शब्दांचे जादूगार
Submitted by Asu on 10 September, 2020 - 23:18
शब्दांचे जादूगार
रानोमाळी फिरून केले
शब्दफुले कितीक गोळा
तालाच्या लयीत गुंफल्या
शब्दफुलांच्या सुंदर माळा
सरस्वतीचे माळी आम्ही
शब्दांचा आम्हास लळा
रात्रंदिवस शब्द उगवतो
काव्याचा फुलवितो मळा
ठुमकत हासत नाचत या
गोपिका शब्दांच्या येती
फेर धरुनी रास खेळती
कृष्णासम आशयाभवती
फुले म्हणा वा गोपिका
शब्दांचीच जादू सगळी
शब्द शब्द मनात फिरती
शब्दांची दुनिया आगळी
शब्दखुणा: