साहित्य

लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?

Submitted by वेलांटी on 17 January, 2021 - 06:32

मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
काॅपी राईट कसे घेतात?
एखाद्यांच कथा किंवा कवितेचे घेता येते का?
त्यासाठी काही शुल्क लागते का?

विजय दिन

Submitted by Asu on 16 January, 2021 - 02:51

आज कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आणि मर्यादित अर्थाने का होईना आपण कोरोनावर विजय मिळविला आहे. या सुमुहूर्तावर 'विजय दिन' ही माझी कविता.

विजय दिन

वाट पाहिली आतुरतेने तो
दिन भाग्याचा आज आला
आसेतुहिमाचल भारतभुवनी
आनंद जल्लोष सर्वत्र झाला

किती भोगले किती सोसले
दिली आहुती किती योद्ध्यांची
अदृश्य अरिवर घाव घालता
बाजी लावली आम्ही प्राणांची

आठवती आज चिमाजीअप्पा
लढले त्वेषाने ना केवळ गप्पा
वीर शिवाजी तुम्ही आठवा
शिकविला ज्यांनी गनिमीकावा

शब्दखुणा: 

व्हिसल ब्लोअर-७

Submitted by मोहिनी१२३ on 15 January, 2021 - 12:33

तिळगुळ घ्या...

Submitted by Asu on 14 January, 2021 - 03:44

सौ.वसुंधरा आणि अरुण पाटील यांचेकडून सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि रसिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!!

तिळगुळ घ्या...

सण संक्रांत पौष महिन्याला
सुखसमृद्धीचा वर्षाव झाला
धन-धान्याच्या भर हंगामाला
जन म्हणती मोदे एकमेकाला
विसरून कोरोना कटूतेला
घ्या तिळगुळ गोडगोड बोला

शब्दखुणा: 

आपली खरीखुरी ओळख

Submitted by स्वरुप on 11 January, 2021 - 23:23

#सहज_काही_सुचलेलं

गुळगुळीत पानांसह चकचकीत वेष्टनात गुंडाळून घेवून
डोकावू द्यावेत भारीतले बुकमार्क्स
सजावे, नटावे, नीटनेटके दिसावे मिरवावे एखादे साजिरे कॉफीटेबल बूक म्हणून
की
घरभर फिरत मनसोक्त दूमडून घ्यावेत आपल्या पानांचे कोपरे
आणि मिटून पडावे वाचून घेता घेता एखाद्या रसिकाच्या छातीवर

विषय: 

वाचू शकला नाही...........

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 10 January, 2021 - 01:00

वाचू शकला नाही...........

तोच मोडला ऐन क्षणी जो वाकू शकला नाही
वादळामधे माड बिचारा वाचू शकला नाही

पडला, रडला, धडपडला तो धावत गेला पुढती
मायेमध्ये गुरफटला तो चालू शकला नाही

बस पहिल्या ओळीने डोळे इतके ओले झाले
ओळ एकही त्यानंतर तो वाचू शकला नाही

दोष उन्हाला देण्याआधी इतके ध्यानी ठेवा
सावलीत जो जो जगला तो वाढू शकला नाही

पतंगास तो माझ्या आता थिल्लर म्हणतो आहे
जो मांज्याने माझा मांजा कापू शकला नाही

एक भिकारी ऐकत बसला माझी कर्मकहाणी
जे मागाया आला होता...मागू शकला नाही

शब्दखुणा: 

खेळ मांडला

Submitted by रूपाली विशे - पाटील on 8 January, 2021 - 09:34

खेळ मांडला!!
________________________________________

" आकाश, तुझं कामात बिल्कुल लक्ष नाहीये. बबलू दुबेच्या इन्कम टॅक्स स्क्रुटीनी केसचे पेपर तयार झाले का ? आज दुपारी जॉईन्ट कमिशनरसोबत मिटींग आहे इन्कम टॅक्स ऑफिसला... माहीत आहे ना तुला?" बॉसने झापल्यामुळे पडेल चेहऱ्याने आकाश आपल्या जागेवर येऊन बसला.

विषय: 
शब्दखुणा: 

बालकथा - वेदिका शहाणी झाली.

Submitted by नानबा on 7 January, 2021 - 01:15

श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान!
श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य