Submitted by Sameer Jirankalgikar on 23 October, 2020 - 08:14
तू
केवढे नजरेत एका सांगुनी गेलीस तू!
पैज शब्दांशी अशी का लावली होतीस तू?
नेहमीचे ते बहाणे द्यायचे होते तुला.
का तुझे मधुकोष ओठी घेउनी आलीस तू?
'विसर ते सारेच आता' सांगुनी गेलीस ना!
का पुन्हा खिडकीत माझ्या चांदणे झालीस तू?
सोडुनी अर्ध्यावरी जर जायचे होते तुला.
का स्मृतींचे दंश माझ्या बांधले गाठीस तू?
चिंब ओल्या त्या क्षणी लाजायचे होते तुला.
का सरी मग श्रावणाच्या आणल्या भेटीस तू?
चंद्रमौळी या घरीही सौख्य तू केले सुखी.
हेच का जे सांजवेळी मागते तुळशीस तू?
- समीर.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा