साहित्य
©अज्ञातवासी! - भाग २ - प्रवेश
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!
©अज्ञातवासी! - आरंभ
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!
प्रिय मिनूस: माझे करोना (रड)गाणे
धडधड.....
धडधड....
- महेश मोरे (स्वच्छंदी)
सांगुनी हलकेच काही जायची धडधड
बस् नजर भेटायची अन् व्हायची धडधड
एवढा अभ्यास होता मी तुझा केला
फक्त स्पर्शातूनही समजायची धडधड
जवळ तू असलीस की सगळेच नॉर्मल अन्
दूर तू गेलीस की थांबायची धडधड
जाणुनी जर घ्यायची आई असेलच तर
एकदा केवळ तिची ऐकायची धडधड
ध्यास इतका घेतला होता तिचा मी की
फक्त आठवली तरी वाढायची धडधड
नाव सहजच घ्यायची माझे सखी तिकडे
आणि इकडे नेमकी वाढायची धडधड
बांद्रा वेस्ट - ५
रॉड्रीक आणि मॉन्ट्या तातडीने बांद्रा स्टेशनला पोहोचले. बांद्रा स्टेशनची दिमाखदार इमारत नजरेत भरत होती. मुळची गॉथिक स्टाईलने बांधलेली इमारत तिचे वेगळेपण सिद्ध करत होती. प्रवाशांची इकडुन तिकडे धावपळ चालली होती. रस्त्याच्या कडेने बसलेल्या असंख्य फेरीवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापला होता. ते आपापल्या सामानाची विक्री करण्यासाठी चित्रविचित्र आवाज काढुन गिर्हाइकांचं लक्ष वेधुन घेत होते. बाजूला पोलिसांची एक गाडी उभी होती . त्याच्या बाजूला दोन पोलिस उभे होते . काल रात्री ज्याने आपल्याला हटकलं तो पोलिस मामा ह्यांच्यात नाही ना ? रॉड्रिक त्यांच्याकडे निरखून पाहू लागला .
तू
तू
केवढे नजरेत एका सांगुनी गेलीस तू!
पैज शब्दांशी अशी का लावली होतीस तू?
नेहमीचे ते बहाणे द्यायचे होते तुला.
का तुझे मधुकोष ओठी घेउनी आलीस तू?
'विसर ते सारेच आता' सांगुनी गेलीस ना!
का पुन्हा खिडकीत माझ्या चांदणे झालीस तू?
सोडुनी अर्ध्यावरी जर जायचे होते तुला.
का स्मृतींचे दंश माझ्या बांधले गाठीस तू?
चिंब ओल्या त्या क्षणी लाजायचे होते तुला.
का सरी मग श्रावणाच्या आणल्या भेटीस तू?
चंद्रमौळी या घरीही सौख्य तू केले सुखी.
हेच का जे सांजवेळी मागते तुळशीस तू?
- समीर.
बांद्रा वेस्ट – ४
बांद्रा वेस्ट –४
” रॉडी, आपल्याला काही माहीती लागेल… ती तु नीट आठवुन सांग. ” मॉन्ट्या एखाद्या इन्व्हेस्टीगेटींग ऑफिसरसारखा बोलु लागला. त्याच्यातला मेकॅनिकची जागा आता डिटेक्टीवने घेतली. ही असली कामं करायला त्याला फार आवडायची . त्याचं पुर्वीपासुनचं गॅरेज नसतं तर तो कुणीतरी प्रायवेट डिटेक्टीव्हच व्हायचा.
” ती दहा रुपयांची नोट जनरली कशी होती …? “
” कशी होती म्हणजे ? नोटेसारखी नोट दुसरं काय…? ” रॉड्रीक त्याला काही सिरीयसली घेत नव्हता, मुळात गेलेली ती नोट परत मिळेल यावर त्याचं व्यवहारी मन विश्वास ठेवायला तयार नव्हतं.
बांद्रा वेस्ट -३
" बार, बार दिन ये आए... बार बार दिल ये गाए..... तु जिये हजारो साल.... हे बड्डे बॉय .... काय झाला ...? मुड का गेलाय? " माँट्या त्याला विचारत होता , पण रॉड्रीकने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. तो तसाच डोकं धरुन बसला होता. माँट्याने आजुबाजुला पाहीलं , चार - पाच कागद पसरलेले. एक मळकं एन्व्हलप त्याच्या बाजुला पडलेलं , रॉड्रीकचं वॉलेट त्याच्या समोर होतं . त्यातले सगळे पैसे, व्हिजीटींग कार्डस्, कागदाच्या चिटोऱ्या समोरच्या टिपॉयवर पसरलेल्या ... ह्या सर्वांच्या मधे रॉड्रीक दोन्ही हातांनी आपलं डोकं धरुन बसला होता.
बांद्रा वेस्ट २
” एलिना…. यु आर माय स्विटी पाय… “
” या … आय नो…. पण तु आज माझ्यासाठी काय आणलंस…? ”
” व्हाय ? आय मिन … माय हार्ट इज युअर्स…. ”
” स्टॉप फ्लर्टिंग… स्टॉप धीस नॉनसेंस… “
” मग ? काय झालं ? आज काय स्पेशल आहे…?
” यु फॉरगॉट नो… डोंट टॉक टु मी …. ”
” अरे यार….! काय झालं सांग ना…. प्लीज… “