बांद्रा वेस्ट - ५

Submitted by मिलिंद महांगडे on 24 October, 2020 - 13:37

रॉड्रीक आणि मॉन्ट्या तातडीने बांद्रा स्टेशनला पोहोचले. बांद्रा स्टेशनची दिमाखदार इमारत नजरेत भरत होती. मुळची गॉथिक स्टाईलने बांधलेली इमारत तिचे वेगळेपण सिद्ध करत होती. प्रवाशांची इकडुन तिकडे धावपळ चालली होती. रस्त्याच्या कडेने बसलेल्या असंख्य फेरीवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापला होता. ते आपापल्या सामानाची विक्री करण्यासाठी चित्रविचित्र आवाज काढुन गिर्हाइकांचं लक्ष वेधुन घेत होते. बाजूला पोलिसांची एक गाडी उभी होती . त्याच्या बाजूला दोन पोलिस उभे होते . काल रात्री ज्याने आपल्याला हटकलं तो पोलिस मामा ह्यांच्यात नाही ना ? रॉड्रिक त्यांच्याकडे निरखून पाहू लागला . नशिबाने त्यांच्यात तो पोलिस नव्हता . नंतर त्याने समोर पाहीलं, स्टेशनच्या बाहेर तीन – चार ठिकाणी रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या ” ए भाय… चलो लिंकींग रोड, लिंकीग रोड… “, ” पाली हिल…. बोलो, पाली हिल… “, ” बँडस्टँड…. बँडस्टँड… ” रिक्षावाले पॅसेंजर लोकांना आवाज देत होते.

” डु वन थिंग… मी ही लाईन बघतो. तु त्या लाईनला विचार . ” रॉड्रीक मॉन्ट्याला म्हणाला. आणि ते दोघेही वेगवेगळ्या दिशेला निघाले.

रॉड्रीक एका रिक्षावाल्याच्या जवळ गेला. तो रिक्षावाल्याला काही विचारणार इतक्यात रिक्षावाल्यानेच भाड्याच्या आशेने त्याला विचारलं . ” बोलो भाय किदर जोनेका है….? “

” बॉस इधर हरी टोपी पेहेनेवाला कोई रिक्षा ड्रायवर है क्या ? ” रॉड्रीकने त्याला विचारलं…

” क्या ? ” त्याला समजेनाच तो काय विचारतोय ते .

” अरे हरी गोल टोपी पहननेवाला रिक्षाड्रायवर है क्या ? “

त्या रिक्षावाल्याला कोण कुठल्या हिरवी टोपी घालणाऱ्या माणसापेक्षा स्वतःचा धंदा महत्वाचा होता .” नय भाय … मालुम नय… ” तो निघुन गेला .

रॉड्रीकने आणखी दोन, चार जणांना त्या हिरव्या टोपीवाल्या रिक्षावाल्याबाबत विचारले. पण कोणीच त्याबाबत माहीती देऊ शकले नाही . तिकडे मॉन्ट्याही विचारुन विचारुन दमला. पण त्यांना हवा असलेला माणुस काही मिळेना. फक्त ‘ हिरवी गोल टोपी ‘ इतक्या जुजबी माहीतीवर तो रिक्षावाला शोधणे हे नक्कीच अवघड काम आहे., याचा ते दोघेही अनुभव घेत होते. शेवटी तीस – चाळीस रिक्षावाल्याकडुन नकार ऐकल्यानंतर ते दोघे वैतागुन बाजुच्याच एका हॉटेलमधे जाऊन बसले.

” अरे छोटु, दो पेप्सी लेना… ” मॉन्ट्याने ऑर्डर दिली.

” व्हॉट द हेल….! आयला कुठे असेल तो च्युत्या ? “ रॉड्रीक भलताच वैतागलेला…

” हा ना यार , कुणालाच माहीत नाय रे. तुझी ती नोट घेऊन पळुन तर गेला नाय ना ? ” मॉन्ट्या गमतीने म्हणाला.

” स्टॉप इट यार… त्याला काय माहीत त्या नोटेचा इंपॉर्टन्स . “

” कुठे असेल ती नोट ? ” दोघेही विचारांच्या गर्तेत असताना हॉटेलचा पोऱ्या पेप्सी घेउन आला. दोघेही निमुटपणे पेप्सी पिऊ लागले. पिता पिता मधेच रॉड्रीक मधेच ओरडला.

” मॉन्ट्या, हाऊ फुल वी आर ! अरे, मी काल रात्री १.३० ला घरी गेलो, म्हणजे तो रिक्षावाला नाईटलाच रिक्षा चालवत असणार. तो कशाला दिवसा येईल रिक्षा चालवायला , राईट…? ” रॉड्रीकने तर्क केला.

” हो रे. बरोबर आहे तुझं. आता आपण इथे एवढ्या रिक्षावाल्यांना विचारलं, पण कुणालाच माहीत नाही. तो कदाचित नाईटलाच येत असेल. आपल्याला रात्री येउन चेक केलं पाहीजे.” मॉन्ट्यालाही ते पटलं. ” पण आता काय करायचं अजुन चार पाच तास आहेत.”

” तु जा गॅरेजवर. बरंच काम पेंडींग असेल. मी तोपर्यंत एलिना ला भेटतो. असंही तिला इव्हीनिंगला भेटायचं प्रॉमिस केलंय. ” रॉड्रीक म्हणाला.

” ओके, किती वाजता येऊया परत …? ” मॉन्ट्याने विचारलं

” १० ओ क्लॉक… मे बी वुई विल हॅव टु स्पेंड व्होल नाईट…! ” रॉड्रीक नकारार्थी मान हलवत म्हणाला.

” डोंट वरी यार, मिळेल तो झिंगुर…! चल मी भेटतो तुला १० वाजता. ” म्हणत मॉन्ट्या निघुन गेला. आता आजुबाजुच्या त्या कोलाहलात रॉड्रीक एकटाच उरला… आजुबाजुला इतकी गर्दी असुनही त्या एकटं एकटं वाटु लागलं. त्याने लगेच एलिनाला फोन लावला…

क्रमशः

https://kathakadambari.com

लडाखचे प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users