©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!
"आपल्या घरात मॅकबेथसारख्या तीन हडळी होत्या माहितीये."
"मलातर दोनच माहितीयेत, काकू आणि मोठ्या ताई."
"तिसरीही होती. सगळ्यात मोठी हडळ."
"मग ती कुठे गेली?"
"अग ये, मोठ्याने काय ओरडतेस. त्या हडळीचं नाव घ्यायलाही घरात बंदी आहे."
फिदीफिदी!!!!
-----------------
वाडा खूप मोठा आहे. खूप मोठा.
अनेक खोल्या, दगडी बांधकामाच्या, कातळात कोरलेल्या दिसणाऱ्या.
सध्याचे दहा बंगले बसतील इतका मोठा.
दुमजली. सगळं गाव येऊन राहिलं, तरीही वाडा रिकामा राहील इतका मोठा.
पण तरीही वाडा कधी रिकामा राहिलाच नाही.
------------------
एवढी मधली मोकळी जागा, शंभर लोक सहज बसतील. तरी गर्दी मावायची नाही.
तुळशीवृन्दावन, आणि त्याच्यासमोरच ती भलीमोठी खुर्ची.
राजाचीच...
तिचा दरारा फार मोठा, आणि त्या खुर्चीवर बसणारी माणसही तितकीच मोठी.
आमदार, खासदार काय, मंत्रीसुद्धा खुर्चीपुढे झुकले.
अस्सल सागवानात कोरलेली, सिंहमुखी भुजा असलेली, आणि पायावर नागमुख असलेली.
वाडा हलला, खुर्ची कधी हलली नाही.
------------------
खुर्चीसमोरच आज ते प्रेत पडलं होतं.
निश्चल, नाकात कापूस घालून पडलेलं. पांढऱ्या कपड्यात फुलांनी सजवलेलं, बांधलेलं.
हुंदके तर बरेच ऐकू येत होते, आणि बऱ्याच ठिकाणी सुन्नता.
काही त्या परिस्थितीतून बाहेर पडून परिस्थिती सांभाळायचा प्रयत्न करत होते.
वाडा आज जरा जास्तच भरला होता.
'ये बाजू व्हा रे, बाजू, बाजू.' कल्लोळ झाला. चार पाच बंदूकधारी आले, आणि त्यांच्यामधून एक खादीधारी...
'मंत्रीसाहेब!!' अधूनमधून कुजबुज. बरीचशी अभिमानाने, बरीचशी असूयेने.
"शेलारसाहेब, पोरकं करून गेलात."
मंत्र्यांचे मोजके दोन शब्द. पायांना स्पर्श, डोळ्यात नसलेलं पाणी पुसणं, एक भलामोठा हार प्रेतावर.
नेहमीची रंगीत तालीम जोमात...
"साहेब आपण आलात बरं वाटलं. हुरूप आला." एक शोकाकुल.
"काळजी घ्या, आम्ही आहोत.''
खांद्यावर हात. त्यानंतर सगळ्यांना हात जोडून नमस्कार.
रंगीत तालीम समाप्त.
-------------------
रात्रीची वेळ.
"संग्रामराव, प्रेत आजची रात्र ठेवणार?"
"ठेवावं लागेल. बर्फात."
"अहो, तो जाऊन बसलाय अमिरीकेत... कुठला येतोय तो उद्यापावत."
"सकाळी दहाला आला नाही, तर करून टाकू कार्यक्रम. लोकांना काही वाटायला नको."
"काय वाटणार? त्याला कुणी ओळखत का? फक्त पोरगं आहे, म्हणून हे कौतुक."
"पवन्या, जास्त शेफारु नको. तो कुणीही नसू दे, राजशेखर शेलाराचा पोरगा आहे, हेच त्याच्यासाठी जगातलं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन!"
"म्हणजे खुर्चीवर तोच बसणार की काय?" पवन्याचा डोळा बारीक, गालात हसू.
