे जर कधी एकदा
मस्त खाऊन पिऊन मरू
मरण भीती अजून कीती
मरणाला ना आम्ही घाबरू
जगी सर्वत्र जर हीच रीत
कोण कुणा किती सावरे?
संयमबंध फुटता जगभर
बेफिकीरी मन कशी आवरे!
राहिले ना हातात काही़
प्रवाह जनांचा भरकटला
आता शहाणा वेडा ठरला
टाहो फोडून फोडून थकला
बेफिकिरी ही नेणार कुठे
कुणा मानवा ठाऊक नाही
घरात बसून विचार करतो
चुकते का माझेच काही?
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा