बांद्रा वेस्ट १९
ती दहा रुपयांची नोट रॉड्रिक आणि मॉन्ट्याचा अंत पहात होती . तिच्या मागे धावता धावता त्याला ब्रम्हांड आठवत होतं . त्या नोटेशी त्याचा जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता . आणि तो केव्हा संपेल हे कुणालाच सांगता येणार नव्हतं . त्या नोटेच्या शोधात ते मुंबईच्या अशा चित्र विचित्र ठिकाणी फिरले ज्यांचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता . आत्ताही ते आणखी एका विचित्र ठिकाणी जाणार होते - बारबालेच्या घरी ! मॉन्ट्याने लगेच त्याची बाईक काढली. तो निघणार तेवढ्यात रॉड्रीकचा मोबाईल वाजला.
" हॅलो. "
सकाळी सकाळी देसायांच्या ओसरीवर चहाची बैठक रंगली होती. अण्णा फुरका मारत चहा पित होते. तर विजू सुपाऱ्या फोडत होता. पायरीवर बसून यमी, एकाच कानाने ऐकू येणाऱ्या माईला, तिच्या डाव्या कानांत तोंड खुपसून, साऱ्या घराला ऐकू जाईल अशा सुरांत वर्तमानपत्र वाचून दाखवत होती,
‘...आणि वाजपेयींनी पोखरणमध्ये यशस्वी अणू चाचणी घेतली’
माई त्या बदल्यात तिला अण्णांपासून लपून दर आठवड्याला एक कॅडबरी घेऊन द्यायची, त्यामुळे हे काम यमी भलतंच मन लावून करत असे.
तिला जरासं थांबवत माईने बापूला विचारलं,
‘ही अणू चाचणी म्हणजे काय रे बापू?’
शरलॉक होम्सच्या 'द अॅडव्हेंचर ऑफ द सॉलिटरी सायक्लिस्ट' ह्या गोष्टीवर आधारित हे लिखाण आहे. ह्यात ह्या गोष्टीचे आणि इतर काही मामुली स्पॉयलर्स असण्याची शक्यता आहे, हा इशारा आधीच देऊन ठेवतो.
ह्या गोष्टीत व्हायलेट स्मिथ नावाची सुंदर तरूणी आहे. कामावरून घरी जाताना सुनसान रस्त्यावर तिचा पाठलाग करणारा एक आगंतुक सायकलवाला आहे. दुष्ट ड्रॅगनसारखा एक अक्राळविक्राळ गुंडही आहे, आणि 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती' म्हणणारे आपले व्हाईट नाईट्स शरलॉक आणि वॉटसन आहेत. डेमझल इन डीस्ट्रेसचं हे शरलॉक कथेतलं रूपांतर एकदम झकास जमलंय.
‘ ट्रींsssग ... ट्रींsssग....’ बराच वेळ मोबाईल वाजत राहीला. दोघेही दमल्यामुळे मेल्यासारखे झोपले होते. पुन्हा ‘ ट्रींsssग ... ट्रींsssग....’ रॉड्रीक झोपेतुन उठुन डोळे बारीक करत इकडे तिकडे बघु लागला. त्याला आधी समजलंच नाही की तो कुठे आहे.? मग त्याच्या हळुहळु लक्षात आलं की त्याचा मोबाईल वाजतोय. पण तो कुठे आहे ते त्याला समजेना. त्याने कसाबसा तो शोधला. एलीनाचा कॉल होता.
" हॅलो जानु .... हाऊ आर यु? "
" रॉडी .... किती वेळ मी फोन ट्राय करतेय ? आणि तु अजुन झोपेतच आहेस? " पलीकडुन तिचा चिडका स्वर आला.
" सॉरी यार... काल झोपायला उशीर झाला. तु बोल ना. "
"शल्य"!!
__________________________________________
" छोटेसे बहीण भाऊ ...उद्याला मोठाले होऊ!
उद्याच्या जगाला.. उद्याच्या युगाला... नविन आकार देऊ!
छोटेसे बहीण भाऊ...!!" तपस्या आज शाळेत शिकविलेली कविता आपल्या दादाबरोबर गोड आवाजात म्हणत होती.
"ए दादा ! मला पण ती पारंबी दे ना.!. मला पण झोका घ्यायचा आहे".
" नको सोनु .. तु पडशील.. मग आई मला ओरडेल. !"
" दे ना... दे ना रे दादा!"
" चल सोनु .. आपण तळ्याजवळ जाऊया!"
" हा... चल ... दादा!"
" दादा.. ती कमळाची फुले किती छान दिसतात ना तळ्यात!! मला देशील का आणून?"
बांद्रा वेस्ट- १७
रॉड्रीक आणि मॉन्ट्या घरी आले तेव्हा रात्रीचे साडे तीन वाजून गेले होते .
“ रॉडी हे काय आहे बाबा ? कसा काय झाला हे ? काय बोललास त्याला ? कसली जादूची कांडी फिरवलीस ? ” मॉन्ट्या अविश्वासाने त्याच्याकडे पाहतच राहिला . कारण एवढं सगळं झाल्यावरही त्यांना घरी जायची परवानगी त्या क्रूर इन्स्पेक्टर जामसंडेने दिली होती . आणि ह्याचंच कोडं मॉन्ट्याला पडलं होतं .
“ फक्त तीन दिवस , त्यानंतर जर सगळं व्यवस्थित झालं तर आपण सुटू शकू . ” रॉड्रीक हताशपणे बोलत होता .
“ तीन दिवस , म्हणजे ? मला नाय कल्ला . ”
दिवाळी चार दिवसावर आली तशी आयाबायांची लगबग सुरु झाली. भांडी घासुन घासुन आरशागत चकचकीत केली जात होती, अडगळीतल्या वस्तु पुसुन पुन्हा त्याच जागी ठेवल्या जाऊ लागल्या, त्या आता पुढच्या दिवाळीलाच पुन्हा बाहेर येणार होत्या. मनाने कधीच माहेरला पोहचलेल्या सासुरवाशिनींचं सगळं लक्ष आता मुऱ्हाळी कधी येतो याकडेच लागुन होतं तर सासवांना सुनबाई माहेरला जाण्याआधी दिवाळीची सगळी कामं कशी होतील याची काळजी लागुन राहिली होती.. त्यांची लेक दिवाळीला येईल तेव्हा सगळं टापटीप नको का असायला? गडीमाणसंपण दिवाळी आहे म्हणुन आपल्यापरीने कामाला हातभार लावत होती.
बांद्रा वेस्ट- १६ Bandra West- 16
रॉड्रिक आणि मॉन्ट्या कसेबसे उभे राहिले . अंगात काहीच त्राण शिल्लक नव्हतं . खाली पडलेली गाडी उचलायचं भानही त्यांना राहिलं नाही . दोघांचेही पाय लटपटत होते. सगळं अंग घामाने भिजून गेलं होतं . ए. पी. आय. जामसंडे त्यांच्या जवळ आले . ‘ खाड … खाड … ‘ त्यांनी दोघांच्याही पहिल्या दोन मुस्कटात मारल्या . त्यांचा हात जबरदस्तच होता . पहिला रट्टा पडताच दोघांच्याही डोळ्यासमोर काजवे चमकले . कानशिलं गरम झाली . डोकं बधिर झालं . त्या तडाख्याने दोघेही होलपडून बाजूला पडले .
बांद्रा वेस्ट १५
समोरुन पोलिसांची व्हॅन येत होती. मॉन्ट्याने गाडीचा वेग थोडा कमी केला.
" मॉन्ट्या, बाईक स्लो नको करुस. फास्ट जाऊ दे. "
" पागल आहेस काय ? असं केलं तर उगाच त्यांना संशय येईल. " मॉन्ट्याचे म्हणणे बरोबरच होते. रस्ताही अरुंद होता. पोलीस पेट्रोलव्हॅन जवळ आली. मॉन्ट्या खाली बघुन बाईक चालवु लागला. जवळ जातो तोच पोलीसांनी त्यांची गाडी आडवी घातलीच. पिवळा-लाल फिरणारा प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यावर पडला होता. " काय रे ए...? कुठे चाल्लाय एवढ्या रात्री ? आं.....? " समोरच्या सिटवर बसलेल्या पोलीसाने त्यांना हटकलेच...!