सौ.वसुंधरा आणि अरुण पाटील यांचेकडून सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि रसिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!!
तिळगुळ घ्या...…
सण संक्रांत पौष महिन्याला
सुखसमृद्धीचा वर्षाव झाला
धन-धान्याच्या भर हंगामाला
जन म्हणती मोदे एकमेकाला
विसरून कोरोना कटूतेला
घ्या तिळगुळ गोडगोड बोला
तीळ ऊस ओंबी आंबट बोरे
सुगडात भरती गाजर हरभरे
देवा नैवेद्य, प्रसाद गृहिणीला
लावुनी कुंकुम म्हणती बाला
विसरून कोरोना कटूतेला
घ्या तिळगुळ गोडगोड बोला
शुभ काळ उत्तरायण आला
धनू राशीतून रवी मकरी गेला
थंडी काळात तीळ शक्तीला
गोडी गुळाची म्हणे वाणीला
विसरून कोरोना कटूतेला
घ्या तिळगुळ गोडगोड बोला
नववधूघरी हळदी कुंकवाला
दागिने हलव्याचे चंद्रकळेला
स्नेह तिळाचा साखर गोडीला
देऊ हलवा म्हणू एकमेकीला
विसरून कोरोना कटूतेला
घ्या तिळगुळ गोडगोड बोला
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.१४.०१.२०२१)
https://www.facebook.com/AsuChyaKavita