'धाड!!!' बंदुकीचा आवाज.
पवन्याच्या कपाळाच्या मधोमध होल!!!
पवन्या आडवा.
"तो काय, त्याचा बाप आला तरी आता खुर्ची मिळणार नाही."
एका घोटात ग्लास रिकामा.
"भर रे!" आवाजात दम...
...आणि भेसूर होणारी रात्र...
क्रमशः!
सुरुवात खूप छान झालीयं..
सुरुवात खूप छान झालीयं.. अज्ञातवासी.
तुमच्या कथेची वाट पाहत होते त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा लिहिते झालात ह्याचा खूप आनंद झाला.
वेलकम बॅक...
वेलकम बॅक...
मस्तच पकड घेतेय.. दुसरा भाग
मस्तच पकड घेतेय.. दुसरा भाग उद्याच येऊ दे..
व्वा...खुपच भारी...पुढचा भाग
व्वा...खुपच भारी...पुढचा भाग येऊ द्या लवकर..
Welcome back अज्ञात, कथेची
Welcome back अज्ञात, कथेची सुरुवात तर छानच झालीय..
छानच सुरवात.... लवकर पुढचे
छानच सुरवात.... लवकर पुढचे भाग पण येऊ देत......
जबरदस्त.
जबरदस्त.
वेलकम बॅक! पु भा प्र
वेलकम बॅक! पु भा प्र
वेलकम बॅक
वेलकम बॅक
आलास का परत? छान!!!!
आलास का परत? छान!!!!
माझी प्रतिक्रिया राखून ठेवत आहे.
जबरदस्त, पुढचे भाग लवकर येऊ
जबरदस्त, पुढचे भाग लवकर येऊ देत
पुढचा मोठा भाग लवकर येऊ दे
पुढचा मोठा भाग लवकर येऊ दे
नेहमीप्रमाणे वेगवान आणि छान.
नेहमीप्रमाणे वेगवान आणि छान.
पुभाप्र.
खूप छान सुरुवात... पुढचा भाग
खूप छान सुरुवात... पुढचा भाग उद्या येऊ देत...
@रूपालीजी - धन्यवाद! ठरलेल्या
@रूपालीजी - धन्यवाद! ठरलेल्या वेळेप्रमाणे आलो. प्रोत्साहनासाठी धन्यवाद.
@च्रप्स - धन्यवाद!
@श्रवू - धन्यवाद!
@मृणाली - धन्यवाद!
@शब्दसखी - धन्यवाद!
@chashmish - धन्यवाद!
@akshay - धन्यवाद!
@अथेना - धन्यवाद!
@साधा माणूस - धन्यवाद!
@पाफा - धन्यवाद!
@लावण्या - धन्यवाद
@श्रद्धा - धन्यवाद!
@cuty - धन्यवाद!
@pravintherider - धन्यवाद!
पुढचा भाग टाकला आहे.
मस्त
मस्त
अहो, तो जाऊन बसलाय अमिरीकेत..
अहो, तो जाऊन बसलाय अमिरीकेत... कुठला येतोय तो उद्यापावत.">>उद्यापावत शक्यच नाही..आधी कोविड टेस्ट मग २४ तासांनी रिसल्ट आणि त्यानंतर एक्झंप्शन फाॅर्म.. अजून तीन दिवस तरी नाही येत बघा तो
बाय दवे.. भाग आवडला
छान सुरुवात!!
छान सुरुवात!!
@म्हाळसा - ग्रेट ओबसर्वेशन.
@म्हाळसा - ग्रेट ओबसर्वेशन. म्हणून मी पात्र परिचय टाकला आहे. ही कथा २०१८ मध्ये घडतेय. धन्यवाद.
@मेघा - आपण आलात. भरून पावलो. धन्यवाद!
वाचतोय...
वाचतोय...
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद!
@दत्तात्रय साळुंके - धन्यवाद! मीसुद्धा पुन्हा मीच लिहिलेलं वाचतोय परत