#सहज_काही_सुचलेलं
गुळगुळीत पानांसह चकचकीत वेष्टनात गुंडाळून घेवून
डोकावू द्यावेत भारीतले बुकमार्क्स
सजावे, नटावे, नीटनेटके दिसावे मिरवावे एखादे साजिरे कॉफीटेबल बूक म्हणून
की
घरभर फिरत मनसोक्त दूमडून घ्यावेत आपल्या पानांचे कोपरे
आणि मिटून पडावे वाचून घेता घेता एखाद्या रसिकाच्या छातीवर
मांडून घ्यावेत पाट आणि काढून घ्यावी स्वत:भोवती रांगोळी
सूटू द्यावा उदबत्त्यांचा घमघमाट
आणि मिरवावे पंचपक्वान्न होवून सोन्याचांदीच्या ताटात
की
दिवसभर उपसलेल्या काबाडकष्टांनतर
हातावर टेकलेल्या रोजंदारीतून आणलेल्या
डाळतांदळाची खिचडी बनून भागवावी भूक एखाद्या खपाटीला गेलेल्या पण इमान जपलेल्या पोटाची
चालू फॅशनप्रमाणे मारुन घ्यावेत कट्स आणि विणू द्यावे स्वताला रेशमी धाग्यादोऱ्यांनी
उंची ब्रॅंडची लेबले लेवून विसावावे मॉलमध्ये मांडलेल्या एखाद्या रुबाबदार पुतळ्यावर
की
व्हावे आज्जीची गोधडी, हातशिलाईचा स्वेटर आणि
उबदार मायेची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अंगडी-टोपडी अन दुपटी
होवू द्यावे स्वत:ला लोकप्रिय घोळक्यांमध्ये, कट्टयावर आणि वेगवेगळ्या व्हॉटसअप ग्रूप्सवर
मिरवावीत लावून घेतलेली निमंत्रणे, स्विकारलेले पुष्पगुच्छ आणि सत्कारात मिळालेल्या शाली
की
रमावे मायेच्या चार मोजक्याच माणसांत
जेवणानंतर हात वाळेतो माराव्या दिलखुलास गप्पा
आणि रिचवावी भररात्री सुखदुःखाची कॉफी
अर्धे आयुष्य सरले तरी मिळालीच नाहियेत इतक्या साध्या पण कळीच्या प्रश्नांची उत्तरे.
तसे फारसे काही अडले नाहिये पण लागलीच नाहिये आपली आपल्याला खरीखुरी ओळख
सुवर्णमध्य साधावा, प्रसंगानुरुप वागावे वगैरे सल्ले तयारच असतील तुमचे आणि बरोबरही आहेत ते
पण खर सांगायच तर अस डिप्लोमॅटिक वागायचाच कंटाळा आलाय... कंटाळा आलाय दोन डगरींवर पाय ठेवून चालायचा
कंटाळा आलाय आत एक बाहेर एक करायचा
आणि खरोखरच कंटाळा आलाय उगाउगा प्रतिमा जपायचा
आता जरा स्वत:शीच प्रामाणिक व्हावे म्हणतो
आता जरा स्वताच्याच तळाशी जावे म्हणतो
वरवर, बाहेरबाहेर रेंगाळलो भरपूर
आता जरा स्वत:च्याच खोलवर जाईन म्हणतो
स्वरुप कुलकर्णी
छान लिहलयं....!!
छान लिहलयं....!!
सुंदर लिहिले आहे!
सुंदर लिहिले आहे!
लिखाण आवडले !
लिखाण आवडले !
आणि हो
सुवर्णमध्य साधावा, प्रसंगानुरुप वागावे बरं का
आवडलं...! हे सगळे सगळे करावे.
आवडलं...! हे सगळे सगळे करावे. समयोचित वागावे. पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलाये वैसा. !
आवडलं.
आवडलं.
हो खरच सगळ्यांच्याच मनातलं..
हो खरच सगळ्यांच्याच मनातलं..
सरस!
सरस!
छानच ..
छानच ..
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
सुवर्णमध्य साधावा, कुठलीही गोष्ट मर्यादेत करावी वगैरे खुप गुळगुळीत झालेय खरंच.
झकास.... मला वाटले आयोडीनची
झकास.... मला वाटले आयडींची खरी ओळख जाहीर करण्याविषयी काही आहे कि काय !
आवर्जून आवडल्याचे कळवलेल्या
आवर्जून आवडल्याचे कळवलेल्या सगळ्यांना धन्यवाद!!
मस्त लिहिलयंस स्वरूप!!
मस्त लिहिलयंस स्वरूप!!
छान च लिहिलेय.. मी त्या
छान च लिहिलेय.. मी त्या दिवशीच हे वाचलेले.. आवडलेले.. पटलेले.. उत्स्फुर्त प्रतिसादही देणार होतो.. पण तेव्हा हाताशी वेळ नसल्याने राहिला..
असो, गेले काही वर्षे काही काळ असे अन मनासारखे वागायला जमतेय याचा आनंद वाटतो.. अन्यथा बरेचदा कळतं पण वळत नाही अशी गत होते आपली
छानच लिहीलंय.
छानच लिहीलंय.
प्रतिमा जपण्याचा पण कंटाळा येत असेल. खूप छान.
Hmm.. Hmm..
Hmm.. Hmm..
धन्यवाद लोकहो!
धन्यवाद लोकहो!
मस्तच .....
मस्तच .....
वाह!! तरल.
वाह!! तरल.
धन्यवाद लोकहो!!
धन्यवाद लोकहो!!
छान लिहिलेय! अंतर्मुख करायला
छान लिहिलेय! अंतर्मुख करायला लावणारी कविता.
>> अर्धे आयुष्य सरले तरी मिळालीच नाहियेत इतक्या साध्या पण कळीच्या प्रश्नांची उत्तरे.