खडे जे संभ्रमांचे क्रूर नियती टाकते आहे
तुझ्या डोळ्यातले प्रतिबिंब माझे हालते आहे
तुझ्या शहरात असणे हा सुगंधी सोहळा असतो
तुझ्या श्वासांमुळे जिथली हवा गंधाळते आहे
हवेने ऐन रणरणत्या दुपारी रोख बदलावा
तसे भाग्यात आले सौख्य लहरी वागते आहे
तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे
परत धाडायचे होतेच तर का मारल्या हाका ?
किनाऱ्याला धडकली लाट उत्तर मागते आहे
जरी अंधारले आहे, पुन्हा उगवेल नेमाने
भरवश्यावर जिवाची म्लान पणती तेवते आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
धर्मसंकट
``हे बघ मध्या, तुला माझी सगळीच परिस्थिती माहिती आहे. माझ्या मुली जवळ जवळ तिशीला आलेल्या आहेत रे. पण पैशामुळे त्यांच्या लग्नाचं मला काहीच बघता येत नाहीये. या डिसेंबरला माझी पॉलिसी संपतेय. माझा अपघाती मृत्यू झाला असता तर माझ्या कुटुंबाला एक कोटी रुपये मिळाले असते आणि नैसर्गिक झाला असता तर पन्नास लाख. कोटी जाऊ दे, पन्नास लाखही जाऊ दे. निदान पंचवीस लाख मला मिळवून दे. मला दोन्ही मुलींची लग्न लावून देता येतील रे.`` सुधाकर काकुळतीने मला म्हणत होता.
बोललो नाही जरी मी बोलते माझी गझल
भावना माझ्या मनीच्या जाणते माझी गझल.
रोज जे येते न चुकता त्रास मजला द्यावया
दु:ख ते माझ्या वतीने सोसते माझी गझल.
दु:खभरल्या लोचनांनी पाहती जे जे मला
वेदना त्यांच्या उरीच्या वाचते माझी गझल.
साचते नैराश्य जेव्हा काळजाच्या भोवती
दीप बनुनी काळजाशी तेवते माझी गझल.
दीडदमडी च्या प्रथांची बंधने तोडून दे
वाग तू मर्जी प्रमाणे सांगते माझी गझल.
वाट कवितेची तशी खडकाळ आहे काहिशी
गालिचे वाटेवरी त्या घालते माझी गझल.
`गिल्ट!`
``प्रिय सुषमा,
आपल्या शेवटच्या भेटीमध्ये आपल्या पुनर्भेटीसाठी आपण जो नियम किंवा अट ठेवली होती ती माझ्याकडे पूर्ण झाली आहे. तुझा याबाबतचा मेल नाही त्याअर्थी तुझ्याकडे ती पूर्ण झालेली नाही हे उघडच आहे. अर्थात यात मनापासून आनंदच आहे आणि परिस्थिती तशीच राहावी ही प्रार्थनाही! तरी माझ्याकडची बातमी तुला कळावी म्हणून ही मेल तुला पाठवत आहे.
तुझाच सुभाष!``
मी मेल पूर्ण केला आणि सेंड केला.
शब्दांचे जादूगार
रानोमाळी फिरून केले
शब्दफुले कितीक गोळा
तालाच्या लयीत गुंफल्या
शब्दफुलांच्या सुंदर माळा
सरस्वतीचे माळी आम्ही
शब्दांचा आम्हास लळा
रात्रंदिवस शब्द उगवतो
काव्याचा फुलवितो मळा
ठुमकत हासत नाचत या
गोपिका शब्दांच्या येती
फेर धरुनी रास खेळती
कृष्णासम आशयाभवती
फुले म्हणा वा गोपिका
शब्दांचीच जादू सगळी
शब्द शब्द मनात फिरती
शब्दांची दुनिया आगळी
रिया-राणावत
कोण रिया, सुशांत प्रिया!
कोण कंगना राणावत?
भारतासम महान देशी
अस्तित्व त्यांचे कणागत
राईचा मिळून पर्वत करती
माध्यमे आपली अति महान
रोज दळण दळून ठरविती
कोण मोठा कोण लहान
प्रश्न त्यांचे अति वैयक्तिक
सोडवतील यंत्रणा संयुक्तिक
न्यायालयाचा न्याय निर्विवाद
उगाच चर्चा वादविवाद!
प्रश्न जगण्याचे झाले लहान
रिया राणावत त्याहून महान
घर का की घाट का?
ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटं अधिक होऊन गेली होती. मनात ठाम विश्वास असूनही हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. इतक्यात माझ्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. मेसेज उघडला. जी भीती मला वाटत होती ती खरी ठरलेली होती.
मेसेज तृप्तीचाच होता.
``प्रिय प्रशांत, मी खूप खूप विचार केला. माझा भरलेला संसार सोडून मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. सचिन श्यामळू आहे, अगदी साधा आहे, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज मला विसरून जा. मी उद्यापासून जिमला येणार नाही. इथून पुढे आपण कोणताच संपर्क ठेवायला नको. बाय!``
बारावीचा निकाल लागला. पदरात पडलेल्या मार्कांवरुन आपल्यासाठी मेडीकल इंजिनेरींगची दारं धाडकन बंद झाल्याची जाणीव लगेच झाली. तसही अकरावी बारावी वाह्यातपणा करण्यातच घालवलं होतं म्हणा, त्यामुळे घरच्यांचं बोलणं खाली मान घालुन दोन्ही कानांनी ऐकुन घेतलं आणि कोणालाही दोष न देता निमुटपणे गावातल्याच कॉलेजमध्ये बीएस्सीला प्रवेश घेतला. आमचं तालुक्याचं गाव, पण शिक्षणाच्या सगळ्या सुविधा असल्याने शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थांनी गाव नेहमी गजबजलेलं असायचं.
आमचे दास काका आणि दास भाभी
माझ्या वयाच्या दहा-पंधरा वर्षांपर्यंतचा काळ अदभूत होता. आमच्या कॉलनीतील कुठल्याही घराचा दरवाजा दिवसभर उघडाच असायचा. आमच्यापैकी कुणीही कुणाच्याही घरात (बेल वाजवणं, आत येऊ का? वगैरे विचारणं न करता) थेट स्वयंपाकघरापर्यंत शिरू शकत होतं. आम्ही मुलंच नाही, तर कॉलनीतील महिलावर्गही असाच थेट कोणत्याही घरात अगदी आतपर्यंत शिरू शकत होता.