Submitted by Asu on 6 July, 2020 - 01:27
सध्या रिमझिम पाऊस पडत असता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कविवर्य पी.सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील) यांच्या 'रिमझिम पाऊस पडे' या कवितेचे मी केलेले विडंबन, त्यांची क्षमा मागून-
लाखलाखांनी वाढे
लाखलाखांनी वाढे सारखा
मृत्युलाही अति जोर चढे
कोरोनाकोरोना चहूकडे
गेला मोहन कुणीकडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
तरुण बाधित, बाधित सगळी
मुलेबाळेही बाधित झाली
रुग्णवाहिका येता गल्ली
दचकून माझा उर उडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
हाकही मारता मदत म्हणुनी
विरून गेली दाही दिशांनी
खुणाविता कर उंचावुनी
दाहक दग्ध नजर पडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
आयुष्याच्या भव्य दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
जगती जन धीर धरुनी
नजर लावुनी तुझ्याकडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.06.07.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा